डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधींचा मित्रपरिवार : [भाग 3]

गांधीजींनी इंग्लंडमध्ये शिकत असताना शाकाहार तर कायम ठेवलाच पण त्याचे तपशीलवार चिंतनही केले. शाकाहाराचे महत्त्व पटलेला मित्रांचा मेळावा त्यांच्या भोवती उभा राहिला. शाकाहाराबरोबरच जीवनातील साधेपणाचाही त्यांनी ध्यास घेतला; आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांत पुढे अहिंसेला परमोच्च स्थान प्राप्त करून दिले. त्याची सुरुवात येथपासूनच झाली.
 

मोहनमाया

डॉ. प्राणजीवन मेहता हे ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. तसेच मिडल टेम्पलमधून बरिस्टर होत होते. मोहनदासने त्यांना तार पाठविल्यावर ते तत्परतेने त्यांना भेटायला आले. मोहनदासच्या लंडन येथील वास्तव्यात निरनिराळ्या बाबतीत डॉ. मेहता  हे त्यांचे मार्गदर्शक होते. डॉ. मेहतांमुळे मोहनदासच्या अनेकांशी ओळखी झाल्या. लंडन वेजिटेरियन सोसायटीतील मोहनदासचे साधीदार डॉ. जोशिया  ओल्डफील्ड यांच्याशी परिचय डॉ. मेहतांमुळे च झाला.

मोहनदास मुंबईला परतण्यापूर्वीच ते परतले होते आणि ह्या नूतन बॅरिस्टरने मुंबईत आपल्या नातेवाईकांच्या घरीच रहावे असा त्यांचा आग्रह होता. मोहनदासच्या स्वागतासाठी लक्ष्मीदासबरोबर मुंबईत प्राणजीवनहीं  हजर होते. ते पुतळीबाईंच्या मृत्यूची बातमी घेऊनच. डॉ. मेहतांचे बंधू रेवाशंकर हे जव्हेरी होते. ह्या रेवाशंकरचे जावई रायचंदभाई... ज्यांना गांधीनी टॉलस्टॉय व रस्किन यांच्या बरोबरीने आपल्या मार्गदर्शकांत समाविष्ट केले आहे. डॉ. मेहता आणि रेवाशंकर ह्या दोन भावांनी गांधींच्या कार्याचा अनेक वर्षे पुरस्कार केला.सुरुवातीला गांधींना आपल्या छत्राखाली घेणारे डॉ. प्राणजीवन मेहता पुढे त्यांच्या कार्याने प्रभावित होत गेले. गांधी दक्षिण आफ्रिकेत असताना डॉ. मेहता रंगूनला काम करत होते. 1897 साली  ते दक्षिण आफ्रिकेत्ता जाऊन गांधींना भेटून आले. गांधी हिंदुस्थानात आले असता 1902 मध्ये रंगूनला जाऊन आले. 1907 मध्ये डॉ. मेहता यांनी रंगूनला राष्ट्रीय चळवळीता वाहिलेले पहिले वृत्तपत्र सुरू केले. गांधींच्या 'इंडियन ओपिनियन' या पविकेचे पहिसे प्रकाशक (1903 – 1904) मदनाजित हे या 'युनायटेड वर्मा' पत्राचे संपादक होते. वैयक्तिक मैत्री हळूहळू राष्ट्रीय चळवळीतील सहकाराची सुरुवात होत होती. तीही दक्षिण आफ्रिका से ब्रम्हदेश इतके अंतर काटून. 1908 मध्ये डॉ. मेहतांनी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' च्या 'बर्मा प्रोव्हिन्शियल कमिटी' ची स्थापना केली.

1909 मध्ये गांधी लंडनला गेले, तेव्हा ते आणि डॉ. मेहता हे  दोघेही वेस्टमिन्स्टर पॅलेस हॉटेल मध्ये उतरले होते. तरीही त्यांना अनेक गोष्टींची चर्चा करण्यासाठी रात्री जागवाव्या लागल्या, त्यातून हितगूज करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून गांधीनी एक-दोनदा वाट वाकडी केलेली दिसते. हा प्रवासात त्यांनी डॉ. मेहतांना दक्षिण आफ्रिकेतीत सत्याग्रहाचे स्वरूप समजावून सांगितले दिसते. आणि अहिंसक प्रतिकाराने जीवनातील कोणताही संघर्ष सोडविता येतो. हे त्यांना पटवून दिले. डॉ. मेहतांनी गांधींना त्यांच्या मुलांसाठी म्हणून शिष्यवृत्ती देऊ केली. तोवर गांधी आश्रमाती सर्वांनाच आपली मुले मानत होते. त्यांनी हरिलाल ऐवजी  छगनलाल गांधीला बॅरिस्टर व्हायला  इंग्लंडला पाठविले. 

हा  सारा पुढील इतिहास परंतु गांधीच्या  मित्रपरिवाराशी डॉ.प्राणजीवन मेहता यांचे विशेष स्थान लक्षात घेण्यासाठी तो आठवावा लागला. मोहनदासच्या इंग्लडमधील वास्तवयात  आईला दिलेल्या त्रिसूत्रीची वाचनाचा मोठा प्रभाव  दिसतो. बोटीवरच त्यांना अनेकांनी बजावले होते की जिब्राल्टरनंतर थंडीमूळे मद्यपानाशिवाय आणि मांसाहाराशिवाय त्यांचा निभाव लागणार नाही. परवा तसा त्यांना अनुभव आला नाही. मद्यपानाचा मोह त्यांना फारसा झालेला दिसत नाही. 

इंग्लंडमधील तीन वर्षांत मोहनदास वय 19 ते 22 होते. म्हणजे ते ऐन तारूण्यात होते. त्यांचे नाव चौदाव्या वर्षीच झाले होते. त्यांना स्त्री-सुखाचा भरपुर अनुभव होता. परंतु इंग्लंडमधील स्त्रियांचे मनमोकळे वागणे, विशेषता पुरुषांबरोबर मिळून मिसळून वागणे. त्यांच्या समवेत नाटकाला किंवा हॉटेलात जेवायला जाणे-ह्या गोष्टी  मोहनदासला नवीन होत्या. ह्या तरुण हिंदी डॅण्डीचे लग्न झाले आहे  हे  जोवर माहीत नव्हते तोवर काही मुलीना मोहनविषयी वेगाव्या प्रकारचे आकर्षण वाटण्याची शक्यता होती. यातून दीर्घकालीन संबंध  निर्माण होण्याची भीती निर्माण होताच. मोहदासने आपले लग्न झाल्याचे आणि आपल्याला मुलगा  असल्याचे सांगून शकते. यामुळे उलट त्याचे संबंध अधिक स्वच्छ झाले. दुसऱ्या एका प्रसंगी आपल्याला एकदाच परस्त्रीसंबंधी शारीरिक आकर्षण निर्माण झल्याचा उल्लेख  गांधींनी आपल्या आत्मकथेत  केला आहे. प्रत्यक्ष घटनेनंतर तीन तपानी आत्मकथेत लिहीत  असताना या दोन प्रकारच्या स्नेहबंधांचा उल्लेख करून गांधींनी स्वता:च्या  मनातील सर्वसामान्य मानवी प्रेरणांची कबुली  दिली आहे. श्रद्धा  आणि वचनबद्धता ह्यांच्या  जोरावर ते त्या मोहांतून कसे तरले, हा त्यांच्या प्रयोगांचा विषय आहे.

राहता राहिला वचनाचा तिसरा आणि रोज सतावणारा भाग- आहार. मोहनदासने शेख मेहताबच्या संगतीत मांसाहार अनुभवला होता. त्याचे त्यांना थोडेफार आकर्षणही होते. त्यांच्या भोवतालची बहुतेक मंडळी ही मांसाहारीच होती आणि इंग्लंडच्या हवेत मांसाहार निषिद्ध नाही, असे समजावणारी माणसे ही त्यांना भेटत होती. तरीही मोहनदासचा मनोनिग्रह कायम होता, मांसाहार टाळण्यासाठी त्यांनी दोन मार्ग शोधून काढले. एक, स्वतः स्वयंपाक करण्याचा आणि दुसरा उपाय शाकाहारी किंवा अन्नाहारी भोजनगृहाचा शोध घेण्याचा. 

ह्या शोधापायी मोहनदास रोज दहाबारा मैल चालत  असे. अखेर फॅरिंग्डन स्ट्रीटमध्ये त्यांना सेंट्रल रेस्तोराँ' ह्या व्हेजिटेरियन हॉटेलची पाटी दिसली. ती पाहताच त्यांना परमानंद झाला. कित्येक दिवसांनी त्यांना मनसोक्त जेवायला मिळाले. आत शिरताना त्यांना काचेच्या कपाटात 'ए की फॉर व्हेजिटेरियनिझम' हे हेन्री साल्ट यांचे पुस्तक दिसले. ते त्यांनी एक शिलिंग देऊन विकत घेतले. जेवटा  जेवता ते त्यांनी वाचून काढले आणि तेव्हापासून त्यांची विचारसरणीच बदलून गेली. त्या दिवसापर्यंत ते मारून मुटकून शाकाहारी होते. कधीतरी या प्रांतातून मोकळे होऊन मांसाहार तर करायचाच पण इतरांनाही या कंपूत ओढून घ्यायचे अशी उमेद ने बाळगून होते. सॅाल्टच्या  यांचे पुस्तका वाचल्यावर त्यांनो बुद्धपूरस्स्पर शाकाहाराचा स्वीकार केला आणि आयुष्यभर ते शाकाहाराचे मोठे समर्थक शाते. हॉवर्ड विल्यम्स आणि अ‍ॅना किंग्जफौर्ड  यांची पुस्तकेही त्यांनी वाचली. ग्रीक तत्त्ववेता  पायथॅागोरास आणि येशु हेही हेही अन्नाहारीच होते. हे त्यांच्या लक्षात आले, डॉ. अ‍ॅलिन्सन  यांच्या आरोग्यविषयक लेखात निव्वळ आहारात फेरफार करून  त्यांनी रोग्यांवर उपचार केल्याचे वर्णन आणि समर्थन होते. ह्या  सर्व पुस्तकांचा गांधीवर परिणाम झाला, त्याहून महत्वाची गोष्ट ह्या  नवीन छंदापायी त्यांचा  मित्रपरिवार बदलत गेला.  व्हेजेटेरियन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी फार वेगळ्या प्रकारये मित्र शोधून काढले. 

इंग्लंडमधील शाकाहारी चळवळ ही केवळ  आहाराच्या बाबतीत आग्रही किंवा हट्टी चक्रमांची नव्हती. ह्या चळवळीचा एक प्रवर्तक   एडवर्ड कार्पेटर यांच्या 'सिव्हिलिझेशन, इटस कॉज अॅण्ड क्चूअर' हा निबंधांचा गांधीवर बराच परिणाम झाला,थोरो, ईमसन आणि वॅाल्ट व्हिटमन ह्या अमेरिकन विचारवंतांची विचारसरणी  गांधीपर्यंत पोचली ती सुरुवातीला तरी कार्पेटर यांच्या लेखांनातून. कार्पेटर  यांनी विज्ञानाच्या मर्यादा दाखवून दिल्या आणि निसर्गाशी जवळीक सांगितली. ह्या " विचारांचा गांधींच्या विचारांवर बराच प्रभाव दिसतो. 

कार्पेटर 1914 मध्ये सत्तर वर्षाचे  झाले या त्यांना अनेकांचे शुभसंदेश आले, त्यात रवींद्रनाथ टागोरांचा  संदेशही होता. कार्पेटर 1929  मध्ये मरण पावले आणि ही बातमी गांधीना हेन्री सॉल्ट यांनी सांगितली. हि

हेन्री सॅाल्ट हे कार्पेटरपेक्षा वयाने लहान होते. त्यांचा जन्म हिंदूस्थानात नैनितालला झाला. नवऱ्यापासून विभक्त झालेल्या  त्याच्या आईने हेन्रीला इंग्लंडमध्ये वाढविले, ईटन आणि केंब्रीज येथे  शिक्षण झाल्यावर ते ईटनला शिकवू  लागले. त्यांना नोकरी सोडावी लागली का तर ते शाकाहाराचा प्रचार करू लागले म्हणून.  त्यांनी टिलफ्ड येथे एका छोट्याशा कांटेजमध्ये संसार थाटला. एडवर्ड मेटलंड आणि हॉवार्ड  विल्यम्स  यांच्यासमवेत त्यांनी 'ह्युमॅनिटेरियन लीग' ह्या संस्थेची  स्थापना केली. शिकार, प्राण्यांची शास्त्रीय प्रयोगासाठी चिरफाड, दुकाने –फॅक्टरी- तुरुंग येथील भयाण परिस्थिती आणि इतर सामाजिक दोषाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. बर्नाड शॅा, सिडने ओलिव्हिए, रॅम्से मॅकडॉनाल्ड हे त्याचे मित्र होते आणि अॅनी बेंझसारख्या त्यांना पाठिंबा होता. गांधींच्या आयुष्याला वेगळेच वळण हेन्री सॅाल्ट यांच्यामुळे मिळाले. लिओं  टॅालस्टॉय यांनीही त्यांना कौतुकाचे पत्र पाठविले होते.  साँल्ट आपल्या शाकाहारी आणि मानवतावादी चळवळीपासून ढळले नाहीत.

फॅरिंग्डन स्ट्रीटवरील रेस्टॉरंटमधील दुपारचा चहा एक प्रमुख आकर्षण होते. शिवाय हेन्री सॉल्ट तिथे  अनेक विख्यात व्यक्तीना  एकत्र आणत असे. एका दिवस सिल्क हॅट आणि  आणि काळा कोट परिधान केलेला एक हिंदी माणूस आत आला. डान्सचे धडे कुठे घेता येईल हे तो विचारत होता..'माझं नाम गांधी, अर्थातच  तुम्ही ते नाव कधी एकलं नसणार' असे सांगत  तो आला होता, आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे सॅाल्ट एक भावी सभासद  म्हणून पाहत असे.

काही काळानंतर गांधी हे खरोखर व्हेजिटेरियन सोसायटीचे एका महत्वाचे  सभासद बनले. 1891 साली वेटनॉर येथे कॉन्फरन्स ऑफ व्हेजिटेरियन फेडरल युनियन भरली  होती.  त्या सभेला गांधीचे बोटीवरील मित्र मुझुमदार होते तसेच हेन्री सॅाल्ट यांनी 'रिटर्न टू नेचर'ह्या विषयवर निबंध वाचला तर गांधीनी' दी फूड्स ऑफ इंडिया' विषय सोडवून सांगितला. गांधी आणि सॅाल्ट यांचा सबंध  त्यानंतर चाळीसहून अधिक वर्षे होता.  सॅाल्टबरोबरीची  माणसे आपापल्या क्षेत्रात मोठी होत गेले. गांधी सर्वार्थाने मोठे होत गेली.  जग त्यांना महात्मा म्हणून ओळखू  लागले तरी सॅाल्टच्या द्र्ष्टीने  गांधीचे महत्व ते शाकाहाराचे समर्थक हेच होते. 1931 मध्ये राउंड टेबल  कॉन्फारन्स साठी  गांधी इंग्लंडसा आले तेव्हा लंडनमधील शाकाहारी मंडळींच्या सभेत त्यांनी भाषण केले. ह्या  सभेचे अध्यक्षस्थान हेन्री सॅाल्ट यांनी स्वीकारले होते. एकेकाळच्या आपल्या चेल्याला  इतके प्रचंड महत्व आलेले पाहून सॉल्ट यांना खूप समाधान बारने असणार.

हेन्री सॉल्ट आणि एडवर्ड कार्पेटर  हे साधी राहणी आणि जमिनीशी नाते. ह्या आपल्या विचारानी बांधले होते. इंग्लिश थोरो  म्हणून ओळखले जाणारे एडवर्ड कार्पेटर यांनी  एक सिद्धांत मांडला होता- श्रीमंत होण्याचे दोन प्रकार आहेत. पुरेशी संपत्ती  मिळविणे किंवा स्वतःच्या गरजा कमी करणे. आपल्याला कोणत्या गोष्टी परवडत नाहीत ह्या निकषांवर आपण श्रीमंतीचे  मोजमाप करतो. कार्पेटर यांनी सांगितलेला साधेपणाचा मंत्र निरनिरळ्या स्वरूपात पार्नेलवादी आयरिश खासदार निगर, विख्यात निरीश्वरवादी चार्लस ब्रॅडलॅा. अमेरिकेतून येऊन  इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले डॉ. निकोन्स आणि एक- दोन हिंदी गृहस्थांनीही स्वीकारला होता. गांधींच्या सुरुवातीच्या खाद्यप्रयोगात काटकसर ही एक महत्त्वाची प्रेरणा होतीच. साधेपणामुळे आयुष्य नीरस न होता उलट अधिक आनंदी होते; आणि आत्मिक समाधान मिळते हा अनुभव गांधी घेत होते.

त्यांचे समाजवादी मित्र सिडने थेब, बर्नार्ड शॉ आणि हिंग्मन हे औद्योगिकीकरणावर आधारित समाजव्ववस्थेचे समर्थक होते. सॉल्ट-गांधी पुनर्भेट 1931 मध्ये होईतो गांधींनी साधी राहणी, खेड्यांचे पुनरुज्जीवन, चरखा आणि कुटिरोधोगांना आर्थिक जीवनात केंद्रस्थान आणि शाकाहारच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अहिंसेला परमोच्च स्थान प्राप्त करून दिले होते.

Tags: एडवर्ड कार्पेटर ए.के. फॉर व्हेजिटेरियन हेन्री सॅाल्ट इंडियन ओपिनियन डॉ. मेहता गांधी आणि मित्र परिवार भाग-3 रामदास भटकळ Civilization its cause and cure edward karpetar A.K.For. Vegetarianism Henry Salt Indiyan Opinion Dr Mehta Gandhi Friend Circul Part- 3 Ramdas Bhatkal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामदास भटकळ

पॉप्युलर प्रकाशन या पुस्तक प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके