डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'

उंचावलेल्या अपेक्षांना आणि वाढलेल्या ताणांना तोंड देताना माणूस थकून जातो आणि अशातच जर अपेक्षेइ्तकं यश मिळाले नाही किंवा अपेक्षेनुसार एखादी व्यक्ती वागली नाही किंवा अपक्षप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही तर अपेक्षाभंगाचं दुःख पदरी येतं.

पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात असलेल्या सर्व जिवंत प्राण्यांत मनुष्यप्राणी हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो आणि याचं कारण म्हणजे त्याला लाभलेलं बुद्धीचं वरदान या बुद्धीच्या जोरावरच तो त्याच्यापेक्षा शरीरानं आकारान आणि ताकदीनं मोठ्या असलेल्या इतर प्राण्यांवरसुद्धा हवी तशी हुकमत गाजवू शकतो. बुदधीमुळे माणूस जसा गुणवान बनू शकतो तसाच कधीकधी दुर्गुणीही बनू शकतो. युद्धीचं हे दुधारी शस्त्र, फक्त कसं वापरायवं त्यावर त्याचा सदुपयोग किंवा दुरुपयोग अवलंबून असतो. मूल जन्माला येतं तेव्हा ते निर्विकार असतं, पण जसजसं ते मोठं होऊ लागतं तसातसा त्याच्या बुद्धीचा विकास होऊ लागतो. निरनिराळ्या भावभावना त्याला उमजू लागतात. राग, लोभ, प्रेम, माया, तहान, भूक;  नाती, गोती; दिवस, रात्र, काळ, वेळ: सुंदर-सुंदर थोडक्यात सुख आणि दुःख यांच्याशी त्याचा परिचय होतो. याच वेळेला ‘अपेक्षा’ या नावाच्या एका भावनेचा आणि त्याचा परिचय होतो.

मानवी नातेसंबंध बव्हंशी ‘अपेक्षा' या सूत्रात गुंतलेले असतात. आई-वडिलांची मुलांकडून अपेक्षा असते - मुलांनी आपण म्हणू तेच शिकावं आपण सांगितलेलं ऐकावं, शिकून मोठे झाल्यावर नोकरी, धंद्यात किंवा व्यवसायात उतरावं, खूप मोठे यश मिळवावं आणि मुख्य म्हणजे आपल्या उतारवयात आपल्याला सांभाळावं आणि सुखात ठेवावं. मुलांची आईवडिलांकडून अपेक्षा असते की त्यांनी आपल्याला प्रेम, माया यावी; कपडालत्ता, अन्नपाणी आणि एक प्रकारचं कौटुंबिक संरक्षण पुरवावं. आपण पुरेसं मोठे होईपर्यंत आधार यावा. जी गोष्ट आईवडील आणि मुलांची तीच इतर नात्यांचीही- पतिपत्नी, मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहिणी आणि आणखीही कितीतरी: अनेक. या सऱ्यांच्या एकमेकांविषयीच्या अपेक्षांमुळेच आयुष्यात फार मोठी गुंतागुंत निर्माण होते. 

अधिक मोठं व्हायचं, अधिक यशस्वी व्हायचं तर अधिक स्पर्धेला तोंड यावं लागतं काळ-काम-वेगाचे गणित अधिक वेगवान करावं लागतं, रागलोभ, हर्षामर्ष अधिक तीव्र होतात. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्तीवरचा ताण प्रचंड वाढतो. उंचावलेल्या अपेक्षांना आणि वाढलेल्या ताणांना तोंड देताना माणूस थकून जातो आणि अशातच जर अपेक्षेइ्तकं यश मिळाले नाही किंवा अपेक्षेनुसार एखादी व्यक्ती वागली नाही किंवा अपक्षप्रमाणे एखादी गोष्ट घडली नाही तर अपेक्षाभंगाचं दुःख पदरी येतं. या दुःखाचा आघात कधीकधी तर इतका जबरदस्त होतो की माणूस खचूनही जाऊ शकतो. यावर उत्तम उपाय कार्य? आपल्या पूर्वजांनी खूप अनुभव घेऊन आणि विचार करून यावर उपाय केव्हाच काढलेला आहे - "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेय कदाचन -आपण आपलं काम करीत राहावं फळाची अपेक्षा धरू नये. किती खरं आहे ना हे? 

आपण जर मुळात ‘अपेक्षा' च धरली नाही तर अपेक्षाभंगाचं दुःख तरी कशाला होईल? बारीक बारीक, छोट्या छोट्या गोष्टींत आपण एकमेकांवर तऱ्हेत-हेच्या अपेक्षा लादत राहतो आणि शेवटी आपल्याच हातांनी अपेक्षाभंगाचं दुःख ओढवून घेतो. त्यापेक्षा आपण मुळातच कुणाकडून कसलीच अपेक्षाच केली नाही तर? कुणी कसं वागावं, कुणी काय बोलावं, कुणाला काय द्यावं नि काय घ्यावं याच्याविषयी मुळात अपेक्षाच धरल्या नाहीत तर त्यातून निर्माण होणारे हेवेदावे, स्पर्धा, ईर्ष्या, ताण-तणाव यांतूनच आपल्याला मुक्ती मिळणार नाही का?

(सौजन्य : मुंबई आकाशवाणी - 4)

Tags:  आकाशवाणी मुंबई अपेक्षा मृदुला जोशी Redio Mumbai Expectation Mrudula Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके