अरुण शौरींची दोन व्याख्याने तुफान गर्दीत झाली. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात अशी गर्दी यापूर्वी बॅ. नाथ पै आणि नानी पालखीवाला यांच्या गद्य जुगलबंदीच्या वेळीच झाल्याचे बाठवते. शौरी यांच्याबद्दल सुशिक्षितांत केवढे आकर्षण आहे याचा तो पुरावाच होता. मी गेलो तेव्हा दारे बंद झाली होती. चुटपुटत परत यावे लागले.
सध्या सर्वांत सुखी कोण असा प्रश्न रामदासस्वामींच्या शैलीने विचारला तरी श्री. बाबासाहेब भोसले हेच उत्तर निघेल. आंध्र, कर्नाटक राज्यांत इंदिरा काँग्रेसचे पानशेत झाले ही गोष्ट बाबासाहेबांच्या इतकी पथ्यावर पडली की त्यांचे काय करायचे हा प्रश्नच बाजूला पडल्यासारखा झाला आहे. सर्व बंडोबा खाता खऱ्या अर्थाने चंडोबा झाले आहेत. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेण्याची कुबुद्धी माता इंदिराजींना होणेच शक्य नाही. चालू वातावरणात त्या घेतल्या तर आणखी एक राज्य हातचे जाण्याची भीती आहेच. बाईंना आपण हवे असू तर मुख्यमंत्रिपद जात नाही, नको असू तर साधे आमदारपद मावळत नाही, अशा आत्मतुष्ट वृत्तीत बाबासाहेबांची स्वारी आहे. आंध्रची क महाराष्ट्रात दुरुस्त करू, या इराद्याने बासाहेबांना राजीनामा द्यायला सांगून अधिमंडळ पक्षाची बैठक बाईंनी बोलाविलीच जर अंतुले अथवा अंतुल्पांच्या पृठपातून पुढे आलेले प्यादे निवडून येण्याची भीती आहेच. श्रीमती प्रतिमा पाटील यांना मुख्यमंत्री करून पहाये हा विचार पूर्वीएवढा आता प्रबळ उरलेला नसणार, महणून रायगडाला सध्या सुखाची झोप आहे. आसाममध्ये निवडणुका, दिल्लीत स्थानिक निवडणुका यांचे काय ते होईपर्यंत त्या बंडखोरांना पांबायला सांगतात की लतीफ राज्यपालांकडून राज्य चालवू पहातात व अॅनिमेटेड सस्पेन्शनमध्ये विधानसभा ठेवतात ते पुढील आठवडयात समजेल.
मराठी विज्ञान परिषदेचे कोल्हापूरचे अधिवेशन कोरफुट्या जमिनीच्या प्रश्नावर गाजले. विशेषतः यंदा परिषदेने अब्दुललाट खेड्यात शेतकऱ्यांचे कार्यशिबिर घेऊन हा प्रश्न पुढे आणला. त्यामुळे परिषदेतील परिसंवादास प्रत्यक्ष कृतीचे बळ लाभले. जायकवाडी धरणाखालील हजारो एकर जमीन अतिपाण्याने नापीक झाली आहे आणि इकडे सातारा, कोल्हापूर, सांगली भागातही खारफुटी जमिनीचे प्रमाण वाढते आहे. ज्या अब्दुललाट खेड्यात सातशे जमिनी पंचगंगेच्या पाण्याने व रासायनिक खतांच्या अतिवापराने निकामी झाल्या तेथे एका नेटावरच कार्यशिविर झाले. दीडशे ते पावणे-दोनशे शेतकरी हजर होते. या परिसंवादात सोलापूरचे सेवानिवृत्त मृद्परीक्षक श्री रं. प्र. देशपांडे यांनी उजनीच्या कालव्यामुळे मंगळवेढ्याच्या जमिनी खारफुटी होण्याचा धोका सविस्तर विशद केला. लोकविज्ञान संघटना व पुणे डेव्हलपमेंट ग्रुप यांच्या सहकार्याने ते मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना आगामी संकटाची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्नशील होते. पदरमोड करून औरंगाबाद, पुणे, मुंबई-तील मंत्रालय इतक्या ठिकाणी जाऊन त्यांनी जमिनी वाचविण्यासाठी आतापासून प्रयत्न व प्रयोग करण्याची शेतकी खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती केली. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी समस्या उद्भवणार हे मान्य केले पण स्वत: प्रयोग करण्याची तयारी दर्शविली असे म्हणता येणार नाही. उलट, श्री. रं. प्र. देशपांडे यांना ते म्हणाले, 'तुमची मंगळवेढ्यास ना जमीन ना काही. तुम्ही यात कशाला पडता?' म्हणजे पहा. समाजहिताने प्रेरित होऊन कोणी कुणाचे भले करू जायलाही सध्या अवसर नाही! मंगळवेढ्याची जमीन हे एक 35 हजार एकरांचे काळ्या जमिनीचे विशाल सरोवर आहे. कोठे म्हणता कोठे उतार नाही. श्री. र.प्र. देशपांडे सांगतात की, 56 साली मुंडेवाडीच्या नाल्यात महापुराचे पाणी घुसून ते दोन्ही काठांवर पसरून 4-5 दिवसच राहिले, तर 2 5 वर्षे दोन्ही बाजूच्या जमिनी नापिकी झाल्या! पण मंगळवेढपाच्या शेतकऱ्यांवर हा दाखला काहीही परिणाम करू शकत नाही. त्यांचा कोणी पुढारी साखर कारखान्याचे स्वप्न उराशी बाळगून बसला आहे. उजनीचे पाणी आले रे आले की ऊस एके ऊस लावायचा असा शेतकऱ्यांचा विचार आहे. चार-पाच वर्षे साखर पिकेल पण पुढे गवताची काडीदेखील तेथे पिकणार नाही! म्हणून श्री. रं.प्र. देशपांडे धोक्याचा इशारा देऊन राहिले आहेत. पण लक्षात कोण घेतो? म. वि. परिषदेचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन.
अरुण शौरींची दोन व्याख्याने तुफान गर्दीत झाली. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात अशी गर्दी यापूर्वी बॅ. नाथ पै आणि नानी पालखीवाला यांच्या गद्य जुगलबंदीच्या वेळीच झाल्याचे बाठवते. शौरी यांच्याबद्दल सुशिक्षितांत केवढे आकर्षण आहे याचा तो पुरावाच होता. मी गेलो तेव्हा दारे बंद झाली होती. चुटपुटत परत यावे लागले.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या