डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

साधना'ने वाचन संस्कृतीची परंपरा समृद्ध केली : भारत सासणे

मराठीतील सर्जनशील लेखक भारत सासणे यांनी उपस्थित वाचकांशी संवाद साधनाता वाचन संस्कृतीच्या उभारणीसाठी 'साधना ने घेतलेली भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगून सर्वसामान्य माणूस हा अनेक अंतर्बाह्य प्रश्रांनी भेदरलेला असल्याने तो अतिशय हतबल झालेला आहे. रोजच्या जीवनमरणाचे प्रश्न सोडविण्याच्या विवंचनेत भरडल्या गेलेल्या संभ्रमावस्थेतील आजच्या वाचकाला सकस आणि दर्जेदार साहित्यातून त्याच्या जीवनातील मरगळ झटकून टाकण्याचे बळ या 'वाचन संस्कृती अभियाना'तून प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन केले.

पूज्य साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साप्ताहिक 'साधना ने साठ वर्षाच्या वाटचालीत अनेक लेखक, पत्रकार, संपादक, संवेदनशील कार्यकर्ते तथा वाचक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. असे विचार प्रसिद्ध सर्जनशील लेखक भारत सासणे यांनी बुलढाणा येथील प्रगती सार्वजनिक वाचनालयात 'साधना'च्या 'वाचन संस्कृती अभियानाच्या दुसऱ्या विशेषांकाचे प्रकाशन करताना काढले. 

साप्ताहिक 'साधना (पुणे) यांनी आपल्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त वाचन संस्कृती अभियान' सुरू केले असून या अभियानाचा एक भाग म्हणून साप्ताहिक साधना च्या वाचन संस्कृती अभियान' विशेषांकाचे प्रकाशन भारत सासणे यांच्या हस्ते प्रा. डॉ. एस. एम. कानडजे यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाण्यामध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साप्ताहिक 'साधना’चे संस्थापक पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. साप्ताहिक साधनाच्या वाचन संस्कृती अभियाना'ची सविस्तर भूमिका कवी कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांनी उपस्थितांसमोर मांडताना शोषणरहित, समताधिष्ठित, प्रेमभावनेवर आधारित समाजनिर्मितीसाठी जनजागरण हा साधना चा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. वाचन संस्कृती अभियान' सुरू करून सकस व दर्जेदार साहित्य वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री.उत्रादकर यांनी साप्ताहिक 'साधना चे अभिनंदन केले.

वाचन संस्कृती अभियानाला प्रा. ई. जी. धांडे, दै. सकाळचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन, पुरुषोत्तम गणगे इत्यादींनी शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रा. डॉ. एस. एम. कानहजे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जनसामान्यांच्या विचारांना चिंतनाची जोड मिळाल्यास सकारात्मक कृती करण्याचे बळ प्राप्त होते,

या दृष्टीने 'साधना ची गेल्या साठ वर्षांची वाटचाल ही महाराष्ट्राच्या साहित्य-कला-समाजकारणासाठी महत्त्वाची बाब असून 'साधना'चे मराठी पत्रकारितेतील योगदान दीपस्तंभासारखे असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्जनशील लेखक भारत सासणे यांनी उपस्थित वाचकांशी संवाद साधनाता वाचन संस्कृतीच्या उभारणीसाठी 'साधना ने घेतलेली भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे सांगून सर्वसामान्य माणूस हा अनेक अंतर्बाह्य प्रश्रांनी भेदरलेला असल्याने तो अतिशय हतबल झालेला आहे. रोजच्या जीवनमरणाचे प्रश्न सोडविण्याच्या विवंचनेत भरडल्या गेलेल्या संभ्रमावस्थेतील आजच्या वाचकाला सकस आणि दर्जेदार साहित्यातून त्याच्या जीवनातील मरगळ झटकून टाकण्याचे बळ या 'वाचन संस्कृती अभियाना'तून प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन केले. परदेशातून आलेले कोणतेही विचार न स्वीकारता 'साधना परिवाराने येथील मातीत फुललेले विचार स्वीकारल्याने खऱ्या भारतीयत्वाची ओळख 'साधना न होते, त्यामुळे मानवी मनाला समृद्धी, वैचारिक व सांस्कृतिक समर्थता देण्याचे कार्य या 'वाचन संस्कृती अभियाना'तून निश्चितच होणार असल्याची ग्वाही याप्रसंगी भारत सासणे यांनी दिली. कार्याक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नरेंद्र लांजेवार यांनी तर आभारप्रदर्शन प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रा. कि. वा. वाघ यांनी केले.

साप्ताहिक 'साधना’च्या 'वाचन संस्कृती अभियान' विशेष अंकाच्या प्रकाशनास बुलढाणा शहरातील निवडक वाचक, रसिक, साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंजाबराव गायकवाड, महेश वाकदकर, प्रा.विनोद देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी कथाकार गो. मा. सावजी, किशोर खेडेकर, समीक्षक- नाटककार रवींद्र इंगळे चावरेकर, कवी पुष्कराज वित्ते, प्रा. बुंदेले, डॉ. प्रकाश गुप्ता, डॉ. बनिरे, काका लिखिते, स्त्री-मुक्तीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. डॉ. इंदूताई लहाणे, प्रा. अनंत सिरसाट, प्रा.सुनील देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके