डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुसलमानांनी देशप्रेम किती वेळा सिद्ध करायचे?

इचलकरंजी येथे ईदगाह मैदान वापराच्या वादातून प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक व जाळपोळ केली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी ईदगाह मैदानावर महाआरती करण्याचा इशारा दिला. मैदानापासून काही अंतरावर आरती करण्यास सुरुवातही केली. सायंकाळी साडेसहानंतर स्टेशन रोडवर महाआरतीस सुरुवात झाली.

श्रीनगरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात कोल्हापूरचा अभिजित सूर्यवंशी हा वीर जवान शहीद झाला. या वीर जवानाला अखेरचा निरोप दिल्यानंतर परतणा-या जमावाने बीर जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी सकाळपासून राबणाऱ्या नगरसेविका महिराजबी मुल्ला यांच्या घरावर दगडफेक करून त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक आदम शेख यांच्या घरात नगरसेवक रवी इंगवले हे पाच-सहा तरुणांसोबत घुसल्याने परिसरात तणाव निर्माण झाला, अचानक काही कारण नसताना झालेल्या या दगडफेकीमुळे या परिसरातील तरुण संतप्त झाले. ‘‘अभिजित सूर्यवंशी याच्या वीरमरणाचा आम्हांला अभिमान आहे. आम्ही अंत्ययात्रेत सहभागी होतो, पण जाणीवपूर्वक आमच्या घरावर दगडफेक का केली गेली,’’ अशी तीव्र प्रतिक्रिया हिदायत मणेर यांनी व्यक्त केली. वीर जबान अभिजित सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी सकाळपासून राबणाऱ्या नगरसेविका महिराजबी मुल्ला यांना दगडफेकीच्या प्रसंगास सामोरे जावे लागले. त्यांचे पती इब्राहिम मुल्ला सकाळपासून स्मशानभूमीत होते. त्यांनी महापालिका कर्मचा-यांच्या सहकार्यने पाटाचे दगडी टप्पे स्वच्छ करून घेतले. तोरस्कर चौकात अभिजितच्या अभिवादनाचा फलक लावला, पण स्मशानापासून काही अंतरावर असलेसे श्री. मुल्ला यांचे घर दगडफेकीचे लक्ष्य बनले. त्यात खिडक्या, दारावरील काचांचा चक्काचूर झाला. 

हृतिक प्रकरण फटका मनीषा कोईरालाला : 

नेपाली जनतेबद्दल एका तथाकथित मुलाखतीत हृतिक रोशनने अपशब्द वापरल्यावद्दल नेपाळी डाव्या विचाराच्या विद्यार्थ्यांनी नेपाळमधील सार्वजनिक व्यवस्था बंद करून असंतोष व्यक्त केला. परंतु हृतिकने तर ‘‘मी ती मुलाखत दिली नाही व तसे म्हणालो नाही,’’ असे जाहीर केले. उत्तरांचलमध्ये एन.एस.यू.आय. या काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने मात्र मनीषा कोईराला नेपाळी असल्याने तिलाच 'लक्ष्य' बनविले. उत्तरांचलात तिचे चित्रपट प्रदर्शित करण्यास त्यांनी संघटित विरोध दर्शविला आहे. चित्रपटगृह-मालकांना तसे दमही दिले आहेत. बघू या पुढे काय होते ते!

पुन्हा पुन्हा इचलकरंजी का? 

इचलकरंजी येथे ईदगाह मैदान वापराच्या वादातून प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक व जाळपोळ केली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांनी ईदगाह मैदानावर महाआरती करण्याचा इशारा दिला. मैदानापासून काही अंतरावर आरती करण्यास सुरुवातही केली. सायंकाळी साडेसहानंतर स्टेशन रोडवर महाआरतीस सुरुवात झाली. परंतु ईदगाह मैदानाजवळ आरती करण्याच्या आग्रहावरून जमावाने पोलिसांचे कडे तोडून घुसण्याचा प्रयत्न केला. यातून दगडफेक व दंग्यास सुरुवात झाली. ईदगाह मैदान शासनाने (कलेक्टर) मुस्लिमांना नमाजासाठी दिले असताना त्याच जागेवर महाआरती करणार, अशी आग्रही भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. तीसुद्धा रमजानच्या दिवसांत. त्यातून जाळपोळ-दंगे, अशा प्रकारास सुरुवात झाली. जमाव पोलिसांनाही काबूत ठेवता येत नव्हता. शिवाजी पुतळ्याकडे जमाव जात असताना, जमावाने बसस्थानक व रस्त्यावरच्या वस, दुचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान केले. वाहनांची मोडतोड करून वाहने पेटविण्यात आली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके