डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सोहळा अक्षराचा : आंतरप्रांतीय साहित्य संमेलन

रविवारच्या सहाव्या सत्रात 'राष्ट्रीय एकात्मता आणि साहित्यिकांची जबाबदारी' हा परिसंवाद झाला. यात श्रीपाद जोशींनी धर्मश्रद्धांची गरज सांगितली. साहित्यच राष्ट्रीय एकात्मता टिकवू शकेल असे डॉ. श्रीपाद परुळेकर म्हणाले, तर कुमार केतकर यांनी निधर्मी राष्ट्रवादाची जडणघडण साहित्यिकांनी करण्याचे महत्व मांडले. प्रा. सुभाष दगडेंनी राष्ट्रीय एकात्मतेचे वाढते धोके मांडले तर सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. म. द. हातकणंगलेकरानी राष्ट्रीयत्व व राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनाशी साहित्यिकांनी समरस होऊन राष्ट्रधारणेच्या घडणीत जबाबदारीचे अवधान ठेवण्याची समर्पक भूमिका विषाद केली. 

जयसिंगपूरच्या अप्रतिम जीवन साधना केंद्रा'ने जानेवारीमध्ये घेतलेल्या 'आंतरप्रांतीय मराठी साहित्य संमेलना'ची ही रसीली झलक! नवजीवन हायस्कुलच्या विद्यार्थिनीचे सुरेल स्वागतसंगीत, केंद्राचे अध्यक्ष प्रा. राम कानगुडेंचे प्रास्ताविक आणि नगराध्यक्ष डॉ. मगदूम यांचे स्वागत; यांनी सोहळा सुरू झाला. भरत बँकेच्या पाठबळाने संमेलन ‘भरत नगरा’त भरविले होते. बँकेचे चेअरमन डॉ. एस. के. पाटील म्हणाले, 'तत्वहीन राजकारण, चारित्र्यहीन नाटक आणि श्रमाविना पैसा, अशी सद्यःस्थिती आहे. असा संमेलनांनी तिच्यावर उपाय शोधता येतील.

'माणसात पराक्रम निर्मिणारे, मानवतेची पूजा शिकविणारेच खरे साहित्य. 'स्वागताध्यक्ष पद्मश्री रत्नाप्पाण्णा कुंभार म्हणाले, समाजाच्या वेदना साहित्यात व्यक्त व्हाव्या. स्त्रीने विशेष गंभीरपणे, जबाबदारीने साहित्यनिर्मिती करावी. प्रा. कल्याणी इनामदार दीपप्रज्वलन करून म्हणाल्या, 'गल्लाभरू लेखन नको, जिवंत अनुभव साहित्यात उमटावे. आमचे तत्वज्ञान समृद्ध आहे, परंतु आम्हीच आत्मकेंद्रित आहोत. एखायाचे चारित्र्यहनन करणे म्हणजे सर्वांचीच अधोगती होते, तर चारित्र्याचे उन्नयन म्हणजे सर्वांची प्रगती होय.'

संमेलनाच्या अध्यक्षा निर्मलाताई देशपांडे म्हणाल्या, 'आज आपण आपली ओळख विसरलो आहोत. शिक्षणपद्धतीने ही ओळख करून घ्यावी. साहित्य हवे, आसमंत हलवणारे! हृदयाचे तुकडे होऊ न देण्याचे काम साहित्यिकांचे आहे. आभार प्रा. रविकिरण बुलबुले यांनी मानले.

रात्रीचा कथाकथन कार्यक्रम तर रंगताच, सर्वश्री. ज्योत्स्ना देवधर, शैलजा राजे, स्नेहसुधा कुलकर्णी, प्रा. संजय थोरात, बाबूराव गुरव, यांच्या गोष्टींनी दाद मिळविली.

शनिवारी ' भक्तिसंप्रदाय व मराठी साहित्य हा परिसंवाद मा. बाळासाहेब भारदेंच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यात डॉ. - विजया तेलंग म्हणाल्या, शरणभाव हा सर्वत्र सारखाच असतो. भक्तीचे व मराठी साहित्याचे अतूट नाते आहे. वात्सल्य भक्ती, ज्ञानभक्ती व वीराणी भक्ती हे भक्तिप्रकार अनुक्रमे महानुभाव, ज्ञानेश्वरी व भागवत यांत आढळतात. डॉ. पंडित आवळीकर म्हणाले, "दैनंदिन आशाआकांक्षेच्या संबंध भक्तीशी असतो. भक्ती ही उत्कट व अनुभूतीची उच्च भावना होय. या रसाने माणसातील देव दिसतो. अशा वाड्:मयाने तणावस्थिती निवळते.' डॉ. र. बा. मंचरकर म्हणाले, भक्तीने साहित्याला जीवनरस पुरविला. सत्वसंपन्न केले. सतांची भक्ती व त्यांचे आंदोलन स्त्री व शुद्रांच्या मुक्तीसाठीच होते. भक्तीने भावनिक उत्कटता मराठीत आली. डॉ. श्रीपाद पारूळेकरांनी, विश्वात्मक जडणघडणीच्या संत वाङ्मयाच्या सखोल अभ्यासाने दर्जेदार मराठी साहित्य निर्मितीला मदत होईल, असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात श्री. बाळासाहेब भारदे म्हणाले की, 'संतवाङ्मय पुरोगामी, क्रांतिकारी, सर्वात्मक आहे. समाजातील वेदना व भक्तीच्या संवेदना, भूतदया व समता यांचा समन्वय व भावनेचा उच्चाविष्कार भक्तिसाहित्यात आढळतो. मानणं व जाणणं या दोन रूळांवरून मानवी जीवन जाते. मानव्याने महान शक्ती जाणण्याने अनुभव मिळतो. भक्तीसाहित्य जगण्याची सार्थकता पटवते.'

'प्रचारमाध्यमे व मराठी साहित्य’ या सत्रात प्रा. वैजनाथ महाराज, पी. बी. पाटील, डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांनी साहित्यिक व प्रचारमाध्यमे दोघांनीही परस्परांना समजून घेण्याची गरज व्यक्त केली. नंतर अनुभव-नयनाच्या कार्यक्रमात सूर्वश्री माधव कोंडविलकर, दया पवार, पोलिस इन्स्पेक्टर मधुकर झेंडे, रामदास फुटाणे ('मुंबईचे 'झेंडे' गोव्यावर फडकले !') यांनी आपले थरारक अनुभव जिवंत शब्दांत सांगितले.

पाचव्या सत्रात रात्री कविसंमेलन नारायण सुर्वे यांच्या अपक्षतेखाली संपन्न झाले. त्यात सुमारे 50 कवीनी रसिकांना काव्यानंद मिळवून दिला.

रविवारच्या सहाव्या सत्रात 'राष्ट्रीय एकात्मता आणि साहित्यिकांची जबाबदारी' हा परिसंवाद झाला. यात श्रीपाद जोशींनी धर्मश्रद्धांची गरज सांगितली. साहित्यच राष्ट्रीय एकात्मता टिकवू शकेल असे डॉ. श्रीपाद परुळेकर म्हणाले, तर कुमार केतकर यांनी निधर्मी राष्ट्रवादाची जडणघडण साहित्यिकांनी करण्याचे महत्व मांडले. प्रा. सुभाष दगडेंनी राष्ट्रीय एकात्मतेचे वाढते धोके मांडले तर सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. म. द. हातकणंगलेकरानी राष्ट्रीयत्व व राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनाशी साहित्यिकांनी समरस होऊन राष्ट्रधारणेच्या घडणीत जबाबदारीचे अवधान ठेवण्याची समर्पक भूमिका विषाद केली. 

'स्त्री आणि मराठी साहित्य' या परिसंवादात श्रीमती प्रेमिलाताई दंडवते यांनी स्त्री स्वतंत्र झाल्याने आता ती अधिक प्रगल्भ लेखन करील अशी खात्री व्यक्त केली. प्रा. पुष्पा भावे, बाबूराव गुरव यांनी आपले विचार व्यक्त केले.

समारंभाच्या समारोपात प्रा. डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, कार्याध्यक्ष डॉ. पाटील, यांनी साहित्यिकांकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या.

उचित ठराव; स्वर्गीय कलावंत व विद्धजननांना श्रद्धांजली आणि आभार प्रदर्शनानंतर या सोहळ्याची सांगता झाली, ती पुढील कार्यक्रमाच्या उत्सुकतेने!

Tags: बाळासाहेब भारदे भागवत ज्ञानेश्वरी मराठी साहित्य जयसिंगपूर Balasaheb Bharde.#साहित्य संमेलन Bhagvat Dyaneshvari Marathi Literature Jaysinghpur #Literature Meeting weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके