डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

क्रांतीच्या प्रक्रियेत हृदयपरिवर्तन आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात ज्याला क्रांतीची गरज आहे त्याच्या हृदयपरिवर्तनापासून व्हावयास हवी. म्हणजे मग संदर्भ परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकता येते. क्रांतीचे अंकगणित नसते; बीजगणित असते, प्रतिके असतात, असे दादा मानीत. दुर्दैवाने ‘मार्क्स' त्यांच्या अनुयायांनाही कळला नाही. म्हणून तर अनुयायी ‘मार्क्ससिस्ट’ झाले. ‘मार्क्स' होऊ शकले नाहीत. नक्कल कधीच अस्सल नसते.

महात्मा गांधीचे पाऊल मार्क्सच्या पुढचे...

प्रधान मास्तरांनी तळवलकरांच्या मतांशी जी मतभिन्नता नोंदवली आहे त्याच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे. अर्थात मला माझी मर्यादा कळते. परंतु पू. दादांनी (धर्माधिकारी) कार्ल-मार्क्सला गरीब माणसाचा पहिला पैगंबर म्हणून संबोधिले होते. जगात अमिरी-गरिबी राहणार नाही, अमीर गरीब राहणार नाही, अशी प्रतिज्ञा कुठल्याही धर्मप्रवर्तकानेही केली नव्हती, असे दादा म्हणत. दुसरी प्रतिज्ञा होती की, एक दिवस असा येईल की जगात राज्य राहणार नाही. आणि तिसरी, युद्धेही राहणार नाहीत. म्हणून दादांनी मार्क्सला महान मंत्रद्रष्टा म्हटले आहे. अर्थात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गांधींनी पुढचे पाऊल टाकले, म्हणून दादा गांधींना दुसरा पैगंबर म्हणत. कारण जे क्रांतिकारक असतील त्यांच्या स्वतःच्या जीवनात क्रांतीच्या मूल्यांचा प्रयोग प्रारंभ झाला पाहिजे, असे म्हणून साध्य, साधन, विवेक, साधर्म्य व अहिंसा यांमुळे गांधींनी क्रांतीच्या प्रक्रियेतच मार्क्सच्या पुढचे पाऊल टाकले व भर घातली असे दादा मानीत.

क्रांतीच्या प्रक्रियेत हृदयपरिवर्तन आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात ज्याला क्रांतीची गरज आहे त्याच्या हृदयपरिवर्तनापासून व्हावयास हवी. म्हणजे मग संदर्भ परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकता येते. क्रांतीचे अंकगणित नसते; बीजगणित असते, प्रतिके असतात, असे दादा मानीत. दुर्दैवाने ‘मार्क्स' त्यांच्या अनुयायांनाही कळला नाही. म्हणून तर अनुयायी ‘मार्क्ससिस्ट’ झाले. ‘मार्क्स' होऊ शकले नाहीत. नक्कल कधीच अस्सल नसते. अशा व्यक्तीचे मूल्यमापन केवळ इतिहासातील घटना व त्यांच्यानंतर झालेल्या व्यक्तींच्या चुका, यांतून करणे चुकीचे असते. पण एअरकंडिशन खोलीत बसून लिहिणाऱ्या व जीवनात कधीच प्रयोगांत सामील न होणाच्या तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला ही माणसे कळत नाहीत, हेच दुःख आहे.

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी

मुंबई.

Tags: महात्मा गांधी एअरकंडिशन बीजगणित मार्क्ससिस्ट अंकगणित कार्ल मार्क्स Mahatma Gandhi air conditioner Marxism Algebra Arithmetic #Carl Marx weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके