डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एवढं कारगिल युद्ध चाललं असताना तुम्ही पाकिस्तानी संघास भारतात खेळू देणार नाही, असं म्हणत मैदान खणण्याचा दाखवलेला खिलाडूपणाही अजबच. तीच गोष्ट फायरसंबंधी. भारतासारख्या ‘स्वातंत्र्यप्रिय’ राष्ट्रात त्या अनिवासी दीपा मेहताने तिचे 'विद्रोही' विचार व्यक्त करण्याची हिंमत केलीच कशी? आणि म्हणूनच तिथेही तुम्ही तोडफोड करायला लावून त्या चित्रपटाचे खेळ बंद पाडलेत व भारतीय संस्कृतिरक्षक' ही भूमिका तुम्ही चोख बजावलीत.

अंतःकरणपूर्वक धन्यवाद!

2  डिसेंबरच्या अंकातील घटना-विशेष सदरात चित्रांगदा चा ‘कॉ. ज्योती बसू : राजकीय धुक्यातील लाल तारा’ हा अभ्यासपूर्ण लेख वाचून आनंद झाला. साने गुरुजींचा वारसा आपण चांगल्या प्रकारे जपत आहात याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद. आजकाल प्रत्येक जण ‘अपना बँड बजाता जाये’ यामध्ये मश्गूल असताना आपण ज्योतीबाबूंची कारकिर्द फारच चांगल्या प्रकारे वाचकांसमोर आणल्याबद्दल तुम्हांला व लेखकाला अनेकानेक धन्यवाद, सध्या वृत्तपत्रांतून एनरॉन गाजते आहे. एनरॉनच्या विरोधात एक मोठी चळवळ उभी करून दोषी माणसांना शिक्षा झाली पाहिजे. एम.एस.ई.बी.च्या इंजिनिअर्सच्या संघटनेचे मत असे आहे की, इलेक्ट्रिसिटीबाबत आम्हांला काही शिकवावे याचे ज्ञान एनरॉनला नाही. व्यापारी कराराने बांधून घेऊन 'पैसे कसे उकळावे' याचे ज्ञान व तंत्र त्यांच्याकडे विपुल आहे व आजचे गुन्हेगार राज्यकर्ते त्यात पूर्णतः बुडालेले आहेत. त्यांचे स्वरूप उघड करून करार रद्द करून प्रायव्हटायझेशनऐवजी सहकारीकरण' केल्यास देशाला बरे दिवस येतील असे वाटते.

 तु. द. कुलकर्णी, कोल्हापूर

 

बाळासाहेब ठाकरे यांना अनावृत पत्र

मा. बाळासाहेब ठाकरे,
'मातोश्री', मुंबई.

          विषय : थोडेसे हितगुज 
'साहेबांना' माझा नमस्कार,

मला माझ्या पत्राची सुरुवात तुमच्या अभिनंदनाने करावीशी वाटते. मागे केव्हातरी तुमचा मतदानाचा हक्क हिरावून घेतल्यानंतर (अ)सामान्य जनतेचा तुम्हांला मिळालेला पाठिंबा पाहून मी स्तिमित झाले आहे. तुमचा मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याने 'शिवसैनिकांनी' केलेली (अ)हिंसात्मक आंदोलने पाहून माझ्या मनातही विचारांचे आंदोलन उभे राहिले होते. तुमची लोकांच्या ‘स्तुतिपर’ केलेली भाषणे ऐकून माझ्या विचारांना चालना मिळाली आहे. माझे विचार ‘जागृत’ करण्याचे कार्य केल्याबद्दल खरंच धन्यवाद! तर औपचारिकता सोडून मुद्दयावर येते. लहान असताना मला तुमच्याविषयी फार कुतूहल होते. तुमचा 'भगवा' अंगरखा, त्यावर असलेली रुद्राक्षांची माळ व काळा गॉगल पाहून मी अगदी दिपून गेले होते. हळूहळू शिवसेनेच्या ‘सेने’त अनेक शिवसैनिकांची भर पडत गेली आणि तुमचा पक्ष या ना त्या कारणाने अधिकाधिक (कु)प्रसिद्ध होत गेला. मीपण लहानाची मोठी झाले आणि विचार करू लागले. आजच्या युवा पिढीची प्रतिनिधी म्हणून मला तुम्हांला पत्र लिहावसं वाटलं. आपल्याला माहीत आहेच की महाराष्ट्रातील जनता 'रसिक' आहे. आमचे अहोभाग्य की तुमच्या कृपेनेच आम्हांला 'मायकल जॅक्सन'सारख्या मोठ्या व्यक्तीला पहाण्याची संधी मिळाली. तसे तुम्ही ‘पक्के स्वदेशी’ आहात हो! पण केवळ जनतेच्या 'कल्याणाकरिता' निधी जमा करावा या उद्देशाने तुम्ही ‘मायकल जॅक्सन’चा कार्यक्रम केलात, तुम्हांला एखाद्या भजनी मंडळाचा किंवा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवता आला असता, पण तुम्ही ‘स्वदेशी’ भावनेलाच जास्त महत्त्व दिलंत, तेव्हाच मला कळलं की तुम्हीही आमच्यासारखे सर्वसामान्यच आहात. आमच्यासारख्या सर्वसामान्यांना काही ठाम मतं नसतात आणि आम्ही आमची मतं स्वार्थानुसार बदलतो. शेवटी आयुष्यात तडजोड ही करावीच लागते. पैशापुढे कसली मतं आणि कसलं काय!

तसेच कारगिल युद्धाविषयीही. एवढं कारगिल युद्ध चाललं असताना तुम्ही पाकिस्तानी संघास भारतात खेळू देणार नाही, असं म्हणत मैदान खणण्याचा दाखवलेला खिलाडूपणाही अजबच. तीच गोष्ट फायरसंबंधी. भारतासारख्या ‘स्वातंत्र्यप्रिय’ राष्ट्रात त्या अनिवासी दीपा मेहताने तिचे 'विद्रोही' विचार व्यक्त करण्याची हिंमत केलीच कशी? आणि म्हणूनच तिथेही तुम्ही तोडफोड करायला लावून त्या चित्रपटाचे खेळ बंद पाडलेत व भारतीय संस्कृतिरक्षक' ही भूमिका तुम्ही चोख बजावलीत. अहो, असं "अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं धाडस फक्त तुमच्यासारखी 'स्वातंत्र्यप्रिय' माणसंच करू शकतात. वा! चित्रपट न पाहताही तुम्ही त्यावर टीका करू शकता, मला खरंच तुमचं कौतुक वाटतं.

आपल्या क्रिकेटप्रिय भारतीयांची मने तोडणा-या 'अल्पसंख्याक' अझरुद्दीनची निंदा तुमच्या शिवसैनिकांनी त्याचा पुतळा जाळून केली हे बरंच झालं. तुम्ही तर त्याला परस्पर शिक्षाही ठोठावून टाकलीत. नाहीतरी 'कायद्यात' काय ठेवलंय? "कायद्याने थोडंच राज्य चालतं? राज्य तर धमक्या, दंगली व स्वातंत्र्य हिरावून घेतल्याने चालतं. काय बरोबर ना? ॲम आय राइट? अहो साहेब, म्हणूनच तर महाराष्ट्रातील 'हिंदुत्वप्रिय' जनतेने बहुमताने आपल्या हातात राज्याची सूत्रे दिली आणि त्याच बहुमताने पराजितही केले. तरीही तुम्ही खिलाडू वृत्तीने त्यांची स्तुती केलीत. अगदी काल-परवाच वाचले की, अल्पसंख्यांकाचा विशेषतः मुस्लिमांचा कथित अनुनय करण्यापासून काही राजकीय पक्षांना परावृत्त करण्यासाठी मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्यात यावा असे आपण म्हणालात. ही बातमी वाचून तमाम हिंदुत्ववाल्यांची मान अभिमानाने उंचावली गेली असेल. पण एकच विचारावेसे वाटते, तुमचा मतदानाचा हक्क हिरावला गेला, तो ज्या कारणाने हिरावला गेला ते कारण योग्य की अयोग्य यावर मला वाद घालायचा नाही. पण जर तुमचा मतदानाचा हक्क हिंदू म्हणून हिरावला गेला असता तर...?  कुठल्या धर्मात जन्माला यावं हे काही आपल्या हातात नसतं आणि स्वतःच्या धर्माला उच्च समजून इतरांच्या धर्माला कमी लेखण्याचा 'अधिकार' तुम्हांला कुणीही दिला नाही. मग जर तुम्ही इतर धर्मीयांचा अधिकार काढून घेत असाल किंवा तशी मागणी करत असलात तर तुमचा 'हिंदुधर्म' मुळीच ‘सर्वसमावेशक’ नाही हे मान्य करा.

पत्राच्या शेवटी सांगू इच्छिते की, इतरांच्या हकांची पायमल्ली करण्याचा तुम्हांला काहीही हक्क नाही.
 
अमृता नं. प्र. 
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके