डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

तिसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी रेल्वे स्टेशनजवळचे मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यक्रम झाला. नंतर सीताबर्डीवरील धीरन कन्या विद्यालय. दुपारी वेळ होता म्हणून धंतोलीतील टिळक विद्यालय. आदल्या रात्री डॉ.कुसुमताई वांकरना फोन केला होता. एवढ्या मध्यवस्तीतील ती शाळा 1922 साली सुरू झाली होती. ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे बंद पडलेली, परत 1948 साली सुरू झाली. मुला-मुलींचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. प्राथमिकच्या मुख्याध्यापिका जवारेबाईंना आपल्या बालपणातील आठवणी आल्या. ‘आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर’ हे गीत त्यांनी मुलांकडून म्हणवून घेतले. त्यांचा उत्साह अक्षरश: गगनात मावत नव्हता.

‘तरुण पिढीला हिंसाचार व भोगवाद यापासून वाचवा’ हा मुद्दा घेऊन साने गुरुजी कथामालेने गेल्या 30 जानेवारीपासून ‘जनजागरण अभियान’ सुरू केले. वर्ध्याचे डॉ.गजानन कोटेवार मोठे कल्पक व उपक्रमशील कार्यकर्ते. 5 व 7 जानेवारीला कथामालेचे 41 वे वार्षिक अधिवेशन त्यांनी म्हणजे त्यांच्या सहकारी मित्र-मैत्रिणींनी अतिशय उत्साही वातावरणात पार पाडले होते. तेथून लगेच त्यांनी प्राचार्य अमृत येऊलकरना घेऊन नागपुरात मोर्चेबांधणी केली. शिक्षण उपसंचालक श्री.नांदेडेसाहेब यांना भेटून ‘या शांतीयात्रेला शाळांनी सहकार्य करायला हरकत नाही’ असे पत्र घेतले. काही मुख्याध्यापकांना वाटत असते की, साने गुरुजींच्या शिकवणुकीनुसार चालणाऱ्या उपक्रमांना सहकार्य करायलासुद्धा अधिकृत शासकीय परवानगी असलेली बरी! गुरुजींचे नाव माहीत नाही असे विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक व संस्थाचालक कुठे कुठे भेटतात. हा त्यांचा दोष नाही. आपण कुठे कमी पडतो आहोत याचा कार्यकर्त्यांनी विचार करायला हवा.

30 जानेवारीला धरमपेठेतील सर्वोदय आश्रमात प्रार्थना सभा झाल्यावर डॉ.कोटेवारांनी सजवलेला ‘शांतीयात्रा रथ’ निघाला. सदरमधील तिडके विद्यालयात हजाराच्यावर मुले-मुली जमली होती. प्रतिमेला पुष्पहार आधीच घालून ठेवला होता. उपचारात कमीतकमी वेळ जावा अशी सप्रेम विनंती सर्वत्र आधीच करण्यात आली होती. त्याचा सुपरिणाम अनुभवाला येत होता. प्राचार्य मेहतांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य येऊलकरांनी साने गुरुजींचा संक्षिप्त परिचय करून दिला. सुश्री मीनल रोहनकरनी ‘सानी’ची गोष्ट सांगितली. गुडगाव, सतना व इगतपुरी येथे शाळकरी मुलांनी सोबत्यांचे खून केल्याच्या गेल्या महिनाभरातील घटनांचा व 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईतील काही तरुणांनी रस्त्यारस्त्यांवर हैदोस घालून एका तरुणीचा विनयभंग करून, नव्या वर्षाची सुरुवात केल्याचा उल्लेख करून मी मांडले की या भोगवादी व हिंसाचारी वृत्तीपासून निदान तरुण पिढीला तरी वाचवायला हवे. हे काम मुख्यतः लोकांनी म्हणजे पालक व शिक्षकांनी करायला हवे. उत्तान चित्रे वारंवार प्रदर्शित करण्याचे टीव्ही वाहिन्यांनी थांबवावे, वृत्तपत्रांनीही तशी चित्रे व बातम्या छापू नयेत यासाठी त्यांच्या कर्त्याधर्त्यांना पत्र पाठवावे, भेटून सांगावे आणि आजूबाजूला घाण असली तरी मुला-मुलींनी स्वतःला वाचवावे. श्री.मा.म.गडकरी वकिलांनी छानसे गाणे म्हटले. थोड्या वेळानंतर जि.प.प्रशालेत तसाच कार्यक्रम झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी अंजुमनच्या प्रांगणात पोहोचलो. तिची स्थापना 1889 साली झाली होती. विस्तीर्ण मैदान, विखुरलेल्या इमारती, शिक्षक-शिक्षिकांची लगबग, सगळे प्रसन्न वातावरण होते. आमच्या कार्यक्रमानंतर अक्रम पठाण या शिक्षकांनी आभार मानताना ‘ग्यानबाचे अर्थकारण’चा उल्लेख केला. भोगवाद व हिंसाचार वाढवायचे काम आपला नफा जास्तीतजास्त वाढवू इच्छिणारे उद्योगपती व व्यापार करीत आहेत, त्यांच्यावर लोकांनी दडपण आणले पाहिजे असे ते म्हणाले. नंतर कार्यालयात बसलो असताना एक तरुण बाई आल्या. म्हणाल्या, ‘अनुशासन’ शब्द ऐकून मी माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजात जाण्याआधी इकडे वळले. नैतिक मूल्यांची शिकवण देण्याचे काम थांबले आहे, त्याला गती दिली पाहिजे. त्यांनी आपले नाव सांगितले लीना गहाणे.

सेंट उर्सूला विद्यालय (मुलींसाठी) ही संस्था तर 1856 साली स्थापन झालेली. त्यावेळच्या मध्य भारतात अशा प्रकारच्या संस्था सुरू करणारे शिक्षण महर्षींची दूरदृष्टी व चिकाटी यांना वंदन केले. सुश्री माया मॅडम आणि प्राचार्य रंजना सिंह यांनीही असे उपक्रम आम्ही शाळेत चालवूत असे म्हटले.

तिसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी रेल्वे स्टेशनजवळचे मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यक्रम झाला. नंतर सीताबर्डीवरील धीरन कन्या विद्यालय. दुपारी वेळ होता म्हणून धंतोलीतील टिळक विद्यालय. आदल्या रात्री डॉ.कुसुमताई वांकरना फोन केला होता. एवढ्या मध्यवस्तीतील ती शाळा 1922 साली सुरू झाली होती. ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे बंद पडलेली, परत 1948 साली सुरू झाली. मुला-मुलींचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. प्राथमिकच्या मुख्याध्यापिका जवारेबाईंना आपल्या बालपणातील आठवणी आल्या. ‘आम्ही देवाचे मजूर, आम्ही देशाचे मजूर’ हे गीत त्यांनी मुलांकडून म्हणवून घेतले. त्यांचा उत्साह अक्षरश: गगनात मावत नव्हता.

चौथ्या दिवशी अजनी पलीकडील पार्वतीनगरातील जीवन शिक्षण विद्यालय. तेथे येऊलकरांचे परिचित संस्थाचालक व शिक्षक भेटले. शाळेत गुरुजींचा फोटो यापुढे नीट लावून ठेवू असे म्हणाले. त्यानंतर भगवाननगरमधील सुधाकरराव झाडे विद्यालय-कोटेवारांनी दोन रुपयेवाली छोटी पुस्तिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर व गाडगे महाराजांवरही काढली आहेत. ती तेथे खूप खपली. 20 फेब्रुवारीपर्यंत ही शांतीयात्रा चालत राहणार आहे.

Tags: पन्नालाल सुराणा शांतियात्रा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके