डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गुजरात दंगलीमागची मानसिकता

गुजरातमधील भीषण आणि अमानुष हत्याकांडाबद्दल 'साधना'मध्ये आतापर्यंत बरेच लिहून आले आहे. त्यात प्रत्यक्ष दंगलीच्या हत्याकांडाच्या अंगावर काटा उभा करणाऱ्या हकीगती, राजकीय पुढाऱ्यांची वक्तव्ये, गुजरातेतील व केंद्रातील राज्यकत्यांची आक्रमक व आव्हान देणारी भाषणे आणि विविध पाहण्यांतून सादर केलेल्या गुजरातच्या विकल सामाजिक परिस्थितीचे अहवाल आदींचा समावेश होता. सदर लेखात गुजरातेतील दोनही समाजांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे बदललेल्या परिस्थितीचा व मानसिकतेचा आढावा घेतला आहे.
 

"हिंदुस्थानातील आजचे मन अतिशय क्रूर व स्वेच्छाचारी झाले आहे. अहिंसा व दयाभावनेचा हा देश आज जगातील सर्वांत कर देश असेल! सामाजिक जीवनातील व्यापक क्रौर्याचा हा परिणाम असावा. स्वार्थ व पिसाट पद-प्रतिष्ठा यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. सत्तासंपादन आणि परंपरा यांचे साधन, स्वार्थ साधण्याचे साधन. 

- डॉ.राममनोहर लोहिया, डिसेंबर 1957

डॉ. राममनोहर लोहियांची दूरदृष्टी व वचनाची प्रचीती गुजराथ पायाखाली घालताना आली. गुजराथच्या दंगलीनंतर गुजरायचा, धार्मिक द्वेषाचा ज्वालामुखी तूर्त निद्रिस्त झाल्यानंतर मी गुजराथमध्ये फिरलो, शक्यतो अलिप्तपणे दंगलग्रस्त भागातील काही क्षेत्राचा मागोवा घेतला. 

प्रसिद्धीमाध्यमे व चित्रवाहिनींच्या दृश्य दर्शनांमुळे एक अपसमज पसरला की सारा गुजराथ हा धार्मिक दंगलींचा अड्डाच बनला आहे. परंतु हे पूर्ण सत्य नाही. महाराष्ट्राच्या सीमेवरील वलसाड, डांग, सुरत हे जिल्हे पूर्ण शांत होते. दक्षिण गुजरातमध्ये, सौराष्ट्रात दंगलीचे प्रमाण लक्षणीय नव्हतेच. गुजरातमधील दंगली या जुने अहमदाबाद, बडोदा शहर, अंकलेश्वर, हाजकोट, बनासकांठा, सांबरकाठा, पंचमहाल जिल्ह्यातील काही तालुके यापुरत्याच मर्यादित होत्या. दंगली संपल्या तरी खपल्यांचे व्रण राहतातच. हे व्रण व पुवाळण्याच्या जखमा फक्त अहमदाबाद व बडोदा शहरातच प्रामुख्याने होत्या. दंगलीच्या तपशीलापेक्षा या दंगलीमागील कोणते मतप्रवाह होते, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. हे मतप्रवाह कळले तरच किमान आधे-अधुरे विश्लेषण करता येईल.

बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभर मुस्लिम समाज मूलतत्त्ववादाकडे खेचला गेला. आपली धार्मिक अस्मिता व आपले वेगळेपण दाखवू लागला. तालिबानी प्रवृत्ती आल्या. हा वेगळेपणा केशभूषा, पहनावा, कपडे, तुटकी टोपी या बाह्य लक्षणांपुरता मर्यादित राहिला नाही तर तो अंतर्मनातही घर करून बसला. बलसाडसारख्या शांत गावातही धर्माध मुल्लामौलवींसमोर मान तुकवून घरातील 'म्युझिक सिस्टीम' व टी.व्ही ही मुस्लिमांना विकावे लागले. मदरसांमधून लहान बालकांना धार्मिक शिक्षण देता देता धार्मिकदृष्ट्या आपण अलग आहोत, हे शिकविले जाऊ लागले. बाबरी मशीद पाडण्याची कृती व ओसामा बिन लादेनचा उदय या समांतर घटना आहेत, परिणामी उत्तर प्रदेशापुरताच मुस्लिम कठोर, दुराग्रही न राहता अगदी सुदूर दक्षिणेपर्यंत एक धार्मिक कठोरता मुसलमानांत आली. 

मुस्लिमांप्रमाणे हिंदू समाजात बदल होत होते. गुजरातसारखा संवेदनशील प्रदेश हा हिंदुत्ववाद्यांच्या प्रयोगशाळेला अनुकूल ठरला. गुजराथी मानसिकता धार्मिकदृष्ट्या कट्टर आहे. पांडुरंगशास्त्री आठवलेंचा स्वाध्याय परिवार, डोंगरेमहाराज, आसारामबापू, मुरारीबापू, स्वामी नारायण संप्रदाय, वल्लभाचार्यांचा पुष्टी संप्रदाय यांमुळे गुजराथमधील हिंदू मने अधिक धार्मिक झाली. जीवनातील अस्थिरता, उद्योग व्यवसायात आर्थिक उदारीकरणामुळे आलेले चढउतार यामुळे हिंदू माणसांतील धुसमटीला हे सर्व संप्रदाय खुल्या हवेचे झरोके वाटले. यामुळेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाबद्दल हिंदू माणसात सहानुभूती निर्माण झाली. अनिवासी भारतीयांत गुजराथी बांधवांची संख्या अधिक आहे. मंदिरनिर्मिती, जुन्या 

(अपूर्ण)

Tags: दंगल नरेंद्र मोदी गुजरात दंगल गुजरात धार्मिक अस्मिता पुरुषोत्तम शेठ religious identity गुजरात दंगली Purushottam Sheth Gujarat riots Weekly sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके