डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जरी माझ्यामधेच निद्रिस्त आहे सॉक्रेटिस
हृदयाच्या आत मुका झालेला कालिदास

अंतर्यामी
हे मूक शब्द

कितीतरी अव्यक्त विदेही शब्द
शापित ऊर्वशीप्रमाणे
निश्चेष्ट पडले आहेत
जीवनभर प्रयत्न करूनही
उठवू नाही शकलो त्यांना

मी आहे
उधार घेतलेल्या शब्दांनी
जीवनाची शेती करणारा
एक शेतमजूर
मंत्रांच्या शब्दांनी
विग्रहाची पूजा करणारा
व्यापारी

जरी माझ्यामधेच निद्रिस्त आहे सॉक्रेटिस
हृदयाच्या आत मुका झालेला कालिदास

अंतर्यामी
हे मूक शब्द

(मूळ आसामी कविता)

वीरेंद्रकुमार भट्टाचार्य
जन्म : 1924, मृत्यू : 1998 

अनुवाद : निशिकांत मिरजकर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके