डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राष्ट्रीय एकात्मता, पाणलोट क्षेत्र विकास, ग्रामीण विकास आणि स्वातंत्र्य आंदोलनाच्या मूल्यांचे पुनर्जागरण या उद्दिष्टांच्या प्रसारासाठी युसुफ मेहेरअली सेंटरने आयोजित केलेली ही यात्रा झाईहून बोर्डीला गेली, तेव्हा वाटेत दुतर्फा उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी यात्रेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

गवारे मामांचा हृद्य सत्कार 

राष्ट्र सेवा दलाचे जुने, जाणते, अनुभवी आणि वयोवृद्ध कार्यकर्ते श्री. गंगाधर ऊर्फ मामा गवारे यांचा दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी कोपरगाव येथे त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त हृद्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, या सत्कारात कोपरगावचे सर्वपक्षीय, सर्वभाषिक आणि समाजातल्या भिन्न स्तरांतील स्त्री-पुरुष अकृत्रिम स्नेहभावनेने आणि कृतज्ञतेने सहभागी झाले होते.

‘हा निष्ठेच्या सहकार आहे, सत्तेचा नव्हे. गवारे मामांचे समर्पित जीवन आम्हाला सदैव प्रेरक राहील’ या अतिशय औचित्यपूर्ण शब्दांत कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ. बापू काळदाते यांनी मामांचा गौरव केला. महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सु. रा. वहाडणे, खासदार शंकरराव काळे, यदुनाथ थत्ते, सुधा वर्दे परीट गुरुजी आदी मान्यवरांची मामांचा गौरव करणारी यथोचित भाषणे झाली.

अजातशत्रू मामा गवारे यांच्या निरलस सामाजिक सेवेची प्रशंसा करणारे मानपत्र आणि 2 लाख 1 रुपयांचा निधी त्यांना अर्पण करण्यात आला. त्यांना हारतुरे देण्यासाठी मंचावर एकच गर्दी झाली; आणि त्यांना प्रेमादराने त्यांच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी दिलेल्या शालींची तर गणतीच नव्हती. इतके प्रेम, इतका अकृत्रिम आदर, कृतज्ञतेची भावना फार थोड्या लोकांच्या वाट्याला येते.

सत्काराने मामांना गहिवरून आले. ते फार बोलू शकले नाहीत. त्यांना अर्पण करण्यात आलेली निधी त्यांनी त्यांच्या नावे चाहत्यांनी सुरू केलेल्या प्रतिष्ठानला दिला आणि असे आश्वासनही दिले की त्यांत त्यांची अल्पशी भर ते टाकतील. मामांच्या मित्रांनी एक रात्र शाळा सुरू केली आहे. आपल्या चरितार्थासाठी दिवसा काही ना काही काम धंदा कराव्या लागणाऱ्या मुलांसाठी कोपरगावात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या रात्रशाळेसाठी मामा गवारे प्रतिष्ठान सर्व आर्थिक सहाय्य करील.

सत्कारासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून सेवादलाचे कार्यकर्ते आले होते. या सत्कारासाठी सर्व श्री किशोर पवार, भास्करराव बोरावके, रासकर, पुरुषोत्तम पगार यांनी इतर सुहृदांनी फार मेहनत घेतली. फार काळ आठवणीत राहील अशी गवारे मामाच्या सत्काराची ही सभा झाली.

गवारे मामा अमृत महोत्सवाचा म्हणून त्याच दिवशी सकाळी ‘मुक्त अर्थव्यवस्था, शाप की वरदान’ या विषयावर एक परिसंवाद झाला. अध्यक्षस्थानी प्रा. मधु दंडवते होते. परिसंवादात सदानंद वर्दे, कॉ. गोविंदराव पानसरे, यदुनाथ थत्ते, मोहनराव गाढे आदींनी भाग घेतला. चर्चेमध्ये विस्ताराने विषयाच्या दोन्ही बाजू आल्या. प्रा. मधु दंडवते यांनी चर्चेचा सुंदर समारोप केला.

या दोन्ही कार्यक्रमांच्या सुरुवातीस शाहीर लीलाधर हेगडे यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या स्फूर्तिदायी इतिहास सांगणारा एक शानदार कार्यक्रम पोवाडे आणि गाणी या माध्यमांद्वारा सादर केला आणि श्रोत्यांची दाद मिळवली. कलापथकातील आपले एके काळचे साथी असे गवारे मामांचे वर्णन करून श्री. हेगडे यांनी त्यांना प्रेमालिंगन दिले व आपले पोवाडे व गाणी यांची ध्वनिफीत त्यांना भेट दिली.

----------

‘मानव - ज्योत’ यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश 

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक थोर दिवंगत सेनानी व मुंबई महापालिकेचे महापौर (1942) श्री. युसूफ मेहरअली यांच्या कच्छमधील भद्रेसर या गावाहून 9 ऑगस्ट ला निघालेल्या मानव-ज्योत यात्रेने गुजरातच्या काही प्रमुख भागात फिरून दिनांक 5 सप्टेंबरला गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील झाई या गावात प्रवेश केला. तेव्हा झाई ते बोर्डी परिसरात गावकर्‍यांनी विशेषतः आदिवासींनी मानव-ज्योतीचे उत्साहाने स्वागत केले.

झाई गावाच्या वेशीवर तोरणे उभारण्यात आली होती. डहाणू तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष. श्री. दादीशेठ यांनी ज्योतीला हार घातला. आमदार शंकर नम हेही स्वागतास सामील झाले होते.

राष्ट्रीय एकात्मता, पाणलोट क्षेत्र विकास, ग्रामीण विकास आणि स्वातंत्र्य आंदोलनाच्या मूल्यांचे पुनर्जागरण या उद्दिष्टांच्या प्रसारासाठी युसुफ मेहेरअली सेंटरने आयोजित केलेली ही यात्रा झाईहून बोर्डीला गेली, तेव्हा वाटेत दुतर्फा उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी यात्रेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. गावात उत्सवाचे वातावरण होते. बोर्डीची अनेक वर्षाचे सरपंच आणि स्वातंत्र्यसैनिक श्री. आत्माराम सावे, सध्याचे सरपंच विजय म्हात्रे आणि त्यांचे सर्वपक्षीय सहकारी यांनी अतिशय परिश्रम घेऊन कल्पकतेने यात्रेच्या स्वागताची योजना केली होती.

बोर्डी गाव हे क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकांचे गाव साने गुरुजींच्या वास्तव यांनी आचार्य भिसे आणि चित्रे गुरुजी यांच्या अथक शिक्षण प्रसाराच्या परिश्रमाने आणि लक्ष्मणराव राऊत मुकुंदराव असावेत शामराव पाटील मिनोचर झायवाला, यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने पुनीत झालेले यात्रेच्या मार्गावर वृक्षवल्लींचा कमानी बरोबरच बोर्डी तील या थोर पुरुषांच्या नावाचे फलक लावण्यात आले होते मानव ज्योतीच्या स्वार्थासाठी काही नागरिकांनी आपल्या घराच्या गॅलरीत समया प्रज्वलित केल्या होत्या बोर्डी गावाच्या मध्यभागी असलेल्या स्वातंत्र्य स्तंभा समोर यात्रेचे सभेत रूपांतर झाले सभेत अनुताई लिमये डॉक्टर जी. जी. परीख आत्माराम सावे सदानंद वर्दे प्रभुतींची भाषणे झालीमानव ज्योत घेऊन धावणाऱ्या तरुणांचे विशेषतः त्यातील आदिवासी तरुणांचे वक्त्यांनी कौतुक केलेजिल्ह्यातील यात्रेच्या कार्यक्रमाचे नियोजन माजी आमदार श्री पंढरीनाथ चौधरी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे ठाणे जिल्ह्यातील काही भागात फिरून मानव ज्योती यात्रा 14 सप्टेंबरला सायंकाळी लालबहादूर शास्त्री मार्गावरील मुलुंड चेक नाका येथे मुंबईत प्रवेश करील.

प्रतिनिधी

----------

महात्मा गांधींच्या 125 व्या जयंती निमित्ताने कार्यक्रम

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी देशाला स्वराज्य मिळवून दिले त्याला आता 47 वर्षे झाली आहेत. आजची देशाची परिस्थिती पाहता पुन्हा गांधींच्या विचारांच्या प्रखरतेने काम होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. स्वराज्य मिळाले ते लोकस्वराज्य व्हायला पाहिजे. आज सर्वत्र हिंसाचार होत आहे. भ्रष्टाचार, बलात्कार बोकाळला आहे. जात, देश, संप्रदाय, क्षेत्रवाद यासाठी ठीक ठिकाणी बंद, घेराव, प्रदर्शन, सत्याग्रह आदी होत आहेt. त्यामुळे सामान्य जनजीवन एकदम असुरक्षित वाटू लागले आहे. त्यातून आकाशाला भिडणारी महागाई, बेरोजगारी, गरिबी लोकांना त्रस्त करीत आहे. या परिस्थितीमुळे बेचैन झालेले तरुण निरनिराळ्या पक्षांमध्ये व गटामध्ये सामील होऊन अशांतता निर्माण करत आहेत. ते दिशाहीन झालेले आहेत. कोणावरही त्यांचा विश्वास नाही, जसजशीशी त्यांची बेकारी वाढत आहे त्याप्रमाणे त्यांची नाराजी वाढत आहे.

यातून मार्ग कसा काढावा, महात्मा गांधींचे मार्गदर्शन कसे उपयोगी पडू शकेल, याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. महात्मा गांधींनी ‘माझ्या स्वप्नातील भारत’ व ‘हिंद स्वराज्य’ ही दोन पुस्तके त्यावेळी लिहिली व या सगळ्या प्रश्नांवर कसा उपाय करता येईल याचा विचार सर्वांच्या समोर ठेवला आहे. महात्मा गांधींनी लोकांपुढे स्वावलंबनाचा विचार ठेवला होता. परंतु आपण सर्व भोगवादी, बाजार, हॉटेल, भवन निर्माण, कारखाने, दवाखाने, रस्ते, धरणे यात गुंतून राहिलो व त्यातच फसून गेलो.

महात्मा गांधी यांच्या सोबत काम करणारी पिढी आता संपत आली आहे. त्यानंतरची पिढी वृद्ध झालेली आहे. खरे म्हणजे आपल्या देशातील तरुणांनी ही परिस्थिती बदलायची आहे. त्यांना दिशा दाखवण्याचे काम गांधी विचार करू शकेल. आजची परिस्थिती बदलायची ज्या तरुणांची इच्छा असेल त्या तरुणांना यासाठी काम करायचे असेल ते आपला वेळ देऊ शकतील अशा लोकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा अशी विनंती आहे.

श्री गोका शिंदे 

----------

‘उत्थान’ चे उपक्रम उपेक्षितांना दिलासा देणारे

उपेक्षितांचे दुःख दूर करण्यासाठी तसेच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ‘उत्थान संस्था,’ नवनवीन उपक्रम राबवित आहे, ते स्तुत्य आहेत. केंद्र भावी पिढीला निश्‍चितपणे आदर्श पूर्ण घडवील, याहून अनेकांना दिलासा व आधार देणारे ठरेल; असे उद्गार बेळगाव येथील इंडियन ॲल्युमिनियम कंपनीचे पर्सनल मॅनेजर ए. के.‌बासू यांनी काढले.

उत्थान संस्थेच्या एकलव्य विद्यानिकेतनसाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीची स्लॅब घालण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपतराव कुलकर्णी होते. प्रारंभी उत्थान संस्थेचे चेअरमन डॉ. भीमराव गस्ती यांनी संस्थेने चालविलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. एकलव्य विद्यानिकेतन. शिवणकेंद्र, महिला कल्याण केंद्रांना मान्यवरांनी भेट देऊन तेथील कामकाजाची पाहुण्यांनी पाहणी केली व उत्थानच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. ‘उत्थान’तर्फे तयार होत असलेल्या इमारतीसाठी एकूण 6 लाख रुपये खर्च येणार आहे. या वास्तूत उपेक्षितांच्या मुलांना उत्तम शिक्षण देण्याची सोय, वसतिगृ,ह महिलांना शिवण व हस्तकलांचे प्रशिक्षण तसेच रोजगार देण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. गस्ती यांनी दिली.

यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे मॅनेजर आनंद गोठेकर, पत्रकार अनंत लाड, प्राचार्य आर. के. कुठे यांचेही भाषण झाले. पांडुरंग निखार्गे, इंडालचे अधिकारी ए. एस. पाटील, उत्थानचे कार्यकर्ते, कर्मचारी व बेळगाव, कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

(श्री. गवारे मामा यांच्या सत्कार कार्यक्रमाचा वृत्तांत थोड्या उशिराने हाती आला म्हणून ते वृत्त देण्यास उशीर झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. - संपादक)

Tags: वसतिगृह शिक्षण रोजगार स्त्रियांचे सबलीकरण उत्थान संस्था Hostel Education Employment Women’s Empowerment Utthan Institute weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके