डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

प्रिंट ऑर्डरप्रमाणे किती उत्पन्न असावे हे अंकगणित प्रत्येक संपादकांनी ओळखावे. ह्या वर्षी संपादकांचे अंकगणित बहुतेक चुकतेच, मराठी दिवाळी अंकांचा व्यवहार जवळजवळ 8 कोटी रुपयांपर्यंत असतो व साधारणपणे जाहिरात उत्पन्नांची अपेक्षा रु. 4 ते 5 कोटी असावी ही अपेक्षा.

कटुसत्य

संपादक महाशय,

आपली भेट मुंबईमध्ये झाली त्यानंतर आपण 'साधना दिवाळी अंक 2005 आवर्जून पाठवलात. त्यानंतर दुसऱ्या अंकांच्या प्रतीही मिळाल्या. भरपूर साहित्य मिळाले, आभार.

गेल्या वर्षी जवळजवळ 112 अंकांना, बँकांच्या तर्फे भरपूर जाहिरात मदत देण्याचा प्रयत्न आम्ही केला. 608 दिवाळी अंकांची नोंद मुंबई कलेक्टर ऑफिसमध्ये झाली, त्यांपैकी 353 अंक उभे राहिले. जर 200 पानांचा अंक असेल तर त्याची किंमत जवळजवळ रु. 180/- येते. (या वर्षी कागदाचे भाव 8% वाढलेले दिसून आले व त्यावर व्हॅटचा प्रभाव होताच.) जर अंकाची किंमत रु. 80/- ठेवावयाची असेल तर जाहिरात उत्पन्न रु. 100/- अंकामागे असावेच लागले. प्रिंट ऑर्डरप्रमाणे किती उत्पन्न असावे हे अंकगणित प्रत्येक संपादकांनी ओळखावे. ह्या वर्षी संपादकांचे अंकगणित बहुतेक चुकतेच, मराठी दिवाळी अंकांचा व्यवहार जवळजवळ 8 कोटी रुपयांपर्यंत असतो व साधारणपणे जाहिरात उत्पन्नांची अपेक्षा रु. 4 ते 5 कोटी असावी ही अपेक्षा.

प्रत्येक मराठी संपादक हा बहुगुणी पण स्वतःच्या धुंदीत असतो असाच बऱ्याच जणांचा अनुभव. दिवाळी अंक साहित्याची मेजवानी जरी म्हटली तरी वस्तुस्थिती अशी की दिवसेंदिवस साहित्य दर्जा कमी होत असल्याचे दिसत आहे. फक्त 10% अंक पूर्वीप्रमाणे साहित्यविषयक प्रमाण म्हणून असतात. ह्या वर्षीही तसेच दिसून आले. जाहिरात उत्पन्न फक्त 2 कोटी पर्यंतच होते. त्याच्यापैकी 83 लाख रुपये आमच्या प्रयत्नांमुळे झाले हे विनयाने नमूद करतो.

काही अनुभव इतके विचित्र आहेत की माणूस इतका स्वार्थी का बनतो ह्याची खंत वाटते. शेवटी पैशासाठी माणूस माणुसकी विसरतो ह्याचे अनेक अनुभव आमच्यापाशी आहेत. मुंबईमध्ये 4 दिवसांत फटाक्यांची विक्री होते 123 कोटी रुपयांची व मराठी अंक शोधीत असतात ग्राहकांसाठी. पैसा भरपूर असूनही मराठी माणूस साहित्यासाठी जितका पैसा खर्च करावा तेवढा करीत नाही हे सत्य. काही बँका आणि कंपन्यांतर्फे अनेक अंकांची खरेदी झाली व त्यामुळे बरीच मदत झाली.

प्रदर्शने बरीच, गर्दीपण बरीच झाली अंक पाहण्यासाठी, पण विक्रीचे प्रमाण कमी होते. तरीही दर्जेदार अंक खूप विकले गेले. कलकत्त्याच्या अमृत बजार पत्रिका दर पूजाच्या वेळी सहा बंगाली साहित्यिकांना 5 लाख रुपये मानधन वर्षासाठी आगावू देतात. आपल्याकडे असे का होत नाही? सरस्वतीचंद्र नेहमी कफल्लक का राहतात ह्याचे कारण हेच. साहित्य विषयातले तज्ज्ञ म्हणून माझे विचार आपल्याकडे मांडले आहेत.

गिरीश वासुदेव

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके