डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रा.शरद पाटील यांनी सांगली जिल्ह्यासह या मतदारसंघातल्या ग्रामीण भागांतल्या पदवीधरांची मतदार नोंदणी केली. गेली दोन वर्षे ते सतत राबले. यापूर्वी या मतदारसंघात ग्रामीण पदवीधर जणू नाहीतच अशी परिस्थिती होती. त्या पदवीधरांच्या मतांनी प्रा. पाटलांचा विजय झाला. केवळ शहरी, पुणेरी मतदारांच्या जिवावर निवडणूक जिंकता येत नाही याचा धडा जावडेकरांसह संघ परिवाराला मिळाला. इथून पुढे अशा निवडणुकांत ग्रामीण पदवीधर मतदारांना महत्त्व आल्याशिवाय राहणार नाही. 

पुणे पदवीधर मतदारसंघातून डावी आघाडी व जनता दलाचे प्रा. शरद पाटील विधानपरिषदेवर सहा हजार मतांनी निवडून गेले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रकाश जावडेकर यांचा दणदणीत पराभव केला. जावडेकर या मतदारसंघाचं गेली बारा वर्षे प्रतिनिधित्व करीत होते. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जायचा. काही केल्या जावडेकर जाणार नाहीत असं वर्तमानपत्रवाल्यांसह सर्वजण बोलायचे. पुणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राबता असलेला परिसर. पदवीधरांची संख्याही या परिवारातच जास्त. मतदार नोंदणीतही त्यांची आघाडी असते, मतदान केन्द्रापर्यंत पदवीधरांना आणण्यातही त्यांचा हातखंडा असायचा. या सर्व वैशिष्ट्यांमुळे जावडेकर जड़ पडतील असा अनेकांचा कयास असायचा. 

प्रा.शरद पाटील यांनी सांगली जिल्ह्यासह या मतदारसंघातल्या ग्रामीण भागांतल्या पदवीधरांची मतदार नोंदणी केली. गेली दोन वर्षे ते सतत राबले. यापूर्वी या मतदारसंघात ग्रामीण पदवीधर जणू नाहीतच अशी परिस्थिती होती. त्या पदवीधरांच्या मतांनी प्रा. पाटलांचा विजय झाला. केवळ शहरी, पुणेरी मतदारांच्या जिवावर निवडणूक जिंकता येत नाही याचा धडा जावडेकरांसह संघ परिवाराला मिळाला. इथून पुढे अशा निवडणुकांत ग्रामीण पदवीधर मतदारांना महत्त्व आल्याशिवाय राहणार नाही. 

प्रा.पाटीलांच्या विजयाने त्याकडे अंगुलीनिर्देश केलाच आहे. प्रकाश जावडेकरांच्या पराभवामुळे भाजपच्या शिस्तबद्ध घरातला गोंगाट बाहेर ऐकू येऊ लागला आहे. जावडेकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हापुरचे सुनील मोदी यांनी बंडखोरी करून या कलहाची जाणीव करून दिली. जावडेकर पडेपर्यंत मोदी हटले नाहीत. जावडेकरांचा प्रचार सुरू करताना पुण्यात प्रचाराची सभा झाली. त्या सभेत पुण्याचे खासदार प्रदीप रावत यांनी जावडेकर पडतील असे अपशकुनी वक्तव्य केले होते. भाजप सरचिटणीस शरद कुलकर्णी यांनी पदवीधर मतदार आळशी असतात अशी मुक्ताफळे उधळून पदवीधरांचा अपमान केला होता. या अपमानाची दखल खुद्द संधपरिवाराच्या लोकांनी घेतली. 'ज्याने केले काम त्यालाच असते मतदान' या जावडेकरांच्या भावनिक आवाहनाला त्यांनी 'ज्यांनी केला अपमान त्यांना नाही मतदान' अशी बॅनर्स झळकवून उत्तरे दिली होती. जावडेकरांच्या पराभवानंतर एक संघ स्वयंसेवक म्हणाला की, संघाचे नारायण वैद्य हे जावडेकरांच्या अगोदर एक टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. त्या वेळी वैद्यांविरुद्ध "एक टर्म झाली आता खाली बसा' असं म्हणून बंडाचा झेंडा जावडेकरांनीच उभारला होता. त्याच न्यायाने सुनील मोदींनी बंडखोरी केली. मात्र त्यांची कुणी दखल घेतली नाही, म्हणूनच जावडेकर आपटले.

वरील पैकी काहीही असो, पण प्रा. पाटीलांचा विजय संघ परिवाराला मान खाली घालायला लावणारा आहे. एकेकाळी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व प्रा. ग. प्र. प्रधानांनी केलं होतं. नारायण वैद्य आणि जावडेकरांमुळे प्रा. प्रधानांचा वारसा खंडीत झाला होता. तो वारसा प्रा. पाटील यांनी स्वीकारला आहे. खुद्द प्रा. पाटीलांनी त्यांच्या विजयाचं श्रेय पुरोगामी संघटनांसह प्रा. ग. प्र. प्रधान, प्रा. एन. डी. पाटील, भाई वैद्य, श्रीपतराव शिंदे यांच्या प्रयत्नांनाही दिलं आहे. 

प्रा. पाटीलांचा विजय हा समाजवाद्यांच्या पडत्या काळातला विजय आहे. महाराष्ट्रात समाजवाद्यांची शक्ती क्षीण होत चालली आहे. सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता आहे. समाजवाद्यांची नव्याने शक्ती उभी करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या प्रयत्नांना प्रा. पाटील यांचा विजय आश्वासक पूरक ठरायला हवा. प्रा. प्रधानांचा उज्ज्वल वारसा त्यांना पुढे चालवायचा आहे. विजयानंतरच्या प्रा. पाटील यांच्या वक्तव्यांवरून ते सूचित झाले आहे. हे करत असताना जावडेकरांनी अपमान केलेल्या पदवीधरांना सन्मान मिळवून द्यायचंही काम पाटील यांना करावं लागेल. या कामासाठी प्रा. शरद पाटीलांना शुभेच्छा! 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके