डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माझ्या मनाला मला निरुत्तर करायचंय...

‘म्हणजे काय? गुणवत्ता नकोच.’ मी त्याला आडवलं. तर त्याचं सुरू... ‘त्येच म्हणतोय. तुमच्या गुणवत्तेच्या संकल्पना का? 99% मार्क्स आहेत. पण तो नागरिक म्हणून नापास आहे. तुम्हाला चालतो. नेट-सेट आहे पण मास्तर म्हणून नापास आहे.तुम्हाला चालतो. एम.बी.बी.एस., एम.डी. 99% आहेत. रुग्ण तपासता येत नाही तरी चालतो तुम्हाला. सगळीकडं हेच चाललंय. ह्या तुमच्या देशात कुणालाच नागरिक नको आहेत. आणि तुम्ही गुणवत्तेवर बोलणार. वशिलेबाजी, खोटी गुणवत्ता आणि फक्त एका साच्याचे गणपती, ही शिक्षण व्यवस्था असू शकते का? आणि गुणवत्तेवर बोलायचे असेल तर ह्या व्यवस्थेत गुणवानाचे स्थान काय? इथला सगळा बुद्धिमान वर्ग कुठल्या तरी खोपड्यात पडलेला किंवा परदेशी गेलेला. इथं गुणवानाला किंमतती काम? इथं सगळ्यात नालायक माणूस म्हणजे गुणवान! अशी व्यवस्था असते का? या सगळ्याला लोकशाही म्हणता येते का? काम आहे हे सगळं? आता ह्या सगळ्याला टाळण्यासाठी तू म्हणशील, ह्याचा आणि शिक्षणाचा संबंध काम? हे शिक्षणातून आलंय असं कसं म्हणायचं? असले प्रश्न म्हणजे एकदम बथ्थडपणा. हा बथ्थडपणा हा इथल्या व्यवस्थेचा भाग बनलाय. त्यामुळे वास्तव नीट न बघण्याची सवय झालीय.’

‘बनावट प्रमाणपत्रे विकणारी टोळी जेरबंद’ अशा भल्या मोठ्या मथळ्याची बातमी सकाळी-सकाळी वाचली. अशी बातमी दर पाच-सहा महिन्यांनी वृत्तपत्रांत येत असते. फक्त स्थळ वेगळे असते. सर्वदूर घडणारी ही सततची घटना. कंटाळा यावा अशी. पण आज ही बातमी वाचताना मी थोडा अधिकच कुतूहलमुक्त नजरेने त्या टोळीतल्या आरोपींचे फोटो बघू लागलो. आजूबाजूच्या वावरणाऱ्या टोळीतल्या बेरोजगार तरुणांपैकीच ते. घरंदाज गुन्हा करणाऱ्याच्या डोळ्यात जे असते त्यापैकी काहीच त्यांच्या डोळ्यात दिसत नव्हते. अगतिक, अपराधी चेहरे आणि पराभूत झालेले ते गुन्हेगार वाटायलाच तयार नव्हते. भल्या सकाळी मी माझ्या मनाला समजावीत होतो- ‘ते गुन्हेगारच आहेत. अशी बोगस प्रमाणपत्रे तयार करून विकणे, हा व्यवसाय कसा होईल? असे करणे समाज विघातकच. असे लोक समाजात असूच नयेत. यामुळे समाज बरबाद होईल. इत्यादी इत्यादी.’ पण माझ्या मनाची पूर्ण समजूत काढणे मला शक्य होत नव्हते. माझे मन त्यांना आजच्या वास्तवात गुन्हेगार मानायला तयार नव्हते. मग मी माझा नेहमीचा खेळ सुरू केला. सवाल-जवाब. हे शस्त्र मला फार उपमोगी पडतं. मनाला निरुत्तर करण्यात मी अनेक वेळा यशस्वी होतो. या ठिकाणी मात्र थोडं अपयश आलं. झालं असं-मनाला मी पहिला प्रश्न विचारला.

‘का बाबा, हे तुला गुन्हेगार का वाटत नाहीत?’

त्याने सुरू केलं, ‘त्यांना गुन्हेगार ठरवायचे असेल तर तुझी यातून सुटका कशी काय होईल? तू यांच्या पेक्षा मोठा गुन्हेगार?’

‘म्हणजे?’ माझा अभावित प्रश्न.

त्याचं सविस्तर उत्तर.

‘तुम्ही प्राध्यापक मंडळी दुसरं काम करता? बोगस प्रमाणपत्रंच वाटता. फक्त तुमची सरकारमान्य दुकानं आहेत. त्यांच्याकडं सरकारमान्यता नाही. यावर तू म्हणणार- असं कसं? पण हा प्रश्नच होत नाही. महाराष्ट्रभरच्या सगळ्या कॉलेजात दुसरं काम होतं. अपवाद आहेत, हे एकदम मान्य. पण अपवाद नियम कसा होईल. मुलं प्रवेश घेतात. निरुपयोगी अभ्यासक्रम त्यांच्या माथ्यावर मारले जातात. एकशेऐंशी दिवस शिकवलं की पुढचा कैफियत वर्ग. शिकवायचं म्हणजे काम? तर के.सागर, देसाई-लिमये, निराली यासारख्यांची गाईड्‌स वर्गात वाचून दाखवायची. समजाही गाईड्‌स प्रसिद्ध झाली नाही तर कितीतरी लोकांना हृद्यविकाराचे झटके येतील. हे तुला मान्य व्हायला हरकत नाही. एकशेऐंशी दिवस संपले की, वर्षाच्या शेवटी परीक्षा. परीक्षा म्हणजे काय? तर तेच ते प्रश्न. पुन्हा पेपर तपासणे म्हणजे काय? पानं पालटणं. तासाला साठ पेपर तपासून होतात. ह्यावर खूप चर्चा झालीय. मग ही कसली आहेत पदवीपत्रे? बोगसच की? सरकारी पैशावर प्रमाणपत्रे वाटणारे तुम्ही सरकारी दुकानदार?’

मनाला थांबवतच मी म्हटलं, ‘हे वास्तव खरं असलं तरी तसं म्हणणं योग्य नाही. कारण ही एक कामदेशीर व्यवस्था आहे. प्रशासन आहे. घटनात्मक रचना आहे. राष्ट्रीय धोरण आहे. उद्दिष्टे आहेत. या साऱ्याच्या पाठीमागे एक शिक्षणशास्त्र आहे. त्याला बोगस नाही म्हणता येणार. त्रुटी असतील, पण हे सारे कायदेशीर आहे!’

‘हो मला मान्य आहे.’ असे म्हणूनच मला थांबवत त्याने सुरू केले.

‘तुमचे सरकारमान्य दारू दुकान. ते लोक अवैध दारू विक्रेते. फरक काय? दोघे दारूच विकणार- एक टॅक्स भरून, दुसरा टॅक्स चुकवून.’

हे ऐकून माझं डोकंच सणकलं. एकदम चीड आली. मनाला थांबवत मी म्हटलं, ‘हे ऐकून घेतलं जाणार नाही. शिक्षणासारख्या पवित्र गोष्टींबाबत असं बोललेलं चालणार नाही. याद राख.’

‘चिडायचं नाही.’ म्हणतच त्यानं सुरू केलं. ‘चिडल्याने विवेक संपतो, शांतपणे बोलण्यानं चर्चा होते. संतापल्यानं वास्तवना करता येत नाही. आपण एकेक गोष्ट विचारासाठी घेऊ. नंबर एक- भारतात इंग्रज येण्या पूर्वी शिक्षण व्यवस्था होती की नव्हती? ज्याअर्थी इतकी हजार वर्षे हा समाज चालत आला होता, त्याअर्थी त्यांची त्यांची काही एक शिक्षण व्यवस्था होती. कुणाची गुरूकुल व्यवस्था होती तर कुणाची अन्य काही व्यवस्था होती. त्याशिवाय हा समाज चाललाच नसता. अन्यांच्या व्यवस्थेचे पुरावे नष्ट झाले किंवा केले गेले. नाहीतरी नालंदा, तक्षशीला इथं काम चाललं होतं, याविषयी आज काहीच कोणी स्पष्ट पुराव्याच्या आधारे बोलत नाही. त्या विद्यापीठांचं सोडून देऊ. मॅकॅले याने इंग्लंडच्या सभागृहात केलेल्या भाषणाचे काम करायचे? आज ते भाषण चर्चेत आहे. तेही खड्‌ड्यात घालू. स्वातंत्र्यानंतर मॅकॅलेच्या शिक्षण व्यवस्थेशी आपल्याला संबंध तोडता आले का? स्वतंत्र भारताचा नागरिक कसा असावा, याचं सुस्पष्ट चित्र आपल्याला लोकांसमोर ठेवता आलं का? तेही जाऊ द्या, ज्ञान आणि नोकरी यांचा संबंध, म्हणजेच शिक्षण आणि नोकरी यांचा संबंध तोडता आला का? आपले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला आपल्या देशाच्या गरजेनुसार आखता आले का?आपल्या देशाच्या गरजेनुसार आपले ध्येय, उद्दिष्टे, अभ्यास क्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके तयार करता आली का? शेवटी शिक्षण म्हणजे काम, याविषयी आपण गंभीर होतो का? कशाचं तुमचं शिक्षणशास्त्र?’

म्हटलं- ‘इतके प्रश्न? याचा आणि आपल्या चर्चेचा संबंध काय?’

माझ्या ह्या प्रश्नाने माझे मन जोरजोराने हसायला लागले. शांत होत म्हणाले, ‘जाऊ दे. हे कळणारच नाही तुला. तू नेट-सेटच्या जमान्यातला शिक्षक. नेट-सेट झालं की उत्तम शिक्षक होता येतं का? शिक्षकाला प्रशिक्षण ही गरज आहे, हेच न पटणारे लोक नेट-सेटसारख्या भंपक परीक्षांची शिफारस करतात. नेट-सेट झालेला एक मुलगा तोतरा आहे. तो उत्तम शिक्षक होऊ शकेल? नेट-सेट परीक्षा पास मुलगा वर्गात उभाच राहू शकत नाही, तो शिकवू शकेल? कशाचा हट्ट धरत तुम्ही शिक्षणाचं वाटोळं करताहात?’

‘म्हणजे काय? गुणवत्ता नकोच.’ मी त्याला आडवलं. तर त्याचं सुरू... ‘त्येच म्हणतोय. तुमच्या गुणवत्तेच्या संकल्पना का? 99% मार्क्स आहेत. पण तो नागरिक म्हणून नापास आहे. तुम्हाला चालतो. नेट-सेट आहे पण मास्तर म्हणून नापास आहे.तुम्हाला चालतो. एम.बी.बी.एस., एम.डी. 99% आहेत. रुग्ण तपासता येत नाही तरी चालतो तुम्हाला. सगळीकडं हेच चाललंय. ह्या तुमच्या देशात कुणालाच नागरिक नको आहेत. आणि तुम्ही गुणवत्तेवर बोलणार. वशिलेबाजी, खोटी गुणवत्ता आणि फक्त एका साच्याचे गणपती, ही शिक्षण व्यवस्था असू शकते का? आणि गुणवत्तेवर बोलायचे असेल तर ह्या व्यवस्थेत गुणवानाचे स्थान काय? इथला सगळा बुद्धिमान वर्ग कुठल्या तरी खोपड्यात पडलेला किंवा परदेशी गेलेला. इथं गुणवानाला किंमतती काम? इथं सगळ्यात नालायक माणूस म्हणजे गुणवान! अशी व्यवस्था असते का? या सगळ्याला लोकशाही म्हणता येते का? काम आहे हे सगळं? आता ह्या सगळ्याला टाळण्यासाठी तू म्हणशील, ह्याचा आणि शिक्षणाचा संबंध काम? हे शिक्षणातून आलंय असं कसं म्हणायचं? असले प्रश्न म्हणजे एकदम बथ्थडपणा. हा बथ्थडपणा हा इथल्या व्यवस्थेचा भाग बनलाय. त्यामुळे वास्तव नीट न बघण्याची सवय झालीय.’

म्हटलं- ‘म्हणजे काय?’

‘बरोबरच. हे अपेक्षितच होतं. म्हणजे काय? हा प्रश्न कुणाच्या मनात येईल. इथली व्यवस्था न बघणाऱ्याच्या विनाअनुदान संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्याच्या , भ्रष्ट व्यवस्थेचा भाग असलेल्यांच्या.’

म्हटलं- ‘आता हे विनाअनुदानाचे मध्येच काय?’

‘वा रे! वाऽऽ माला म्हणतात बथ्थड! मघाशी आपला वाद सुरू झाला तो कोठून? बोगस प्रमाणपत्र विकणारे गुन्हेगार आहेत का, येथून. हे विनाअनुदानवाले कोण? काम करताहेत? यांच्या संस्था कशा आहेत, कुठे आहेत? यांच्या संस्थेत जे शिक्षण दिले जाते ते योग्य आहे का? त्यासाठी भौतिक सुविधा आहेत का? हे बाजूस ठेवू. किमान शिक्षक? किमान इमारत? किमान सुविधा आहेत? हे सगळेच जाऊ द्या. ज्या माणसाने ही संस्था स्थापन केली आहे त्याचा आणि शिक्षणाचा संबंध? या विनाअनुदान शिक्षणसंस्था काढणारे गुन्हेगार किती आहेत? प्रत्यक्ष खुनी किती आहेत? यांचा आणि शिक्षणाचा संबंध काम आहे? ह्यांनी शिक्षणसंस्था काढली म्हणजे काम केले? बोगस प्रमाणपत्रे वाटण्याचे राजरोस दुकान काढले.20 दिवसात बी.एड., महिन्यात डी.एड., 30 लाखात डॉक्टर. इथं साने गुरुजी नावाचा शिक्षक होऊन गेला. गांधीजी यादेशातच जन्मले. आगरकर गुरुजी होते. जे.पी. नाईक बहुतेक इथलेच असावेत. या भूमीत ह्या सगळ्या शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्याचे डोळे कधी बघितलेस? उन्यत्त, माजोर, खूनशी, यातला एकही डोळा साने गुरुजींच्या डोळ्यातला प्रेमभाव, करुणा, आस्था जोपासणार आहे? सगळे शिक्षणसम्राट एका ओळीत उभे करून फक्त त्यांचे डोळे सामान्य माणसासमोर ठेवले आणि त्यांना विचारले हे लोक कोण असू शकतील? तर उत्तरेकाम येतील ? याउलट बनावट प्रमाणपत्रे विकणाऱ्याचे फक्त डोळे सामान्य माणसासमोर ठेवले तर उत्तरे काम येतील ? हिंमत असेल तर प्रयोगच करून बघ. याचा अर्थ मी बनावट प्रमाणपत्रे विकणाऱ्याच्या बाजूचा आहे असे नाही. ते गुन्हेगार आहेतच. पण त्यांच्या पेक्षा मोठे गुन्हेगार शासनाच्या आश्रमाने राजरोस ‘महर्षि’ झालेत त्याचे काम? ह्या शासनाचं काम?  राज्यकर्त्यांच काम? शिक्षणाचं काय? बोल ना, एकदम खुलं बोल!’

काम बोलणार? मला उत्तर सुचत नव्हतं. सुचत नाही. मी हतबल झालोय. पण हा प्रश्न मला मिटवायचाय. काम करावं? मला माझ्या मनाला निरुत्तर करायचंय. त्याशिवाय मी सुखानं जगू शकत नाही. तुम्हाला काही सुचलंच तर कळवा. कारण या व्यवस्थेतला मी एक हतबल मास्तर आहे. आणि तरीही मला जगायचं आहे. माझ्या मनातली घालमेल संपवायची आहे.

Tags: कैफियत राजन गवस rajan gavas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके