डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘धर्मनिरपेक्षता आणि स्वामी विवेकानंद’ या लेखाच्या दृष्टिक्षेपातून नानांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरला. आज विचार पटले नाहीत की डोकी फोडायची, चित्र आवडले नाही तर चित्र फाडायची, चित्रपटाचा रुपेरी पड़दा फाडायचा, नाटकांवर बंदी घालायची आणि ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आता खेळापर्यंत येऊन पोहोचली आहे. 

21 जानेवारी रोजी प्रा. दंडवते यांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून साधना प्रकाशनाने त्यांच्या ‘वेध अंतर्वेध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते, के. सी. कॉलेज, मुंबई येथे पार पाडला. समारंभाचे अध्यक्षस्थान नियोजित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वसंत बापट यांनी भूषविले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक य. दि. फडके यांनी प्रा. दंडवतेंच्या लेखांचे मर्म मोजक्या शब्दांत मांडले. थेट आशयाला भीडणारी सहज शैली, गंभीर विषयाला लाभलेली नर्मविनोदाची झालर अशा शब्दांत त्यांनी दंडवतेंच्या लेखनाची माहिती सांगितली. व्यक्तीचीत्रनात्मक लेखांतील हृदयस्पर्शित्व, त्यातून ओतप्रोत वाहणारा जिव्हाळा विलक्षणच आहे. प्रा. दंडवतेंना संबोधून य. दि. म्हणाले की, ‘गाणाऱ्याचा गळा जसा शेवटपर्यंत रहावा तसा लिहिणाऱ्याचा हातही शेवटपर्यंत चालत रहावा’, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

प्रा. दंडवते यांनी लेखांच्या चौकटीत राहून सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी भूमिकेविरुद्ध मूलभूत विचार मांडला. देशभक्ती तसेच धर्माची नवनवीन व्याख्या बनविणाऱ्या लोकांविरुद्ध कोरडे ओढले, ‘धर्मनिरपेक्षता आणि स्वामी विवेकानंद’ या लेखाच्या दृष्टिक्षेपातून नानांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उचलून धरला. आज विचार पटले नाहीत की डोकी फोडायची, चित्र आवडले नाही तर चित्र फाडायची, चित्रपटाचा रुपेरी पड़दा फाडायचा, नाटकांवर बंदी घालायची आणि ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आता खेळापर्यंत येऊन पोहोचली आहे. देशभक्तीचा पुरावा म्हणून खेळपट्टया खणणे ही देशभक्तीची कसोटी नाही, ‘फासावर चठणाऱ्या हुतात्म्याकडे देशभक्तीची कसोटी होती. देशभक्ती कुणाचीही मक्तेदारी नाही’, असे परखड सत्य प्रा. दंडवते यांनी मांडले.

प्रा. दंडवते यांनी आपल्या भाषणाचा समारोप हळुवार, काव्यात्म शब्दांत व्यक्त केला - जीवनाच्या संध्याछाया अंगणात येऊन पोहोचल्या; काळरात्रीची चाहूल लागली आहे तरी जीवनाची मैफल चालूच राहणार...’

प्रारंभी प्रास्ताविक करताना प्रा. सदानंद वर्दे यांनी ‘या माणसाने ध्येयनिष्ठेने जीवन व्यतीत केले व आपल्या ध्येयाचे ओझे त्याला कधी झाले नाही’ अशा शब्दांत प्रा. दंडवते यांचा उचित गौरव केला.

सोहोळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके