डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ऊठ, माझ्या प्रिय प्रदेशाच्या यौवना, चल पुढे
कठ, मातृभूमी, दाखव आपले सौंदर्य आणि मोहकपणा;
श्वराचे वरदान आता आपल्याला येणाऱ्या सर्व युगांसाठी
आपण सारे उठू या, सतत पुढे जात जिंकण्यासाठी!

सुंदर मिझो डोंगराळ प्रदेशा, तू आहेस सर्वात सुंदर स्वप्नभूमीसारखा,
तुझ्या डोंगरांवर आणि दऱ्यांमध्ये नांदते आहे शाश्वत शांती,
इथे फुलतात फुले, सुखाचा गोड गंध वाहतो वाऱ्याच्या झुलुकीतून,
तुझी गाणी गातो आम्ही, हे सौंदर्यभूमी, आमच्या मिझो-भूमी!

होय, गोड आहेस तू आमच्या मिझो डोंगराळ प्रदेशा,
'इथे प्याला सुखाचा पितो आम्ही
तुझ्या डोंगरांमध्ये आणि उन्हाळी झळांमध्ये.
लोक प्रत्येक डोंगरातले राहतात परिपूर्ण एकोप्याने,
अरे, तुलनेच्या पलीकडे आहेस तू, आमच्या सुंदर मिझो डोंगराळ प्रदेशा!

इथे प्राचीन काळचे दिवस घालवले आम्ही भीतीमध्ये भुताखेतांच्या,
इथे घालवली काळी युगे आम्ही भीतीमधे शबूंच्या.
रात्र सरल्यावर, आता स्वातंत्र्याची पहाट करतेय स्वागत तुझे
सुख आणि शांती गुंफलेली तुझ्या डोंगरदऱ्यांमध्ये.

आमच्या वीणा आणि तारा झंकारताहेत एका सुरात
गोड गाणी गर्जू आम्ही आमच्या हृदयात जपलेल्या भूमीची,
जाऊ देत स्वर आमचे दुमदुमत किनाऱ्यापासून किनाऱ्यापर्यंत
गा, गा, या भूमीची स्तुतिस्तोत्रे सगाया भूप्रदेशांच्या आधी.

ऊठ, माझ्या प्रिय प्रदेशाच्या यौवना, चल पुढे
कठ, मातृभूमी, दाखव आपले सौंदर्य आणि मोहकपणा;
श्वराचे वरदान आता आपल्याला येणाऱ्या सर्व युगांसाठी
आपण सारे उठू या, सतत पुढे जात जिंकण्यासाठी!

रोकुंगा (मूळ मिझो कविता)
अनुवाद : निशिकांत मिरजकर

Tags: निशिकांत मिरजकर अनुवाद मूळ मिझो कविता रोकुंगा आमचा सुंदर मिझो डोंगराळ प्रदेश Our Beautiful Mizo Hills Region Rokunga [Original Mizo Poem) Translation - Nishikant Mirajkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके