डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रणवचा आवाज गहिवरला होता. त्याने माझ्या नकळत डोळ्यातलं पाणी टिपलं. तो बोलू लागला. "खरं सांगू प्रणव, हे दोन्ही खण तूच घे. मीच माझी पुस्तकं तुझ्या खणात ठेवीन. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तुझा खण आवरून ठेवीन. सांग ना, मी माझी पुस्तकं तुझ्या मोठ्या खणात ठेवू? की छोट्या?" असं ताईने म्हणताच मी तिला पटकन उत्तर दिलं नाही, मी भांबावलो.

प्रिय मुलांनो,

अ.आ.

काल मी एकटाच बागेत गेलो होतो. खेळणारी, दंगा मस्ती करणारी, उड्या मारणारी, धडपडणारी, गरगरणारी, झोके घेणारी मुलं मी बाकावर बसून पहात होतो. मी निघणार होतो. तोच,

एक मुलगा माझ्या बाकावर येऊन बसला. तो मुलांकडे एकटक पहात. अस्वस्थपणे पाय हलवत होता. तो खूप बेचैन वाटला मला. 

तो मुलगा. कुठलंसं गाणं गुणगुणू लागला. मी त्याला सहज म्हणालो. "अरे जरा मोठयाने म्हण ना. तुझं गाणं ऐकायला मला आवडेल." तो क्षणभर चपापला. मग हसला. आणि लाजला. त्याने माझ्याकडे न पहाताच एक तान मारली. त्याचा आवाज गोड होता.

त्याचं नाव प्रणव. गप्पा मारताना कळलं की, त्याला टीव्ही. पहायला आवडत नाही. तो रेडिओ ऐकतो. शास्त्रीय संगीत ऐकतो. पुस्तक वाचतो. काही वेळा त्याची आई किंवा स्मिताताई त्याला गोष्टी वाचून दाखवतात. 

मी म्हणालो.  " वाचून? म्हणजे?"

म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे." अहो मी सुद्धा माझ्या गोष्टी त्यांना वाचून दाखवतो काय? प्रणवने असं म्हणताच मला गंमत वाटली.

त्याला चिडवण्यासाठी मी म्हणालो, " काय रे प्रणव, तुझं स्मिताताईशी कधी मांडण होतं का रे?"

प्रणव खळखळून हसला. बसल्या बसल्या झपाझपा पाय हलवत तो म्हणाला. "हो तर! हो आत्ताच मी तिच्याशी भांडून आलोय. चांगलं कडाक्याचं भांडण झालं. पहिल्यांदा मी जिंकीन असं मला वाटलं होत....पण...आता....मीचसंकटात सापडलोय. एक छोटा प्रश्न आणि त्याचं मोठं उत्तर, असा सगळा गडबड घोटाळा आहे. पण.....

" प्रणव तुमचं दोघांचं भांडण, कशावरून झालं? आणि तो छोटा प्रश्न कोणता? मला सगळं नीट सांगशील?

मला वाटतं. एखाद्या वेळेस, मी तुला मदत करू शकेन." मी असं म्हणताच त्याच्या पायांची हालचाल थांबली. तो क्षणभर एकाग्र झाला. मला वाटलं. माझ्या बोलण्याने त्याला धीर आला असावा. मी थोडा त्याच्याजवळ सरकलो.

प्रणव बोलू लागला. 'अभ्यासाच्या वह्या पुस्तकं ठेवण्यासाठी आईने एक लाकडी कपाट आणलं. त्या कपाटाचा एक खण लहान आहे: आणि एक खण मोठा आहे.

मी म्हणालो. मोठा खण मला पाहिजे. ताई म्हणाली. 'गोठा खण तिलाच पाहिजे! झालं! आमच्या भांडणाला सुरुवात झाली.

तरी मी तिला समजावून सांगितलं की, माझी पुस्तकं जाड कागदाची आहेत. आकाराने मोठी; अन् तुझ्या पुस्तकांपेक्षा जाडजूड आहेत. तर तुझी पुस्तकं  झुळझुळीत कागदावर छापलेली अन् आकाराने लहान आहेत. म्हणून गोठा खण मलाच हवा. पण ताई काही केल्या आपला हट्ट सोडेना. तिचे आपलं एकच. मीठा खण मला हवा! मग, मी एक आयडीया केली.

मी ताईला म्हणालो, "तू माझी लाडकी ताई आहेस किनई. म्हणून मोठा खण तुझा. पण... पण... तुझ्या खणात मी माझी पुस्तकं ठेऊ?" 

हे ऐकताच ताईला खूप खूप आनंद झाला. ती गिरगिरत म्हणाली, "अवश्य! अवश्य!! अवश्य!!! प्रणव मेरा दादा दादा, ये हमारा वादा. माझ्या मोठ्या मोठ्या खणात प्रणवची मोठी मोठी पुस्तकं आणि छोट्या छोटया प्रणवच्या खणात मोठ्या मोठ्या ताईची पुस्तक."

प्रणव बोलायचा थांबला.

मी बेचैन झालो. म्हणालो. "अरे. भांडण तर संपलं! तुझ्यापेक्षा ताईनेच अधिक समजूतदारपणा दाखवला, असं दिसतंय... मग तो प्रश्न...."

मला पुढे बोलू न देता प्रणव म्हणाला. "थांबा. मी तुम्हांला अर्धच सांगितलं."

प्रणवचा आवाज गहिवरला होता. त्याने माझ्या नकळत डोळ्यातलं पाणी टिपलं. तो बोलू लागला. "खरं सांगू प्रणव, हे दोन्ही खण तूच घे. मीच माझी पुस्तकं तुझ्या खणात ठेवीन. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तुझा खण आवरून ठेवीन. सांग ना, मी माझी पुस्तकं तुझ्या मोठ्या खणात ठेवू? की छोट्या?" असं ताईने म्हणताच मी तिला पटकन उत्तर दिलं नाही, मी भांबावलो.

मी.... मी... ताईला चकवून मोठा खण घ्यायला पहात होतो; तर ताई माझी अडचण समजून घेत होती. त्यावेळी... त्यावेळी असं वाटलं...की... माझ्यासारखंच माझं प्रेमही आंधळं झालं की काय? सांगा ना!

काय सांगू मी स्मिताताईला?'
'प्रणव अंध आहे. हे पुसटसं माझ्या लक्षात आलं होतं. पण त्याने तसं स्पष्टपणे म्हणताच, मी चमकलो.

मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो. चूक समजते "खरंच, जेव्हा आपल्याला आपली चूक आणि प्रेमाची किंमत समजते. तेव्हा अशा प्रश्नांची उत्तरं जरा अवघडच वाटतात नाही का?"

पण प्रणव, स्वतःला पहाण्यासाठी डोळेच हवे असतात असं नाही, तर त्यासाठी मन मोठं हवं.
तुझ्यासारखं!"

तो हुंदके देऊ लागला. त्याने एवढा वेळ हातात घडी करून ठेवलेली काठी उलगडली. तो निघाला. आठ दिवसांनी तो मला पुन्हा भेटणार आहे. मुलांनो, प्रणवला मदत कराल? त्याच्या प्रश्नाचं उत्तर कळवाल? तुमच्या 'डोळस पत्रांची' मी वाट पहातोय.

कळावे.
घरच्या सर्वांना नमस्कार,

तुमचा 

राजीवदादा

Tags: प्रणव कीनई स्मिताताई प्रेमाचा खाण- बालसाधना राजीव तांबे Pranav Kinee Smitatai Premaacha Khaan- Balsadhana Rajiv Tambe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके