डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वर्गी अशा भारतास जागृत करि नाथा

...

चित्त जिथे भीतिशून्य उंच जिथे माथा
ज्ञान जिथे मुक्त तिथे जागृत करि नाथा

क्षुद्र घरांच्या भिंती दिवस-रात्र जेथे
निज अंगणि खंडित नच करिती विश्व तेथे

सत्याच्या गाभ्यातून शब्द जिथे जन्मे
पूर्णाप्रत पोचतात अविश्रांत कर्म

जेथ तुच्छ कर्मकांड बनुनि वाळुराशी 
वैचारिक स्रोतपंथ मुळि न कधी ग्राशी

पुरुषार्थ न शतखंडित होय कधी जेथे
तूच स्फूर्ति कर्माची, आनंदही तेथे

निजहस्ते करुनि पित्या निर्दय आघाता
स्वर्गि अशा भारतास जागृत करि नाथा

मूळ कविता - रवींद्रनाथ टागोर 
अनुवाद - मंगेश पाडगांवकर

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रवींद्रनाथ टागोर

(मे 7, इ.स. 1861 - ऑगस्ट 7, इ.स. 1941) ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार, भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके