डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ओझे माझे
खारीक खोबरे
देईन खाऊ
पाठीवरले  
 

नको रे म्हणू
लंबू लंबू
पाठीवर ओझे
किती रे सांगू
ओझे माझे
खारीक खोबरे
देईन खाऊ
पाठीवरले  
खाऊचे झाड  
वाळवंटात
पाणी नसते
ओठा-पोटात
चालायची तर 
मोठी रे गंमत
रुततात पाय
उन्हाची रंगत
इतके करून
खाऊ आणतो
तरी मुला तू
लंबू म्हणतो!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके