डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

लोकांच्या मनातली भीती दूर करायची असेल तर आवश्यकता आहे जनजागृतीची. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करायला सुरुवात केली. देशाच्या प्रांताप्रांतांतून नवनवीन नेतृत्व उदयाला आले., 'लाल-बाल-पाल' ही त्रयी अशा नेतृत्वाचं एक प्रतीकच. जनसामान्यांची एकजूट होऊ लागली त्यांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत झाली. अशा वेळेला गांधीजींसारखा एक महान नेता देशाला लाभला.

यंदा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव. हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुष्कळ वर्ष लढावं लागलं. त्यासाठी किती लोकांनी बलिदान केलं! त्यांपैकी किती अनामिक! माझ्या मनात विचार येतो, आपल्या जिवाची बाजी त्यांनी का लावली? घरदार, कुटुंब, आप्तमित्र यांना पारख होऊन तुरुंगवास का भोगला? दुःखाची तमा न बाळगता कोणत्या प्रेरणेनं त्यांनी स्वातंत्र्यासाठी जीवन वेचलं? इंग्रज सरकार आमच्या गरीब जनतेचं शोषण करीत आहे, आमच्या मुलाबाळांना हलाखीच्या परिस्थितीत जगावं लागत आहे. हे इंग्रज सरकार गेलं तरच जनता सुखासमाधानाने जगू शकेल अशी प्रेरणा त्यांच्या मनात होती. मात्र शत्रू फार शक्तिशाली व धूर्त होता. जनता या शक्तीपुढे दबलेली होती. शत्रूच्या धूर्तपणामुळे आपापसांत अविश्वासाचं वातावरण होतं. म्हणूनच आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात व्यक्तिगत शौर्य आणि त्यागाची उत्तुंग व्यक्तिमत्त्वं या देशात आसामपासून केरळपर्यंत जन्मली.

आंदोलन जसजसं पुढे जाऊ लागलं तसतसं आंदोलनाच्या नेतृत्वाला वाटू लागलं की, लोकांच्या मनातली भीती दूर करायची असेल तर आवश्यकता आहे जनजागृतीची. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करायला सुरुवात केली. देशाच्या प्रांताप्रांतांतून नवनवीन नेतृत्व उदयाला आले., 'लाल-बाल-पाल' ही त्रयी अशा नेतृत्वाचं एक प्रतीकच. जनसामान्यांची एकजूट होऊ लागली त्यांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत झाली. अशा वेळेला गांधीजींसारखा एक महान नेता देशाला लाभला. त्यांनी साऱ्या देशात फिरून लोकांचे प्रश्न समजून घेतले आणि ब्रिटिशांविरुद्ध अहिंसक लढे पुकारले. सामान्य जनतेला त्यांनी मंत्र दिला 'तुम्ही चरखा चालवलात, खादीचे कपडे वापरलेत तर स्वातंत्र्यलढ्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग मिळतो.' या मंत्रामुळेच देशाची संपूर्ण जनता स्वातंत्र्यलढ्याची सैनिक झाली. 

दहा-पंधरा वर्षांनी गांधीजी एक-एक लढा संघटित करत गेले आणि प्रत्येक लढ्यागणिक सामान्य जनता आणि शिक्षित मंडळी यांचा सहभाग वाढत गेला. स्त्रिया पुढे आल्या, विद्यार्थी शाळा-कॉलेजं सोडून बाहेर पडले. हिंदी सैनिकांत असंतोष निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांच्या विरोधात उभी राहिली. अशा पार्श्वभूमीवर 1947 मध्ये स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. स्वातंत्र्य मिळून आज 50 वर्षे झाली. आपल्या देशाची आजची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती कशी आहे? ज्या शहिदांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं ते व्यर्थ गेलं का? ज्या प्रेरणेने स्वातंत्र्यलढा धगधगता ठेवला ती नष्ट झाली का? स्वराज्याचं सुराज्य झालं का? मला वाटतं राष्ट्राच्या दृष्टीनं 50 वर्ष हा काळ फार मोठा नाही. इंग्रजी हुकमतीचा पाश या देशाभोवती एवढा घट्ट आवळलेला होता आणि या हुकमतीचे स्वरूप इतकं गुंतागुंतीचं होतं की त्यातून बाहेर पडणंच कठीण. 

आपल्या बरोबरच स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या शेजारी राष्ट्रांत भांडवलशाही व हुकूमशाही यांचं राज्य आहे, लोकशाही फक्त कागदावरच आहे. या पन्नास वर्षांत निदान आपण लोकशाही कमावली, ही जमेची बाजू नाही का? आपल्या देशाची प्रगती आज होते आहे त्यापेक्षा अधिक झपाट्याने व्हायला हवी हे खरं! राष्ट्राची प्रगती जनजागृती, जनविकास व आंतरराष्ट्रीय परिस्थिती यांवर पुष्कळ अवलंबून असते. जेवढी आणि जशी जनजागृती होईल तसतसे सामान्य मनुष्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न होतील. असे प्रगतीसाठी धडपडणारे कार्यकर्ते देशाच्या कानाकोपऱ्यात आजही आहेत. दबलेल्या जनतेचे प्रश्न घेऊन त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. देशाच्या राजकीय क्षितिजावर ढग जमले आहेत. मात्र निरपेक्ष, नि:स्वार्थ बुद्धीने सुराज्यासाठी झटणारे कार्यकर्ते आशेचा नवा किरण देत आहेत.

[सौजन्य : मुंबई आकाशवाणी]

Tags: गांधी  इंग्रज हुकूमशाही भांडवलशाही लोकशाही प्रभुभाई संघवी Gandhi British Dictatorship Capitalism Democracy Prabhubhai Sanghawi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके