विशेषत: लंगडा त्यागी व इंदूच्या व्यक्तिरेखा पूर्णाकार झाल्या आहेत. एका विशिष्ट शैलीद्वारे त्यागी इतरांच्या मनात विश्वास निर्माण करतो, प्रामाणिकतेचा आभास साधतो आणि त्याचवेळी त्याला अपेक्षित असा संशयही निर्माण करतो. त्यामागचा त्याचा कुटिल हेतू त्याच्यामधूनच झळकणाऱ्या एका विशेष मंदस्मितातून व्यक्त होतो. सैफ अलीने या सर्व सूक्ष्म मुद्रा अत्यंत परिणामकारकतेने साधल्या आहेत. कोकणा सेननेही 'इंदू'ची व्यक्तिरेखा समर्थपणे साकारली आहेच, पण लेखक दिग्दर्शक विशाल भारद्वाजने या व्यक्तिरेखेवर विशेष श्रम घेतल्याचे जाणवते. ही इंदू या समाजसमूहातील सामान्य स्त्रीचे प्रतिनिधित्व करतेच, पण त्यासोबत तिच्यातील चैतन्यशीलता, आक्रमकता, मनाचा खुलेपणा, सत-असत्, चांगले-वाईट समजून घेण्याचं भान, आत्मनिष्ठा, विविध प्रकृतीच्या व्यक्तींना जाणून त्याप्रमाणे त्यांच्याशी आगळ्या सौहार्दाचं नातं जोडण्याची तिची सहजता आदी बहुपेडी पैलू प्रदान करून दिग्दर्शकाने हिंदी चित्रपटेतिहासातील एक अद्वितीय स्त्री व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली आहे, यात वाद नाही.
विख्यात नाटककार शेक्सपिअर यांच्या ' ऑथेल्लो' या चार शतकांपूर्वीच्या नाटकावर आधारित असलेला 'औकारा' हा विशाल भारद्वाज दिग्दर्शित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा 'ऑथेल्लो', "लँगो', 'डेस्डेमोना', 'कॅसिओ', एमिलिया, 'बियांका' आदी 'ऑथेल्लो मधील व्यक्तिरेखांना उजाळा मिळाला आहे; आणि या व्यक्तिरेखांशी हलकेसे नामसाधर्म्य (आणि प्रवृत्तीविशेषांशी जवळीक) साधणाऱ्यां या चित्रपटातील ओमी ऊर्फ ओंकारा, लंगडा त्यागी, केस फिरंगी, इंदू, बिल्लू या व्यक्तिरेखाही चर्चापात्र ठरू लागल्या आहेत.
संशयग्रस्त आणि तीन सूत्रे
विशाल भारद्वाज यांनी याआधी शेक्सपिअरच्या 'मॅकबेथ'वर आधारित 'मकबूल' दिग्दर्शित केला होता. त्या चित्रपटात त्यांनी शहरी माफिया जगताच्या पार्श्वभूमीची योजना केली होती. 'ओंकारा मध्येही त्यांनी अधोलोकाचीच पाश्श्वभुमी स्वीकारली आहे, पण फरक इतकाच की यात त्यांनी उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात प्रबळ असलेल्या डाकू सत्ताधाऱ्यांच्या 'नेक्सस'च्या कोंदणात उपरोक्त व्यक्तिरेखा बसवल्या आहेत. या चित्रपट दिग्दर्शकाने या व्यक्तिरेखांद्वारे ज्या काही सूत्रांचा मागोवा घेतला आहे, ती सूत्रे अशी
• एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या मनात संशयाला जागा असेल, तर फसव्या प्रवृत्तींना मोठा वाव मिळतो;
• या दोन (संशयग्रस्त व फसव्या) प्रवृत्तीच्या अंतर्विरोधाच्या पेऱ्यांमध्ये, आजूबाजूच्या कमी-जास्त चांगल्या-वाईट प्रवृत्तीही अभावितपणे येतात आणि एक जनसमूह विपरीततेकडे, विनाशाकडे प्रवास करू लागतो अध:पतनाकडून अधिक अध:पतनाकडे या समूहातील वरपांगी प्रामाणिक, निष्ठावान भासणाऱ्यां व्यक्ती आपल्या याच (प्रामाणिक वगैरे) प्रतिमांचा कुशलतेने व करालपणे वापर करून दीर्घकाळ छलकपट करीत राहतात; हळूहळू त्या अंगाने समूहातील इतर हितसंबंधांची चक्रे फिरू लागतात. आणि मग कुणाकडूनही थोपवणे शक्य होणार नाही, अशा वेगाने पूर्ण समूह चिनाशाकडे वाटचाल करू लागतो- कळत-नकळतपणे! कथावस्तूमधील अशा प्रमुख सूत्राचे धागे पकड़त आपण चित्रपटात गुंतून जातो. मानवी मनोवृत्तींचा आणि अध:पतित समाजमानसाचाही विचार करू लागतो; अखेर सर्व निवाश घडून आल्यावर जे घे बसतात, त्यामुळे आपण अचानक व्यक्तिरेखांपासून अलिप्त होऊन जातो आणि मनात रेंगाळत राहते ते मानवी समाजाचे भेसूर दर्शन
कालचा ऑथेल्लोआजचा 'ओंकारा'
शेक्सपिअरच्या मूळ 'आँधेल्लों मध्ये नायक ऑथेल्लो हा व्हेनिसमधील एक आदरणीय सरदार असतो, परंतु आपला विश्वासू साथीदार लँगो याला बाजूला सारून तो कॅसिओ या तरुण लेफ्टनंट बढ़ती देतो. तिथूनच लँगोच्या पाताळयंत्री कारवाया सुरू होतात आणि संशयग्रस्त ऑथेल्लो त्याला बळी पडत जातो आणि डेस्डेमोना चाही हकनाक बळी जातो. संशयांच्या धुक्यातून, फसवणुकीच्या सूक्ष्म चक्रातून प्रवास करताना मानवाला संत्याच आकलन शक्य आहे का? सुस्वभावी वा प्रभावी माणसालाही संशयाचे कित्येक पदर भेडसावू शकतात? संशयाचे किंतू तरल प्रेमभावनेवर हावी होऊन, माणूस हिंस पशुवत कसा होऊ शकतो? एक ना अनेक, असे प्रश्न मनात निर्माण करण्याची ताकद या नाटकात असल्यामुळेच शेक्सपिअरचे ते नाटक आजही जिवंत आहे आणि त्यातील प्रश्न व नाट्य आजही आपल्याला भंडावून सोडते. विशाल भारद्वाज यांनी लेखन, दिग्दर्शन व संगीत दिग्दर्शन या तिन्ही महत्त्वाच्या बाजू सांभाळत आपल्या प्रतिभेचा आविष्कार केला आहे आणि या नाट्याला व्यापक समूह पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तर प्रदेशच्या एका छोट्या शहरात ओंकारा' (अजय देवगण) या डाकू चा दरारा आहे. लंगडा त्यागी (सैफ अली) आणि केसू फिरंगी (विवेक औबेराय) हे त्याचे निष्ठावान साथीदार, बंदुकीच्या बळावर सामर्थ्य गाजवणाच्या या गंगला स्थानिक खासदाराचा (नसीरुद्दीन शाहा) वरदहस्त असतो. औकाराला त्याच्या कर्तृत्वामुळे त्याच्या समूहात व गावातही 'मानाचे' स्थान असते. या गावातील स्थानिक वरिष्ठ वकिलाची सुशिक्षित मुलगी डॉली (करिना कपूर) हिच्याशी त्याचे प्रेमसंबंध असतात. दरम्यान, ओंकारा जेव्हा लंगडा त्यागीला डावलून केसूला आपला 'बाहुबली' म्हणत सन्मानीत करतो तेव्हा लंगडा त्यागीला त्याचा हेवा वाटला. या वैषम्यापोरटी तो ओंकार वे केसू विरोधी छल कपट सुरू करतो.. पण अत्यंत कुशलतेने आपली निष्ठावान असल्याची प्रतिमा कायम राखीत जेणेकरून त्याची पत्नी इंदू (कॉकणा सेन शर्मा) हिच्यासह सर्व मनाने संभ्रमित राहुनही त्याच्या इशाच्यागत कृती करतात; छल कपट का कळत-नकळतपणे हातभार लावतात. तमासगीर 'चमनवहार' बिल्लू (विपाशा बासू) सुदधा या सर्व घडामोडीशी दूरान्वयाने संबंध असूनही त्याला अपवाद ठरत नाही. तर, आपली प्राणप्रिय डॉली आणि बासू यांचे प्रेमसंबंध असावेत, असा संशय ओमीच्या मनात भरवण्यात त्यागी यशस्वी होतो.
किल्मिषे आणि 'कमरबंदा'चे रूपक
मनातील किल्मिषांची एक सुनियोजित शृंखला तयार होत जाते आणि 'कर्तृत्ववान' ओंकारा, निष्ठावान केसू, निरागस डॉली, चैतन्यशील इंदू, त्यागीचा मित्र रज्जू सर्वच शृंखलेच्या गिरकीत अडकतात. आणि सर्वनाशाकडे प्रवास करतात. हे सर्व घडवून आणणाऱ्या लंगडा त्यागीचाही या प्रक्रियेत अंत ओढवतो. या किल्मिषांची शृंखला दर्शविण्यासाठी दिग्दर्शकाने अत्यंत कल्पकतेने 'कमरबंद' पट्ट्याच्या रूपकाची योजना केली आहे. या रूपकाद्वारे संशयाचा, प्रेमसंबंधांचा, काम-संबंधांचा अन्योन्य संबंध दर्शवतानाच दिग्दर्शकाने पुरुषप्रधान संस्कृतीमधील स्त्री-पुरुष संबंध, सत्ता संबंध, 'पझेसिव्हनेस' अशा अनेक गोष्टींकडे निर्देश साधला आहे. ओंकाराने डॉलीला प्रेमाने दिलेला कमरबंद' पट्टा चोरी होतो आणि कुणाकुणाच्या हाती पडतो. डॉलीच्या कुठल्याही प्रमादाचा तो पुरावा नसतो. पण तरीही तो 'पुरावा' ठरतो. संशयाच्या भेसूर वातावरणात असत्यही सत्य म्हणून कसे ठसठशीतपणे पुढे येऊ शकते. त्याचेही रूपकात्मक दर्शन या कमरपट्ट्याद्वारे होते. असा सर्व व्यापक अन्वय लक्षात घेतला की, दिग्दर्शकाचं समूहभान ध्यानात येतं. रात्रीच्या धूसर प्रकाशात, मर्दानगीच्या जल्लोषात मिरवल्या जाणाऱ्या बंदुका, मद्याचे प्याले उंचावत होणारा मर्दानी गदारोळ आणि या पार्श्वभूमीवर होणारे बिल्लूचे (बिपाशा बासू) उन्मादी, प्रक्षोभक नृत्य-गान...
"बिडी जलायले जिगर से पिया,
जिगर मा बड़ी आग है.. निकम्मा"
या बेधुंद गाण्यातून व लोकनृत्यातून दिग्दर्शक आपल्याला या समूहाच्या पुरुषप्रधान संस्कृतीची जाणीव करून देतो. बळी तो कान पिळी चा कायदा मानणाऱ्या या पुरुषसमूहात स्त्रीचे काय स्थान आहे, तेही सूचित होते. विशेषत: या गाण्याच्या सुरुवातीला बिपाशा बसूची जी एक विशेष भावमुद्रा दिसते ती पाहून पूर्वीच्या सरंजामी संस्कृतीमधील चित्रकारांच्या व शिल्पकारांच्या कलाकृतीत आढळणाऱ्या भावमुद्रेचे स्मरण होते. थोडक्यात, उत्तर भारतातील अधोलोक चवान' प्रभावित गावाची पार्श्वभूमी घेऊन दिग्दर्शकाने 'आँथेल्लो तील संशयी प्रवृत्तीवर आधारित कथावस्तूला अनेक परिमाणं देण्याचा प्रयत्न केला आहे. असे इतर पैलू व चित्रपटातील व्यक्तीरेखाटनं बारकाईने पाहिली, तर चित्रपट वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. त्यांची उत्तर प्रदेशी बोलीभाषा व 'ग्राम्य" भाषेतील संवादही यातील समष्टी परिणामकारकतेने मनात ठसवतात.
वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा : इंदू व लंगडा त्यागी
विशेषत: लंगडा त्यागी व इंदूच्या व्यक्तिरेखा पूर्णाकार झाल्या आहेत. एका विशिष्ट शैलीद्वारे त्यागी इतरांच्या मनात विश्वास निर्माण करतो, प्रामाणिकतेचा आभास साधतो आणि त्याचवेळी त्याला अपेक्षित असा संशयही निर्माण करतो. त्यामागचा त्याचा कुटिल हेतू त्याच्यामधूनच झळकणाऱ्या एका विशेष मंदस्मितातून व्यक्त होतो. सैफ अलीने या सर्व सूक्ष्म मुद्रा अत्यंत परिणामकारकतेने साधल्या आहेत. कोकणा सेननेही 'इंदू'ची व्यक्तिरेखा समर्थपणे साकारली आहेच, पण लेखक दिग्दर्शक विशाल भारद्वाजने या व्यक्तिरेखेवर विशेष श्रम घेतल्याचे जाणवते. ही इंदू या समाजसमूहातील सामान्य स्त्रीचे प्रतिनिधित्व करतेच, पण त्यासोबत तिच्यातील चैतन्यशीलता, आक्रमकता, मनाचा खुलेपणा, सत-असत्, चांगले-वाईट समजून घेण्याचं भान, आत्मनिष्ठा, विविध प्रकृतीच्या व्यक्तींना जाणून त्याप्रमाणे त्यांच्याशी आगळ्या सौहार्दाचं नातं जोडण्याची तिची सहजता आदी बहुपेडी पैलू प्रदान करून दिग्दर्शकाने हिंदी चित्रपटेतिहासातील एक अद्वितीय स्त्री व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली आहे, यात वाद नाही. अशा वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा आणि 'मास इफेक्ट' निर्माण करणारी काही दृश्ये यामुळे हा चित्रपट परिणामकारक झाला आहे. परंतु संशयी वृत्ती, फसव्या प्रवृत्ती आणि जनसमूह यांचा एकत्रित मास इफेक्ट' चित्रपटाच्या पूर्वार्धात जमून आला असला तरी उत्तरार्धात मात्र चित्रपटाचा कल क- वैयक्तिक स्तरावरील सघर्षाकडे झुकल्याचे जाणवतं. चित्रपटाच्या रचनेमध्ये हा दोष वर असला, तरी वैशिष्ट्यपूर्ण संगीत, प्रकाशयोजना याद्वारे एक भेसूर वातावरणनिर्मिती कायम राखली आहे. याचे श्रेय अर्थातच विशाल भारद्वाज या प्रतिभावान व बुद्धिमान दिग्दर्शकाकडे जाते. असे दिग्दर्शक आपल्याकडे अभावानेच आहेत.
प्रतिमांच्या पलीकडील 'ग्लोबल ऑथेल्लोंकार'
तर अशा चित्रपटातील विविध प्रतिमांच्या पलीकडे जाऊन विचार केला, तर सध्या देशात आणि जागतिक पातळीवर ज्या घडामोडी होत आहेत, त्याबद्दलच्या प्रश्नांबद्दलही आपण नव्याने विचार करू लागतो. उदाहरणार्थ कार्यालयात तेव्हा एक गुप्तहेर होता अशी संशयवजा आवई का उठवली असावी? सुनिता नारायण यांनी पेप्सी, कोका-कोला आदी शीतपेयांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण अवाजवी असल्याचे पुरावे देऊनही, शासन त्यासाठी 'स्टँडर्डस्' पक्के करण्याचे का टाळते? पालेभाज्या, फळांमध्येही कीटकनाशक असतात, असं म्हणून त्याबाबतची जबाबदारी झटकणारे कंपनीचे संचालक वा कृषिमंत्री म्हणजे 'लंगडा त्यागी चेच अवतार नाहीत काय? इराकमध्ये घातक रासायनिक, आण्विक अस्त्रे असल्याची आवई उठवून, शस्त्रास्त्रसामर्थ्याने इराकवर आणि तेथील नैसर्गिक स्रोतांवर ताबा मिळविणाऱ्या अमेरिकन राज्यकर्त्यांबद्दल काय म्हणावे? हे संशयाचे ग्लोबल धुके निर्माण करण्याचेच प्रकार नाहीत काय? 'ओंकारा'च्या निमित्ताने अशा आधुनिक ऑथेल्लोकारांचा, 'लॅगो लंगड्याचाही विचार व्हावा. नाही का?
Tags: चित्रपट विल्यम शेक्सपिअर मिलिंद चंपानेरकर Film William Shakespeare Milind Champanerkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या