डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जवळपास 900 कंटेनर्स (1 कंटेनर = 14.5 मेट्रिक टन) द्वाक्षे त्या वर्षी युरोपात गेली. यांत 80% प्रमाण नाशिकच्या द्राक्षांचे होते. यानंतर मात्र निर्यातीचे प्रमाण घसरले. गेल्या वर्षात राज्यातून 550 कंटेनर्स द्राक्षे युरोपला रवाना झाली. यंदा द्राक्षांची निर्यात यापेक्षा कमी होणार, असे चित्र आहे. खुद्द नाशिक जिल्ह्यात दर वर्षीपिक्षा 50% द्राक्षांचे पीक आहे. बेमोसमी पावसाने द्वाक्षांपुढे नवेच संकट उभे केले. पाण्याचा तुटवडा, विजेचा प्रश्न, कर्जाचा डोंगर यांमुळे यंदा द्राक्ष निर्यातदार थकलेले आहेत. त्यात जागतिकीकरणाचे ढोल बडवले जात आहेत. विविध परदेशी फळांची वाढत्या प्रमाणावर आयात भारतात गेल्या ३ वर्षांपासून सुरू आहे

जर्मनीत जर्नेलसिंग हे भारतीय वंशाचे गृहस्य सँक्सोनी प्रांतात एका गावात राहत होते. त्या गावात त्यांचे 'गांधी' या नावाचे उपाहारगृह होते. जर्मन वंशाची पत्नी व चार मुलांसोबत ते सुखात राहत होते. जर्मनीत नवनाझींचे प्रस्थ वाढते आहे. इतर वंशांच्या नागरिकांची जर्मनीतून हकालपट्टी करण्याची वा त्यांना ठार मारण्याची नवनाझींची चळवळ जोरात आहे. जर्नेलसिंग नवनाझींचे भक्ष्य झाले. मुंडण केलेल्या जमावाने सिंग कुटुंबाला बेदम मारहाण केली. महात्मा गांधी यांच्याविषयी गलिच्छ शब्द त्यांनी वापरले. उपाहारगृहाची मोडतोड केली. अपमानित, भयभीत, बेघर सिंग कुटुंबीयांनी ते गाव, उपाहारगृह सोडून बर्लिनमध्ये आश्रय घेतला. सहृदय जर्मन नागरिकांनी त्यांना मदतीचा हात दिला. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका महिला अधिका-याने त्यांना आपल्या घरात आश्रय दिला. सिंग मूळचे पंजाबातले. नवनाझींच्या हल्ल्याने ते भेदरते. त्यांना आता पंजाबात परतण्याची ओढ लागली आहे. नवनाझी भारतातही आहेत. फादर स्टेन्स आणि त्यांच्या छोट्या निष्पाप मुलांना जाळणारे, इचलकरंजीला इदगाह मैदानावर महाआरतीच्या आग्रह धरून गोंधळ माजवणारे, कोल्हापुरात वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या नगरसेविका मुल्ला यांच्या घरावर हल्ला करणारे, मुसलमानांना मतदानाचा अधिकार नको म्हणणारे, ख्रिश्चनांवर हल्ला करणारे हे सर्व नवनाझीच नाहीत  काय? 

जागतिकीकरणाचे बोल आणि द्वाक्ष निर्यातदारांचा संघर्ष महाराष्ट्रातली द्राक्षे 10 वर्षांपासून लंडनला जात आहेत. प्रथम द्राक्ष बागायतदारांना सोन्याची कोंबडी सापडल्याचा आनंद झाला. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. द्राक्षांचे जागतिक उत्पादन 1993 मध्ये 65 दशलक्ष मेट्रिक टनांचे होते. 2000 मध्ये ते 70 दशलक्ष मेट्रिक टनांवर जाऊन पोचले आहे. राज्यातून 13 हजार मेट्रिक टनांची निर्यात करण्याचा उच्चांक 1996 साली गाठला गेला. जवळपास 900 कंटेनर्स (1 कंटेनर = 14.5 मेट्रिक टन) द्वाक्षे त्या वर्षी युरोपात गेली. यांत 80% प्रमाण नाशिकच्या द्राक्षांचे होते. यानंतर मात्र निर्यातीचे प्रमाण घसरले. गेल्या वर्षात राज्यातून 550 कंटेनर्स द्राक्षे युरोपला रवाना झाली. यंदा द्राक्षांची निर्यात यापेक्षा कमी होणार, असे चित्र आहे. खुद्द नाशिक जिल्ह्यात दर वर्षीपिक्षा ५०% द्राक्षांचे पीक आहे. बेमोसमी पावसाने द्वाक्षांपुढे नवेच संकट उभे केले. पाण्याचा तुटवडा, विजेचा प्रश्न, कर्जाचा डोंगर यांमुळे यंदा द्राक्ष निर्यातदार थकलेले आहेत. त्यात जागतिकीकरणाचे ढोल बडवले जात आहेत. विविध परदेशी फळांची वाढत्या प्रमाणावर आयात भारतात गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. ऑस्ट्रेलियन सफरचंदाने भारतीय सफरचंद उत्पादक शेतक-यांना धडकी भरायता मदत केली. द्राक्षांची निर्यात दिवसेंदिवस बेभरवशाची होत आहे. भारतीय बाजारपेठेत द्राक्षांना चांगला भाव मिळाला नाही तर महाराष्ट्रातले द्वाक्ष पीक व शेतक-यापुढे काय वाढून ठेवले आहे, कोण जाणे? 

मराठीचे जतन व संरक्षण कोण करणार?  
मुंबईत नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाचा ग्रंथमेळा सुररू आहे. या ग्रंथमेळ्यात मराठी भाषेच्या संदर्भात काही दैनिकांच्या संपादकांचा परिसंवाद झाला. ‘‘इंग्रजाळलेल्या मराठी युवा पुरवण्या : मराठी भाषेला तारक की मारक’’ हा विषय या परिसंवादात वादग्रस्त झाला. प्रसारमाध्यमांमध्ये सध्या ‘माहिती तंत्रज्ञान’ व ‘सर्व गोष्टींचे जागतिकीकरण’ हे मुद्दे चावून चोथा झालेत. सर्व काही अपरिहार्य आहे, असे सांगण्याची एक राष्ट्रीय प्रथा यात पडत चालली आहे. आपण काहीही रोखू शकत नाही. ते काळाचे गाणे आहे, आपल्यालाही गावेच लागणार; असे सांगणारी मंडळी आधुनिक मानण्याची परंपरा कधीच पडून गेली आहे. मराठी माणसाला आपली भाषा आणि संस्कृतीविषयी एक न्यूनगंड फार प्राचीन आहे. त्यातून संस्कृतीच्या संक्रमणाच्या काळात भाषेतही बदल अटळ, असा मतप्रवाह पुढे आला. दूषित भाषाव्यवहार चालवून घ्यावा लागेल, हा या मतप्रवाहाचा सूर. भाषेविषयी अनास्था भोंगळा व्यवहार यामुळे दृषित भाषाव्यवहाराची विषवल्ली बळकट होते आहे. यामुळेच सुंदर मराठी, सोपे मराठी वृत्तपत्रांतून वाचायला व दूरवित्रवाहिन्यांवर ऐकायला मिळत नाही. इंग्रजी शब्दांचा भडिमार, चुकीच्या वाक्यरचना, व्याकरणाची ऐशीतैशी झालेली मराठी आज आपण ऐकत वा वाचत असतो. हे टाळून मराठीचे जतन व संरक्षण झाले पाहिजे, पण ते कोण करणार?

पुणे महानगरपालिकेचा नवा विक्रम 
पुणे महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सत्तर कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला या सभेत मंजुरी देण्यात आली, जेमतेम सत्तर सेकंद चाललेल्या या सभेने सत्तर कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. बोटांवर मोजण्याइतके नगरसेवक, महापौर व उपमहापौर महत्त्वाच्या कामांमुळे अनुपस्थित- हे या सभेचे आणखी वेगळे वैशिष्ट्य. सभेचे अध्यक्ष खुर्चीत विराजमान होतात न होतात तोच अर्थसंकल्पाचा ठराव मांडला गेला व तो मंजूरही झाला. तसेच सभाही संपली आणि सभागृहात राष्ट्रगीत सुरू झाले. सभेचे कामकाज बराच वेळ चालेल या आशेने आलेले बरेच नगरसेवक अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी नंतर आले, पण तोपर्यंत सभाच संपलेली होती. सत्तर सेकंदांच्या कारभारात ७० कोटी 5लाख 88 हजार 600 रुपयांच्या अर्थसंकल्पाला कोणतीही चर्चा न होता मंजुरी मिळून गेली. आहे की नाही नवा विक्रम? हे विक्रम विधानसभा, संसदेत करू नयेत म्हणजे मिळविली!

Tags: पुणे मनपाचा नवा विक्रम मराठीचे रक्षण नवनाझी pune manapacha nava vikram marathiche rakshan navnazi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके