डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उत्सवात बीभत्स नृत्यांचा समावेश टाळला जावा, कर्णकर्कश स्पीकर्सवर पूर्णतः बंदी घालायी. श्रद्धेसाठीच काय ते गणेशोत्सवाचे महत्त्व शांततेने प्रकट व्हावे, गणेश उत्सवातील सर्वच दिवस तेच तेच कंटाळवाणे जाऊ नयेत तर शांततेचे, उल्हासाचे आणि समाधानाचे स्वरूप त्यातून प्रकट व्हावे. सध्याच्या गणेशोत्सवाचे स्वरूप बदलण्यासाठी उपाययोजना असा विश्लेषणात्मक लेख श्री. परळकरांनी जाणीवपूर्वक लिहावा, ही अपेक्षा.

‘साधना’मुळे विचार गुजरातमध्ये गेला

पाचवा वेतन आयोग नाकारणाऱ्या माझ्या निवेदनाला व त्यावरील प्रतिक्रियांना आपण विस्तृत व ठळक प्रसिद्धी देऊन चर्चा घडवून आणली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ‘साधने’ने प्रसिद्ध केलेले निवेदन व प्रतिज्ञापत्राचा गुजरात राज्यातील नवा मार्ग व आणखी एका नियतकालिकाने गुजराती अनुवाद प्रकाशित केला आहे. आपले वाचक श्री. संजय भावे (अहमदनगर) यांनी तो अनुवाद केला आहे. गुजरातमधून मला खूप पत्रे आली. एका प्रकाशन संस्थेने पुस्तके भेट पाठविली. गांधीवादाची परंपरा असलेल्या गुजतरातध्ये ‘साधना’ने माझे विचार योग्य प्रकारे पोहोचविले.

हेरंब कुलकर्णी, अहमदनगर 

----------

नवीन सदरे वाचकप्रिय

'साधना' नेहमीप्रमाणे उत्तम आहे. नवनवी सदरे देऊन तुम्ही ती अधिक वाचकप्रिय करीत आहात म्हणून धन्यवाद!

फ्रान्सिस दिब्रिटो, वसई 

----------

ध्यासमग्न

डिसेंबर 98 पर्यंत माझा ‘साधने’चे 100 साप्ताहिक वार्षिक वर्गणीदार करण्याचा संकल्प होता; परंतु काही अपरिहार्य अडचणींमुळे मागच्या वर्षात माझा हा संकल्प मी पूर्ण करू शकलो नाही. फक्त 25 वर्गणीदार आणि 9/10 वार्षिक वर्गणीदार एवढीच मजल मी मारू शकलो. मला 6/12/98 ला गंभीर आपघात झाल्याने मी महिनाभर नाशिक येथे रुग्णालयात पडून होतो अन् अजून एवढा महिना विश्रांतीसाठी (आवश्यक) घरात पडून आहे. पण मी व्यवस्थित बरा होताच उर्वरित संकल्प गुरुजींच्या जन्मशताब्दीवर्षात पूर्ण करीन.

ऑक्टोबर ते डिसेंबर 98 ची वर्गणी मी गोळा केलेली नाही, वितरणही जरा विस्कळीत झाले होते. ते सुरळीत करून घेतले आहे. त्यासाठी एक होतकरू मुलगा नेमला आहे. त्याला अंकामागे एक रुपया कबूल केला आहे. परंतु आपले वर्गणीदार मुळातच साधनेचे पाईक आहेत म्हणून त्यांनी माझी अडचण समजून घेतली. बहुतेक जण वर्गणी कधी द्यायची हे स्वतःहूनच विचारत होते. गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त आणि साधनेच्या पन्नाशीनिमित्त साधनेची संस्थात्मक व गुणात्मक वाढ एवढे उद्दिष्ट मनात ठेवून बरा होताच कामाला लागेन. हातभार लावणारेही कार्यकर्ते, मित्र आहेत.

तुळशीराम जाधव, संगमनेर 

(श्री. तुळशीराम जाधव अपघातानंतर बरे होण्याचा उपचार अजूनही घेत आहेत. परंतु त्याही अवस्थेत ध्यास आहे साधना साप्ताहिक कार्याचा. आम्हांला अशा मित्रांचा अभिमान व आधार वाटतो- संपादक) 

----------

पर्यावरण बिघडवण्यास घातक अंधश्रद्धा जबाबदार 

16/1/99 ‘साधना’ अंकातील 'पर्यावरण व गणपती विसर्जन हा श्री. परळकरांचा लेख अप्रतिम आणि समाजोपयोगी वाटला. नैसर्गिक समतोल बिघडविण्यासाठी जनमनातील अंधश्रद्धाच निर्विवादच जास्त घातक ठरतात. सदर लेखातून गणपती विसर्जनासाठी योग्य ती उपाययोजना स्पष्ट झाली. परंतु सार्वजनिक गणेशोत्सवासाठी काही नियम व अटी, सर्वच गणेशमंडळांना सक्तीने घालून देण्यासाठी श्री. परळकरांनी स्वतंत्र लेख लिहावा असे त्यांना विनम्रतेने सुचवावेसे वाटते. सध्याचे गणेशोत्सवाचे विकृत स्वरूप श्रद्धाळू वाटण्याऐवजी अंधश्रद्धाळूपणाचे वाटते आहे, ही वास्तविकता पूर्णतः बदलावयास हवी. लोकमान्यांचा त्यामागील प्रमुख उद्देश आज वेगळ्याच टोकाकडे समाजाकरवी नेला जातो आहे, ही दुर्दैवाची आणि समाज अधोगतीची लक्षणे वाटतात. उत्सवात अनाठायी खर्च टाळण्यासाठी उपाययोजना करावी.

अंधश्रद्धाळू परंपरागत प्रथा बंद पडाव्यात, मिरवणुकीला भव्य-दिव्य आणि वेळखाऊ स्वरूप नसावे. उत्सवात बीभत्स नृत्यांचा समावेश टाळला जावा, कर्णकर्कश स्पीकर्सवर पूर्णतः बंदी घालायी. श्रद्धेसाठीच काय ते गणेशोत्सवाचे महत्त्व शांततेने प्रकट व्हावे, गणेश उत्सवातील सर्वच दिवस तेच तेच कंटाळवाणे जाऊ नयेत तर शांततेचे, उल्हासाचे आणि समाधानाचे स्वरूप त्यातून प्रकट व्हावे. सध्याच्या गणेशोत्सवाचे स्वरूप बदलण्यासाठी उपाययोजना असा विश्लेषणात्मक लेख श्री. परळकरांनी जाणीवपूर्वक लिहावा, ही अपेक्षा. धूमधडाक्याचे गणेशोत्सवातील सर्वच दिवस जर शांतपणे आणि शिस्तबद्ध श्रद्धाळू भावनेने पार पडतील, तर गणेशोत्सव सुरू करणाऱ्या लोकमान्यांच्या मृतात्म्यास खरोखर शांती लाभेल, यात वादच नाही.

अशोक ना. आहेर, अहमदनगर 

----------

हार्दिक प्रतिसाद

श्री. रामकुमार रायवाडीकर यांस, स. न. साधनेच्या सुवर्णमहोत्सवी विशेषांकात आपल्यासंबंधीचा परिचयात्मक लेख वाचला. कोणत्याही प्राप्तीची अपेक्षा न ठेवता (द्रव्य कीर्ती, सफलता) फक्त आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या मानसिक तळमळीतून आपण जे समाजकार्य करीत आहात तो माझ्या लेखी निष्काम कर्मयोगच आहे. त्या कामाचे रसग्रहण म्हणून मी आपणांस अल्प मदत करू इच्छिते. हे पैसे आपल्या कार्यासाठी नाहीत. ते तुमच्यासाठी व तुमच्या परिवारासाठी आहेत. कधी तरी हौस, मुलांची किंवा अन्य कुणाची मागणी, एकादी अडचण, आजारीपण किंवा अशा कोणत्याही कौटुंबिक कारणासाठी ते खर्च व्हावेत ही आमची इच्छा आहे. मी 1000 रुपये व माझी आई 100 मिळून 1100 रुपये आम्ही देऊ इच्छितो. रक्कम लहान आहे, फक्त फुलाची पाकळी. पण देणारा त्याच्या शक्तीप्रमाणे देऊ इच्छितो व शकतो हे तर खरेच! 

आमचा दोघींचा परिचय- मी सुधा रामचंद्र दांडेकर एम.एम. वय 70 पूर्ण. सर्व आयुष्य कुटुंबासाठी खर्चले व आता उतरत्या वयात समाजासाठी काही करण्याची शारीरिक अनुकूलता राहिली नाही. आता गीतेत उल्लेखिलेला द्रव्ययज्ञ अत्यल्प प्रमाणात करू शकते. माझी आई... इंदिरा माधव पाटणकर वास्तव्य जळगाव. तिच्या काळातील मॅट्रिक. वय 90 वर्षे पूर्ण. समाजसेविका होती. ‘तुझ्याबरोबर माझेही पैसे पाठव’ असे सांगून पैसे दिलेले आहेत. आपले कुशल असावे.

सुधा दांडेकर, बडोदा
(रामकुमार रायवाडीकर यांना आलेले हे पत्र आवर्जून प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके