डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जनसामान्यांची नाट्यप्रेमी कु्चंबणा दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटक राज्यातील एका छोट्याशा गावात फार चांगले प्रयत्न गेली दहा वर्षे केले जात आहेत. जोग फॉल्सजवळ असलेले हेग्गोडू हे सुमारे हजारेक लोकसंख्या असलेले एक छोटेसे खेडे. 'पक्षगान' सारखे पारंपरिक नाटक करणाऱ्या या गावातील हौशी कलाकारांनी 'एवम् इंद्रजीत, 'ईडिपस', 'आधे अधूरे' सारखी नाटकं करून आसपासच्या खेड्यांतल्या लोकांकडून सुद्धा वाहवा मिळविली. पण नाटक बघणारे गावकरी नुसते शिट्ट्या आणि टाळी वाजवणारे नव्हते. 

जनसामान्यांची नाट्यप्रेमी कु्चंबणा दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटक राज्यातील एका छोट्याशा गावात फार चांगले प्रयत्न गेली दहा वर्षे केले जात आहेत. जोग फॉल्सजवळ असलेले हेग्गोडू हे सुमारे हजारेक लोकसंख्या असलेले एक छोटेसे खेडे. 'पक्षगान' सारखे पारंपरिक नाटक करणाऱ्या या गावातील हौशी कलाकारांनी 'एवम् इंद्रजीत, 'ईडिपस', 'आधे अधूरे' सारखी नाटकं करून आसपासच्या खेड्यांतल्या लोकांकडून सुद्धा वाहवा मिळविली. पण नाटक बघणारे गावकरी नुसते शिट्ट्या आणि टाळी वाजवणारे नव्हते. 

याच लोकांनी पुढाकार घेऊन शासनाकडून काडीची अपेक्षा न करता गावामध्ये सुमारे तीन लाख रुपये खर्च करून एक थिएटर बांधलं - 'शिवराम कारंध रंगमंदिर'. पूर्ण थिएटर विटांच्या बांधकामाचे असून कुठलाही डामडौत नाही. ध्वनिसंयोजन उत्कृष्ट आहे. अनावश्यक खर्च पूर्णपणे टाळला आहे. ह्याच गाव के. व्ही. सुबण्णा ह्यांना अभिजात चित्रपटाचा व आधुनिक नाटकांचा हव्यास. ह्यांच्याच पुढाकाराने ह्या सगळ्या मंडळींनी मिळून नाट्यप्रयोगासाठी 'नीळकंठेश्वर नाट्य संघ' (नीनासम्) संस्था उभारली. 

एवढ्या मोठ्या थिएटरचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी 1980 मध्ये नाट्यशिक्षणासाठी नीनासन् रंगशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण शाळेच्या (National School of Drama, Delhi) धर्तीवर एक वर्षाचे नाट्यशिक्षण दिले जाते. कर्नाटक नाटक अकॅडमी व पृथ्वीराज मेमोरियल ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती 15-20 विद्यार्थ्यांना मिळते.

हे केंद्र फक्त शिक्षण देऊन थांबत नसून या विद्यार्थ्यांना लोकांसमोर आणण्यासाठी राज्यातील इतर प्रेक्षकांसाठी रॅपोर्टरी काढून गेली 7 वर्षे प्रयोग करत आहेत. ह्या परिक्रमेसाठी त्यांनी सरकारवर विसंबून न राहता कर्नाटकाच्या वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या पण नीनासनवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींकडून देणगी स्वरूपात पैसे गोळा करून एक 'दृढता निधी' जमविला. संपूर्ण खर्चाची सांगड नाटकाच्या प्रदर्शनातून मिळणाऱ्या उत्पन्नाशी घातली. एक ते दीड लाख प्रेक्षक दरवर्षी त्यांनी बसविलेली 3-4 नाटकं बघतात. दरवर्षी नवीन नाटकं बसविली जातात. मोकळी जागा आणि प्रेक्षक एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते. बाकी सर्व व्यवस्था ही मंडळीच करुन घेतात.

पुण्यातील प्रयोग

ह्याच नीनासमच्या 'तिरुगाट-92' ची सुरुवात पुण्यातील प्रयोगाने झाली. यंदा ही मंडळी पृथ्वी थिएटर्सच्या निमंत्रणावरून मुंबईला जात असताना मराठी-कन्नड स्नेहवर्धन केंद्राच्या आपणास्तव आग्रहास्तव पहिल्यांदाच पुण्यामध्ये आली होती. ह्या वर्षी नीनासमने 'हु हुडूगी', 'संग्या बळ्या' व 'तलेदंड' ही नाटकं बसविली होती. या तिन्ही नाटकांचे प्रयोग पुण्यामधे झाले. 

हू हुडूगी

'हू हुडूगी' म्हणजे फुलवाली. शॉच्मा पिग्मॉलियनचे हे कन्नड रुपांतर.अतुल तिवारीचे दिग्दर्शन. भार्गवशास्त्री हे कन्नड भाषेचे अभ्यासक. कॅप्टन कल्याणपूरकर हे त्यांचे मित्र. शेवंती ही झोपडपट्टीत वाढलेली मुलगी. फुगे व फुले विकून रस्त्यावर राहणारी. दारुड्या बापाला पैसे देणारी. बोलायला तिखट, वागणं बिनधास्त.भार्गवशास्त्री अशा मुलीला 'मिस् कॅपिटल' करून दाखविण्याची भाषा करतात. शेवंतीलासुद्धा आपण कॉलेजात जाणाऱ्या तरुणीसारखं किंवा दुकानातील मॉडेलसारखं दिसावं असं वाटत असतं. शास्त्रीच घळ शोधत ती येते. 

स्वतःच्या कमाईतील 80 टक्के कमाई (फक्त 30 रूपये!) फी म्हणून द्यायला तयार होते. भार्गवशास्त्री शिकवायला तयार होतात. सहा महिन्यांची मुदत मागतात. त्यांना मदत करणारी सरसम्मा सहा महिन्यानंतर येणाऱ्या धोक्याची सूचना देते. शास्त्री बेफिकीर राहतात. शेवंतीचाबाप शास्त्रींना ब्लॅकमेल करून दोन हजार रुपये वसूल करून जातो. शेवंतीचं शिक्षण चालू होतं. तिची भाषा सुधारते. प, फ, स, श,ष मधील फरक कळायला लागतो. ती एका सोज्वळ, सुंदर, घरंदाज तरुण स्त्रीसारखी वागू लागते. प्रयत्न करूनही तिला पहिल्यासारखं वागता येत नाही. कालानुक्रमे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. नाटक संपतं. शेवंती झालेल्या नटीने दृष्ट लागण्यासारखं काम केलं आहे.

संग्या बाळ्या

'संग्या बाळ्या' या मूळ जानपद नाटकाची सुधारित संहिता डॉ.चंद्रशेखर कंबार यांनी लिहिली आहे. संगण्णा व बाळण्णा हे दोन मित्र. बाळ्या गरीब. संग्या त्याला पाहिजे तेव्हा मदत करतो. नवीन कपडे शिवून देतो. दोघे जत्रेला जातात. मौज मजा करतात. जत्रेमध्ये संग्या एकदा आपली बालमैत्रीण गंगव्वाला बघतो. गंगीचं लग्न झालेलं असतं, तरीसुद्धा हा तिच्या प्रेमात पडतो. बाळ्या, गंगी परोपरीने विनवणी करतात. 

नवरा खून करुन टाकेल असे गंगी सांगते. संग्या ऐकत नाही. दोघे एकमेकांना भेटतच असतात. व्यापारासाठी गेलेला नवरा परत येतो. आपल्या बायकोचा व्यभिचार त्याला सहन होत नाही. तिचा जीव घ्यायला तो उठतो. त्याचे दोन पहिलवान भाऊ संग्याचा खून करण्याचा सल्ला देतात. बाळ्याच्या मदतीने झाले संग्याला एकटे गाठून त्याचा खून करतात. खूनाची धुंदी उतरल्यावर पश्चात्ताप होउन गावकऱ्यांच्या स्वाधीन होतात.

खरं म्हणजे या नाटकात कुठलाही संदेश नाही, तत्त्व नाही. कुठल्याही सामान्य माणसाच्या जीवनात घडणारी गोष्ट. आपण कितीही मोठेपणाचा आव आणला तरीही मुळात आपण सामान्य माणूस असतो. ज्या मातीशी नातं सांगणारी माणसं. राग, लोभ, मोह, द्वेष यांतून घडलेली माणसं. मनोविश्लेषण न करता येणारी माणसं. यामुळेच कदाचित हे नाटक अजूनही सगळ्यांना आवडत असावं. पूर्ण प्रयोग लोकगीतांचा वापर करून अक्षर ह्या दिग्दर्शकाने हा प्रयोग सादर केला आहे.

तले दंड

'तले दंड' देह हे कर्नाडलिखित कन्नड नाटक. बाराव्या शतकातील वीरशैव धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या बसवेश्वर ह्यांच्या जीवनातील एका प्रसंगाची ही गोष्ट. कल्याणचा राजा बिज्जल चालुक्य राजांचे आधिपत्य झुगारून क्षत्रिय नसतानासुद्धा राजा होतो. बसवेश्वर त्याचा प्रधान व कोषाधिकारी. बसवण्णा सत्य, अहिंसा, कर्म ह्या तत्त्वांवर विश्वास ठेवणारा. जन्माधिष्ठित जातिव्यवस्थेचा तिटकारा करणारा, राज्य हे प्रजेसाठी व प्रजेच्या कल्याणासाठी आहे, असे मानणारा. स्वतःच्या बोलण्या- वागण्यातून त्याने भरपूर माणसे जोडली. 

शरण पंथाचा प्रसार झाला. सनातन व्यवस्थेला कंटाळून सर्व थरातील लोक शरण पंथात सामील झाले. जात ही जन्मावर अवलंबून नाही हे समजल्यावर खालच्या वर्गातील लोकांना फार आनंद झाला. राजाला सुद्धा आपल्या प्रधानाबद्दल अभिमान वाटे. शरण मंडळींचा सतत काम करण्यावर विश्वास असल्यामुळे कल्याण राज्याची भरभराट होते. व्यापारउदीम वाढतो. प्रजा सुखासमाधानाने नांदू लागते. 

सनातनवादी मात्र धर्म बुडाला म्हणून बसवण्णावर जळत असतात. बसवण्णाची शरण मंडळी मात्र बसवण्णाच्या एक पाऊल पुढे जाऊन आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करतात. एका ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न एका चांभाराच्या मुलाशी लावतात. सनातनवादी खवळतात. बिज्जळचख एक नालायक मुलगा सनातनवाद्यांच ऐकून फितूर होऊन राजाला कैदेत ठेवतो. मोठा नरसंहार होतो. कल्याण उध्वस्त होतं. शरण मंडळी राज्य सोडून जातात.

फुले, आंबेडकरांशी नातं सांगणारा हा तत्ववेत्ता स्वतःला कधीच महापुरुष म्हणवून घ्यायला तयार नव्हता. सामान्यांमध्येच राहून आपले विचार इतरांवर न लादता चर्चेच्या अनुषंगाने, देवाणघेवाणीवर विश्वास ठेवत होता. देवाच्या नावाखाली चाललेल्या आजच्या या परिस्थितीचं वर्णन व त्याचे परिणाम याची कल्पना हे नाटक बघितल्यावर येते. नीनासम् रंगशिक्षण केंद्राचे संचालक चिदंबर जंबे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन फार छान केले आहे.

तिन्ही प्रयोगांमधील दृश्यमयता (Visuals) फारच हृदयस्पर्शी होती. काही मोजक्या प्रॉपर्टीच्या मदतीने व अभिनयाने गावची जत्रा, रथयात्रा, रेस कोर्स, बाजार, असले सर्व प्रकार फार सूचकपणे उभे केले गेले. कुठेही भडकपणा नव्हता. केवळ मराठी समजणाऱ्या प्रेक्षकांनासुद्धा ही व्हिज्युअल्स पाहून आनंद व्हावा.

फेस्टिव्हलच्या नावाखाली काही मूठभर लोकांच्या क्षणिक आनंदासाठी करोडो रुपये उधळणाऱ्या त्या आपल्या मराठी समाजाजळ असं काहीतरी रचनात्मक दूरगामी परिणाम करण्यासारखं भरपूर आहे. महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे, मुंबई, नागपूर किंवा बारामती नव्हे. लातूर, जत, वडूज, हिंगोली, बीड ही सुद्धा आपलीच गावं आहेत. तिथेही मराठी माणसंच राहतात. काँग्रेसगवतासारख्या पसरणाऱ्या शेकडो नाट्यसंस्था पुण्या-मुंबईच्या परिसरात आहेत. पण निनासमसारखे अल्प मोबदल्यात खेडेगावात जाऊन नाट्यप्रयोग करुन सामान्यांची वाहवा मिळविणारं कोणीही नाही. 'इडियट बॉक्स'समोर बसून तेच तेच शिळे काहीतरी बघण्यापेक्षा या जिवंत कलाविष्काराचा आस्वाद घेणं केव्हाही चांगलं !

Tags: गिरीश कर्नाड. तले दंड संग्या बाळ्या हु हुडूगी प्रभाकर नानावटी जोग फॉल्स कर्नाटक नाटक हेग्गोडू Girish Karnad. Tale Dand Sangya Balya Hu hudugi Prabhakar Nanawati Jog falls Karnataka Play Heggodu weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके