डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पायथॉगोरस यांना राजकीय कारणामुळे इजिप्तला जावे लागले. त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रार्थना मंदिरांना भेटी दिल्या. मात्र तिथे त्यांना प्रवेश मिळाला नाही. शेवटी डायसपॉलिस येथे मंदिराच्या सर्व अटी स्वीकारल्यानंतर त्यांना प्रवेश मिळाला. त्या वेळी इजिप्तमध्ये काही परंपरा होत्या, त्यांचाच प्रभाव पायथॉगोरस यांच्या जीवनावर पडलेला आढळतो. त्यांनी सामोस येथे अभ्यासकेन्द्र सुरू केले. या अभ्यासकेन्द्राचे नियम कडक होते आणि त्या नियमांचे पालन काटेकोरपणे केले जात असे.

तत्त्वज्ञ गणिती आणि शास्त्र खगोल। पायाथॉगोरस जाणी सखोल।

इसवीसन पूर्व त्यांचा काल। नामी सिध्दांत शोधिला।।

टेकडी अथवा उंच वृक्षकी। जाणावया उंची नेकी।

नको चढाया व्यर्थकी। नियम कामा येतसे।।

काटकोन त्रिकोण योजिला। कर्णाचा वर्ग काढला।

उंची पायाचा वर्ग मिळविला। तो कर्ण वर्गाशी जुळतसे।।

ग्रहांचे निरीक्षण केले। तयांचे भ्रण अभ्यासिले।

अक्षांचे महत्त्व जाणिले। स्वयं अक्षाभोवती भ्रणाचे।।

पायथॉगोरस म्हटले की आठवतो तो त्याचा काटकोन त्रिकोणाविषयक सिद्धांत. माध्यमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याला या सिद्धांताला सामोरे जावेच लागते. (कर्ण)2=(पाया)2+(उंची)2 म्हणजेच ‘कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग.’ हा सिद्धांत इ.स.पूर्व पाचशे वर्षांच्या कालखंडात मांडला गेला. त्यामुळे पायथॉगोरसला पहिला खरा गणिती मानले जाते.

तसे पाहिले तर पायथॉगोरस यांचे आयुष्य हे धर्म, विज्ञान आणि रहस्य यांचे मिश्रण आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांबद्दल साशंकता आहे. त्यांचे लिखाणही उपलब्ध नाही. त्यांनी स्थापन केलेल्या गुरुकुलाने गणित आणि इतर अनेक विषयांत योगदान दिले आहे. मात्र त्यातील नेमके कोणते योगदान पायथॉगोरस यांचे आहे याबद्दल स्पष्टता नाही. या सर्वांचा उगम त्यांच्या जीवनाच्या प्रवासात दडलेला आहे. पायथॉगोरस यांचे वडील नेसास्कस हे व्यापारी होते. दुष्काळामध्ये त्यांनी सामोस या शहराला मक्याचा पुरवठा केल्यामुळे त्यांना सामोसचे नागरिकत्व देण्यात आले. त्यांची अनेक ठिकाणी भटकंती चालू असे, त्यामुळे पायथॉगोरस यांना इटलीसह अनेक ठिकाणांना भेटी देता आल्या.

पायथॉगोरस यांना राजकीय कारणामुळे इजिप्तला जावे लागले. त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रार्थना मंदिरांना भेटी दिल्या. मात्र तिथे त्यांना प्रवेश मिळाला नाही. शेवटी डायसपॉलिस येथे मंदिराच्या सर्व अटी स्वीकारल्यानंतर त्यांना प्रवेश मिळाला. त्या वेळी इजिप्तमध्ये काही परंपरा होत्या, त्यांचाच प्रभाव पायथॉगोरस यांच्या जीवनावर पडलेला आढळतो. त्यांनी सामोस येथे अभ्यासकेन्द्र सुरू केले. या अभ्यासकेन्द्राचे नियम कडक होते आणि त्या नियमांचे पालन काटेकोरपणे केले जात असे.

पायथागोरस यांचा पुढील बाबींवर विश्वास होता... त्यांच्या मते वास्तवाचे मूळ हे गणितावर आधारलेले आहे. आध्यात्मिक शुद्धतेसाठी तत्त्वज्ञानाचा वापर करता येईल. आत्म्याचे उत्थान करून त्याचे दैवी शक्तीशी मिलन घडवून आणता येईल. काही खुणांध्ये रहस्यमयता दडलेली आहे. अभ्यासकेन्द्रातील अभ्यासकांनी गुप्तता आणि निष्ठा काटेकोरपणे पाळायला हवी.

विशेष म्हणजे स्त्री आणि पुरुष दोहोंनाही या अभ्यासकेंद्रात मुक्त प्रवेश होता. या अभ्यासकेन्द्रातील स्त्रियांनी पुढे तत्त्वज्ञान विषयात भरीव कामगिरी केली. पायथॉगोरस आणि अभ्यास केन्द्रामधील संशोधकांनी गणितातील सिद्धांतांचा अभ्यास केला, त्याचप्रमाणे नवीन सिद्धांतांचाही शोध लावला. त्यातील काहींचाच इथे उल्लेख करता येईल.

त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज दोन काटकोनांएवढी असते. त्याचप्रमाणे बहुभुज (पॉलिगॉन) आकृतीच्या आंतरकोनांची बेरीज ही (2z -4) काटकोन एवढी असते. दिलेल्या क्षेत्रफळाएवढे क्षेत्रफळ असणारी आकृती काढणे. पाच नियमित घनाकृतीविषयी त्यांना माहिती होती. पृथ्वी गोल असून ती विश्वाच्या केन्द्रस्थानी आहे, अशी त्यांची धारणा होती. चंद्राने पृथ्वीच्या विषुववृत्ताशी विशिष्ट कोन केला आहे, हेही त्यांना माहीत होते. शिवाय सायंकाळी आणि सकाळी दिसणारा शुक्र ग्रह तोच आहे, याची त्यांना कल्पना होती. 

Tags: क्षेत्रफळ काटकोन त्रिकोणाविषयक सिद्धांत इजिप्त सामोस अभ्यासकेन्द्र पायथागोरस area right angled triangle theory Egypt Samos Study Center Pythagoras weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके