डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रस्तावनाकार डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी नोंदवले आहे की पदवीधर झालेल्या, नोकऱ्या करणाऱ्या अनेक दलितांची आत्मकथने प्रसिद्ध झाली, गाजली.’उणे- अधिक' हे जेमतेम साक्षर असलेल्याने लिहिलेले पुस्तक, अन्याय-अत्याचारांविषयी रडगाणे न गाता प्राप्त परिस्थितीतून आपल्या शक्तिबुद्धीनुसार धडपड करीत अर्थपूर्ण जीवन जगणाराची साधीसुधी, पण हृदयाला भिडणारी कथा आहे. 

मराठी कानडी सीमारेषेवरील अंकली या छोटेखानी गावात एका जुनाट इमारतीत पहिली ते चवथीचे वर्ग भरत. दुसरीच्या आत बसलेल्या तीस-पस्तीस मुलांना गुरुजी गणित शिकवीत. एका खिडकीच्या बाहेरून चार-पाच मुले दाटीवाटीने उभे राहून ते शिकण्याचा प्रयत्न करीत. काही शब्द कानांवर पडत, बाकीचे वाऱ्यावर उडून जात. गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसत. मग दांडके लांबूनच फेकून गुरुजी शिक्षा करीत. 

खिडकीच्या कडांची माती घासून खाली पडे. म्हणून 'त्या मुलांना ती शेणमातीने सारवून द्यावी लागे. बाळू रायमानेला ते करणे नको वाटे. त्याने शाळेला रामराम ठोकला. कानडी दुसऱ्या वर्गात त्याचे शिक्षण संपले. 

जनावरांची कातडी विकत घेणे, वनस्पती वापरून ती कमावणे व चांभार यांना विकणे- हा वडिलांचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न बाळूला जमला नाही. कंत्राटदाराच्या हाताखाली काही दिवस काम केले. मग तंबाखूच्या व्यापारात शिरला. भरपूर कमाई झाली; तेव्हा शेती आणि बैल बारदाना केला. भागीदारांना फसविले, काही आडाखे चुकले. शिक्षण नसलेल्या हिशोब व लायसन्सची लिखापढी जमली नाही.’कधी ओढा दुथडी भरून वाहिला, कधी कोरडा | ठणठणीत राहिला.’ याचा मुलगा मॅट्रिक दोनदा नापास झाला. मधला एम. ए. होऊन प्रोफेसर झाला.

लांब औरंगाबादेत स्थायिक झाला. धाकटा मारुती बेताचे शिकून गावी शेती करू लागला. म्हाताऱ्या आई-बापांना सांभाळत. प्रोफेसर झालेल्या लक्षुमणने वही आणून दिली. तुमच्या आठवणी लिहून काढा सांगितले. सुचले तसे, जमले तसे बाळाप्पांनी लिहिले. डॉ. मनोहर झिलठे यांनी त्यावर थोडा हात फिरवला.”उणे-अधिक" या नावाने हे आगळेवेगळे आत्मकथन 2003च्या अखेरीस प्रसिद्ध झाले. 

प्रस्तावनाकार डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी नोंदवले आहे की पदवीधर झालेल्या, नोकऱ्या करणाऱ्या अनेक दलितांची आत्मकथने प्रसिद्ध झाली, गाजली.’उणे- अधिक' हे जेमतेम साक्षर असलेल्याने लिहिलेले पुस्तक, अन्याय-अत्याचारांविषयी रडगाणे न गाता प्राप्त परिस्थितीतून आपल्या शक्तिबुद्धीनुसार धडपड करीत अर्थपूर्ण जीवन जगणाराची साधीसुधी, पण हृदयाला भिडणारी कथा आहे. 

आपली कहाणी सांगून झाल्यावर बाळाप्पा म्हणतात, 'तुम्हा सर्वांना जर आता खरी चौकशी करायची असेल तर तुम्ही असे करा- तुमचे आजोबा धोंडिबा सुवाण्णा यांची मिळकत होती तेथून चौकशी करून मी इतके नुकसान केले असे दाखवून मला दोष द्यावा.’ आहे की नाही इंग्याचा रोखठोकपणा!
 

Tags: मनोहर झीलठे नागनाथ कोतापल्ले आत्मकथन दलित उणे-अधिक पन्नालाल सुराणा दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी सुनीलकुमार आवटे लेख माणूस आणि जीवनमूल्ये वि. स. खांडेकर महात्मा गांधी साधना साहित्य परिचय manohar zilthe nagnath kotapalle atmakathan dalit literature une-adhik pannalal surana promithious sunilkumar awate manus ani jivanmulye v. s. khandekar mahatma Gandhi Marathi literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके