श्री. सहस्रबुद्धे या कार्याने चिकाटीने संयोजन करतील म्हणन मामांनी ही धुरा त्यांच्यावर सोपवली आहे. नव्या राजकीय संदर्भातही ह्या कार्याचे विशेष महत्व आहे.
श्री. मामा क्षीरसागर हेच प्रामुख्याने आचार्य कुलाची धुरा आजवर सांभाळीत. वयाची पंचाहत्तरी ओलांडतांना ही धुरा आता अन्य कोणी तरी सांभाळावी, असे स्वाभाविकच त्यांना वाटू लागले. डोळयांनी कमी दिसू लागले आणि आणखीही आजाराने घर केले तेव्हापासून मामांना हीच एक चिंता लागून राहिली. कुठलेही सत्कार्य द्वारकेसारखे एकखांबी असून चालतच नाही. आचार्य कुलाच्या कार्यात मामांना अनेकांची साथ होती. पण मामांच्या पुढारपणाखाली काम करण्यातच त्यांना धन्यता वाटत होती.
श्री. दि. ह. सहस्रबुद्धे, प्राचार्य राम शेवाळकर, श्री. तारे यांना अलीकडे श्री. प्र. द. पुराणिक यांचीही जोड मिळाली आहे. मामांनी निकराने हे काम आता इतर कोणी स्वीकारावे असा आग्रह धरला तेव्हा मित्राचा नाइलाज झाला आणि श्री. दि. ह. सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्रातील आचार्य कुलाची धुरा आता स्वीकारली आहे. श्री. दि. ह. सहस्त्रबुद्धे हे शिक्षणक्षेत्रातील एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्वही त्यांनी केले आहे. शिक्षणातील महत्त्वाचे साधन शिक्षक. त्यांचे प्रबोधन झाल्याशिवाय शिक्षणाचा कस वाढणार नाही, या जाणिवेने त्यांनी नागपूरमध्ये शिक्षक प्रबोधिनीचे कार्य सुरू केले आणि नेटाने सुरू ठेवले.
मामा क्षीरसागर अमृत महोत्सवाचे कार्य त्यांनी तडीला नेले. विदर्भातील ज्या शाळा आचार्य कुल संकल्पनेप्रमाणे प्रयोग करु इच्छितात, त्यांच्या मार्गदर्शनाचे काम ते करतात. आचार्य कुलाचे कार्य हे एका अर्थाने शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे कार्यच आहे. निष्ठाशून्यता शिक्षणक्षेत्रात फार बोकाळली आहे. त्या ठिकाणी ज्ञाननिष्ठा, विद्यार्थीनिष्ठा आणि समाजनिष्ठा पुनःस्थापित करण्याचे भगीरथ कार्य आहे. श्री. सहस्रबुद्धे या कार्याने चिकाटीने संयोजन करतील म्हणन मामांनी ही धुरा त्यांच्यावर सोपवली आहे. नव्या राजकीय संदर्भातही ह्या कार्याचे विशेष महत्व आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या