डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सहाव्या दिवशी भोवताली वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळे कपडे घातलेल्या लोकांकडे बघून हा माणूस म्हणाला: 'मला माहीत नसलेल्या भाषांमध्ये बोलणारी ही माणसं उद्या मलाच मारून टाकतील. काहीतरी करून ह्यांचा नाश केला पाहिजे.' 

शेवटी एके दिवशी ही सुंदर पृथ्वी सूर्यमालिकेत तयार झाली. फळाफुलांनी बहरलेल्या दाट झाडांच्या जंगलामध्ये इतर प्राण्यांबरोबर गुण्यागोविंदाने माणूस राहू लागला. पहिल्या दिवशी तो म्हणाला... 'ह्या सुंदर परिसरामध्ये आपण राहण्यासाठी घर बांधू या' कंक्रीट व लोखंडाचा उपयोग करून त्याने घरं बांधली. मोठमोठी शहर निर्माण केली. माणूस म्हणाला : 'छान!’

दुसऱ्या दिवशी चहूकडे पसरलेल्या पाण्याकडे बघून तो म्हणाला, 'आपण आपल्या येथील साचलेला सगळा कचरा ह्या पाण्यात टाकून देऊ. म्हणजे आपलं घर चकचकीत राहील. त्याप्रमाणे गटारं बांधली. पाण्यात सगळा कचरा जाऊ लागला. पाणी गढूळ होऊ लागलं. घाण वास येऊ लागला. घरात बसून माणूस म्हणाला, ‘छान!’

तिसऱ्या दिवशी माणूस भोवतालच्या दाट जंगलाकडे बपून म्हणाला :  आपण ही झाडे तोडून टाकू या. व या लाकडाचा उपयोग करून आपले घर सजवू या.' त्याप्रमाणे झाडे तोडू लागला. भोवतालचं रान ओसाड पडले. पाऊस कमी पडू लागला. प्राणी पाण्याविना तडफडू लागले. माणूस म्हणाला 'छान!'

चौथ्या दिवशी रानावनात बागडत असलेल्या काही शिल्लक राहिलेल्या प्राण्यांकडे त्याने बघितले. करण्यासारखे दुसरे काही काम त्याच्याकडे नव्हते. तो म्हणाला: ‘ह्या प्राण्यांना आपण पिंजऱ्यात ठेवून टाकू या. ते आपले मनोरंजन करतील. हिंस्त्र श्वापदांची शिकार करू या. जिभेचे चोचले पुरतील.' हत्यारे जमविली, माणसे गोळा झाली. शिकारी तयार झाले. पण त्यानंतर या जगाच्या पाठीवर एकही प्राणी जिवंत राहू शकला नाही. माणूस म्हणाला 'छान!'

पाचव्या दिवशी गार वारा सुटला होता. माणूस म्हणाला: ‘यानंतर आपण आपल्या येथील कचरा हवेतच सोडू या. गटार बांधण्यासाठी त्रास जास्त होतो. हवेतच कचरा उडू लागला. उडून जाण्यासाठी कचरा हलका केला गेला. हवा जड झाली. कोंदटलेल्या वातावरणामध्ये प्राणी गुदमरून मरू लागले. माणूस म्हणाला 'छान!'

सहाव्या दिवशी भोवताली वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळे कपडे घातलेल्या लोकांकडे बघून हा माणूस म्हणाला: 'मला माहीत नसलेल्या भाषांमध्ये बोलणारी ही माणसं उद्या मलाच मारून टाकतील. काहीतरी करून ह्यांचा नाश केला पाहिजे.' 

मारक शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यात आली. मोठमोठी यंत्र तयार करण्यात आली. क्षणभरात आग ओकणारी ही यंत्रणा माणसांचा नायनाट करायला लागली. माणूस म्हणाला, ‘छान!’
मग सातव्या दिवशी माणूस चिरविश्रांती घेऊ लागला. पृथ्वी तशीच राहिली. त्या जगातून माणूस निःशेष झाला. मग काय! सगळं कसं छान! छान!!

(मैक्सिको सिटी नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनाच्या आधारे)

Tags: चंगळवाद मानवी संस्कृती पर्यावरण ऱ्हास पर्यावरण Mankind Environment weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके