डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. पाटील सुचवतात, त्याप्रमाणे महामंडळाने कृष्णा खोरे विकास योजना अंतर्गत प्रस्तावित उपसा योजनांची तांत्रिक व आर्थिक माहिती खुली करावी. तसेच महामंडळ कर्जरोखरूपाने उभे करीत असलेले भांडवल व त्यावरील व्याज यांची परतफेड करण्याच्या दृष्टीने सिंचन पाणीपट्टीत काय बदल करणार आहे आणि पर्यटन, क्रीडा आदी इतर मार्गानी उत्पन्न किती मिळणार आहे ही माहिती महामंडळाने प्रसिद्ध करावी.

17 मे 1997 च्या साधनेच्या अंकात रा. के. पाटील यांनी वाद-संवाद या सदरामध्ये 'कृष्णा खोरे प्राणी' प्रश्नावर साधनेने 29 मार्च 1997 मार्चच्या अंकात छापलेल्या टिपणाबाबत  प्रतिक्रिया दिली आहे. त्या संदर्भात प्रथम एक खुलासा- डॉ. पाटील यांच्या मते वरील टिपणात मी म्हटले आहे, लहान बंधारे, तळी अशांसारख्या योजनांद्वारे उरलेले (महाराष्ट्राच्या वाट्याचे) 20 टक्के पाणी वापरात येईल, ' असे विधान मी केलेले नाही. कोष्टक देऊन टिपणात दाखवले आहे की सरकारी आकडेवारीनुसार काम हाती घेतलेल्या मोठ्या (उदा. देवघर टेमघर, पिंपळगाव इत्यादी.) मध्यम व लहान 'धरण योजना (साठा 66.29 अब्ज घनफूट), शासकीय मान्यता मिळालेल्या मध्यम व लहान योजना (साठा 11.37 अब्ज घनफूट) आणि सर्वेक्षणाखालील लहान योजना पुया केल्यावर 87.41 अब्ज घनफूट साठा होऊन महाराष्ट्राच्या वाट्याचे 16 टक्के पाणी वापरले जाईल. 

वरीलप्रमाणे सरकारी धरण योजनाद्वारा साठा होईल असे स्पष्टपणे मांडले असताना डॉ. पाटील यांना, मोठया धरणांची गरज नाही, तळी, पाणलोट आरती द्वारा सर्व पाणी साठवता येईल असा गर्भितार्थ असलेले विधान माझ्या टिपणात कोठे आढळले, हे लक्षात येत नाही. डॉ. पाटील म्हणतात की सिंचनखाते व महामंडळ यांत कार्यवाही, कार्यक्षमता या दृष्टीने काडीमात्र फरक नाही. कारण सिंचन खात्यातीलच माणसे महामंडळाकडे आहेत. हे बरोबरच आहे. परंतु महामंडळ केल्याने अधिक गुप्त अधिक लोकहितविरोधी कारभार सुरू झालेला दिसतो. सिंचन खात्याकडून सिंचन प्रकल्पाबाबत काही माहिती मिळविणे शक्य होते असा माझा आणि अन्य सहकार्यांचा, गोखले अर्थशास्त्र संस्थेतील संशोधक म्हणून अनुभव आहे. परंतु कृष्णा विकास महामंडळाने माहिती देण्याचे नाकारले. 

डॉ. पाटील सुचवतात, त्याप्रमाणे महामंडळाने कृष्णा खोरे विकास योजना अंतर्गत प्रस्तावित उपसा योजनांची तांत्रिक व आर्थिक माहिती खुली करावी. तसेच महामंडळ कर्जरोखरूपाने उभे करीत असलेले भांडवल व त्यावरील व्याज यांची परतफेड करण्याच्या दृष्टीने सिंचन पाणीपट्टीत काय बदल करणार आहे आणि पर्यटन, क्रीडा आदी इतर मार्गानी उत्पन्न किती मिळणार आहे ही माहिती महामंडळाने प्रसिद्ध करावी. महामंडळ स्थापल्यामुळे सधनांची पाणीवारी अधिक वाढण्याचा धोका आहे आणि रोख्यांद्वारे काढलेल्या कर्जाचा बोजा महाराष्ट्राच्या सामान्य जनतेवर ढकलला जाण्याचा धोका आहे: पण कामे पुरी करण्याच्या दृष्टीने कार्यक्षमतेत फरक नाही. तेव्हा महामंडळ बरखास्त करणेच जनहिताचे. डॉ. पाटील यांच्या मते सिंचनक्षेत्रात सुधारणा व्हायची असेल तर निराळ्या दृष्टिकोनांतून विचार करायला हवा. याकरता निराळाच लेख लिहावा लागेल. निराळा विचार व्हायला हवा हे तर खरेच. डॉ. पाटील यांच्या त्याबाबत च्या सेखाचे वाचक स्वागतच करतील.

सुलभा ब्रह्मे, पुणे

----------

3 मेचा 'साधना' चा अंक मिळाला. मुखपृष्ठावर नानासाहेबांचा फोटो पाहून त्याखाली लिहिलेला मजकूर वाचला. हे मुखपृष्ठ संग्रही ठेवावे असे वाटते. इतक्या थोड्या शब्दांत नानासाहेबांचे व्यक्तित्व उभे केले आहे. ते वाचून वर एक फोटो आणि खाली दुसरा असे जाणवले. 'साधना' हे विचारांना चालना देणारे आणि दिशा देऊन घडवणारे साप्ताहिक आहे. त्यातले कितीतरी लेख, मजकूर आम्ही कात्रणे करून आमच्या संग्रही ठेवले आहेत. आता अंक पाहून हे तुमच्यापर्यंत पोचवावे असे तीव्रतेने जाणवले म्हणून लिहिते आहे.

आसावरी काकडे, 
श्रीनिवास काकडे, पुणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके