डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चला जाऊ असेच पश्चिमेच्या देशांना आणि सगळ्या जगभर,
पूर्वेचा वारा नाही कधी व्हायचा मृत आणि वाहील अविरत,
जशी राहील पृथ्वी विश्वाच्या अंतर्गत.

पूर्व भारतातल्या दूरच्या प्रदेशात वसलेल्या
मिझोराममधल्या माझ्या जन्मस्थानातून निघून,
मी मिसळलो जिथे पूर्वैया वाहतो झुळूझुळू 
आम्ही येतो एकत्र... आसामी, मणिपुरी, मिझो, त्रिपुरी
आणि पश्चिम बंगालचा यजमान समाज
आम्ही आहोत सुखी
पूर्वेच्या वाऱ्याने एकत्र बांधलेले सारे विभाग.

बघा बघा! कोण गाताहेत सुखाने एकाच व्यासपीठावर
पूर्वैया बांधतोय सगळ्यांना एकत्रच.
आमचा एकच स्वर आणि आमचा एकच चरण
साऱ्या उपनद्या वाहताहेत एकाच पूर्वैयाच्या दरीमधे,
राष्ट्रीय मुख्य धारेच्या सागराला मिळण्यासाठी.

चला जाऊ असेच पश्चिमेच्या देशांना आणि सगळ्या जगभर,
पूर्वेचा वारा नाही कधी व्हायचा मृत आणि वाहील अविरत,
जशी राहील पृथ्वी विश्वाच्या अंतर्गत.

[मूळ मिझो कविता]

- जेम्स दोखुमा
जन्म : 1932, मिझोराम

अनुवाद : निशिकांत मिरजकर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके