डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

20 ऑगस्ट 05 'साधना’च्या अंकात 'साधना परिवारात हे नसावे' या प्रतिसादमधील पत्रासंदर्भात. 

सदर पत्रलेखकाने, लीलाधरने रतनताईंच्या आठवणीवर म्हणजे, रतनताईंनी हिंदुत्ववादी वाटल्यावरून शिक्षिकेला काढून टाकण्याच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे आणि तोही लोकशाहीच्या नावाने. 

रतनताईंच्या या कृत्याचा लोकशाहीशी काहीही संबंध नाही. रतनताई शाळा चालवत होत्या, संसद नव्हे. हिंदुत्ववाद्यांना आपला प्रचार करण्यासाठी स्वतःच्या शाळा आहेत. लोकशाहीच्या नावाने त्या चालू दिल्या जातात, मदरसे चालू दिले जातात. हेच चुकीचे आहे. 

साने गुरुजी विद्यालय हे समाजवाद्यांनी विशिष्ट विचारधारा रुजविण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम म्हणून काढले आहे. ही विचारधारा घटनेतील मूल्यांशी सुसंगत व पूरक अशी आहे. म्हणून ते राष्ट्रीय कार्य आहे, या विचारधारेत लोकशाहीचे मूल्यही आहे. लोकशाही, परधर्मद्वेष आणि हिंसक मार्गावर श्रद्धा, ही हिंदुत्ववाद्यांची राष्ट्रघातक मूल्ये आहेत. ही घटनाविरोधी तर आहेतच, पण हिंदु धर्म विरोधीही आहेत, म्हणजेच हिंदूंचे धर्मांतर करू इच्छिणारी आहेत. मुलांना खरा धर्म शिकवू इच्छिणाऱ्या साने गुरुजी विद्यालयातून, अशा शिक्षिकांची हकालपट्टी करणे हेच रतनताईंचे परमकर्तव्य होते. तिने ते सतर्क राहून बजावले, याबद्दल तिची प्रशंसाच केली पाहिजे.

खरे तर, बाबरीविध्यंस आणि गुजरात वंशसंहार या दोन कार्यक्रमांतून हिंदुत्ववाद्यांनी आपले जे बीभत्स रूप दाखविले आहे, ते पाहून सुसंस्कृत समाजाने फक्त साधना, गुरुजी, सेवादल, समाजवादी परिवाराने नव्हे. त्यांना आपल्या कोणत्याच मंचावर येऊ न देण्याचे आणि त्यांच्या कोणत्याच मंचावर यांच्यापैकी गणमान्य व्यक्तीनी न जाण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे. आपापल्या मित्रमंडळीतूनही या विषकन्या पुत्रांना वगळले, तर ते क्षम्यच ठरेल. या मताला आणखी कारण म्हणजे हिंदुत्ववाद्यांची कपटी प्रचारपध्दती. 'साधने’च्या मंचावरही असे अनेक हिंदुत्ववादी 'ट्रोजन हॉर्स' कधीकधी वाजतगाजत आणले जातात. पण वाचकांची मनोभूमी मानवीय सुसंस्कारांनी तयार असल्याने त्याचे फारसे दुष्परिणाम होत नाहीत. संस्कारक्षम वयातील साने गुरुजी विद्यालयातील निरागस मुलांवर ते झाले असते. रतनताईंनी योग्य तेच केले.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके