डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गोवा अस्वस्थ होत चालला आहे...

गोव्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की तिथे कुठल्या ही धर्मावर आधारित व्यक्तिगत कायदा नाही. तिथे सर्वांसाठी पोर्तुगीज कायदा लागू आहे. शाहबानो प्रकरणाच्या वेळी तिथे जमाते इस्लामीचे तेथील नेते अशरफ आगा यांनी मुस्लिम व्यक्तिगत कायदा लागू करण्याची मागणी केली होती. तेव्हा गोव्यातील रशिदा मुजावर या तरुणीने गोव्यातील मुस्लिम महिलांना एकत्रित करून त्याविरोधात आवाजबुलंद केला होता. कारण पोर्तुगीज कायद्यामुळे तिथे जुबानी तलाक व बहुपत्नीत्व नाही. शिवाय वारसा हक्क, संपत्तीत वाटा आहे. मी 1993मध्ये गोव्यातील मुस्लिम महिलांच्या मुलाखती घेतल्या होत्या, तेव्हा अनेक महिलांनी मला सांगितले होते की त्यांच्या मुलींची लग्ने त्यांना गोव्याबाहेर करावीशी वाटत नाहीत. कारण बाहेर जुबानी तलाक, पोटगी नसणे, बहुपत्नीत्वाचा पुरुषाचा अधिकार इत्यादी गोष्टींची त्यांना भीती वाटते. शिवाम गोव्यात मोकळेपणा आहे, पडदा नाही हेदेखील त्यांना चांगले वाटते. हुंड्याची पद्धत वाढत चालली आहे हे मात्र वाईट आहे असे त्यांचे मत होते.

मागच्या महिन्यात मी गोव्याला गेले होते. निमित्त होते गोव्यातील समाजसेवा संघाच्या अमृतमहोत्सवाचे. गोव्यात समाजसेवा संघ ही एक ऐतिहासिक संस्था आहे. स्त्री-शिक्षण आणि सामाजिक प्रबोधन हे उद्दिष्ट मनात ठेवून आणि स्त्री-शिक्षणाला चालना देणाऱ्या धोंडो केशव कर्वे यांचा आदर्श समोर ठेवून समाजसेवा संघाची स्थापना 1933 मध्ये करण्यात आली. सोबतच महिला विद्यालयाची स्थापना करण्यात आली. संस्थापक होते गोव्यातील काही समाजसेवक- केशव बाब, अनंत नामक, कृष्णनारायण नामक, दामोदर अच्युत कारे, गोविंद रामनाथ इत्यादी...

पोर्तुगीजांच्या वसाहतीच्या काळात हे फार सोपं नसणार, कारण तेव्हाच्या गोतंमकीय सरकारचा उद्देश गोव्याची भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ तोडण्याचाच होता आणि समाजसेवा संघाशी संबंधित लोक गोवामुक्ती आंदोलनाशी अर्थातच जोडलेले होते.

हे सर्व सांगायचा उद्देश हा की, समाजसेवा संघ ही संस्था अजूनही पाय भक्कम रोवून उभी आहे आणि स्वातंत्र्य चळवळीतल्या विचारांचा प्रसार करण्याचे काम करीत आहे. समाजसेवा संघाचे विद्यमान अध्यक्ष दत्ता नामक हे जाणीवपूर्वक पुरोगामी चळवळीशी नातं जोडून आहेत.

गोवा आता बदलतो आहे. तिथल्या राजकीय क्षेत्रात भाजपने शिरकाव केलेला आहे. कर्नाटक आणि अन्य प्रांतातून रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्यांमध्ये मुसलमानांचे प्रमाण मोठे आहे. गोव्यातील हिंदु-मुस्लिम शांतताप्रिय सुरोगाद आता मात्र गोवा अस्वस्थ होत असल्याची चाहूल लागते आहे.

गोव्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे की तिथे कुठल्या ही धर्मावर आधारित व्यक्तिगत कायदा नाही. तिथे सर्वांसाठी पोर्तुगीज कायदा लागू आहे. शाहबानो प्रकरणाच्या वेळी तिथे जमाते इस्लामीचे तेथील नेते अशरफ आगा यांनी मुस्लिम व्यक्तिगत कायदा लागू करण्याची मागणी केली होती. तेव्हा गोव्यातील रशिदा मुजावर या तरुणीने गोव्यातील मुस्लिम महिलांना एकत्रित करून त्याविरोधात आवाजबुलंद केला होता. कारण पोर्तुगीज कायद्यामुळे तिथे जुबानी तलाक व बहुपत्नीत्व नाही. शिवाय वारसा हक्क, संपत्तीत वाटा आहे. मी 1993मध्ये गोव्यातील मुस्लिम महिलांच्या मुलाखती घेतल्या होत्या, तेव्हा अनेक महिलांनी मला सांगितले होते की त्यांच्या मुलींची लग्ने त्यांना गोव्याबाहेर करावीशी वाटत नाहीत. कारण बाहेर जुबानी तलाक, पोटगी नसणे, बहुपत्नीत्वाचा पुरुषाचा अधिकार इत्यादी गोष्टींची त्यांना भीती वाटते. शिवाम गोव्यात मोकळेपणा आहे, पडदा नाही हेदेखील त्यांना चांगले वाटते. हुंड्याची पद्धत वाढत चालली आहे हे मात्र वाईट आहे असे त्यांचे मत होते.

गोव्यातील मुस्लिम तरुणांच्या ही मुलाखती त्या वेळेला मी घेतल्या होत्या. त्यांचे म्हणणे होते- शिक्षण महत्त्वाचे आहे, कारण आता गोव्यातील मुसलमानांना कुठलाही पारंपरिक व्यवसाय उरला नाही. पोर्तुगीजांच्या काळात त्यांना पोलिसात भरती करून घेतलं जाई, आज मात्र ते बेरोजगार आहेत. त्यामुळे गल्फमध्ये ते नोकरीला जातात. शिवाय, बाबरी मशीद ज्या पद्धतीने पाडण्यात आली त्यानंतर त्यांना त्यांचा मुस्लिम म्हणून अस्तित्व जाणवायला सुरुवात झाली.

या सर्व गोष्टींचा परिणाम गोव्यातील मुस्लिम समाजावर होतो आहे. शिवाय अन्य प्रांतातील येणारे  मुस्लिम, तबलीगची चळवळ या सर्व गोष्टी आणि सोबत गोव्यात भाजपाचा प्रवेश. गोव्यात हिंदु-मुस्लिम आणि हिंदु-ख्रिश्चन, मुस्लिम-ख्रिश्चन ही दरीदेखील वाढते आहे. या सर्व गोष्टींमुळे गोवा अस्वस्थ होत चालल्याचे जाणवते. दुसरीकडे विकासाच्या नावाने चाललेली गोव्याची लांडगेतोड, जागतिकीकरणात पर्यटन व्यवसायाचे बदलले स्वरूप; परकीय हॉटेल कंपन्यांचे अतिक्रमण आणि चळवळी मात्र क्षीण झालेल्या आहेत.

संदेश प्रभुदेसाय हा तरुण पत्रकार मित्र, डाव्या चळवळीतून आलेला. 1993 मध्ये ‘टाइम्स’ फेलोशिपच्या माझ्या अभ्यासात गोव्यात माझ्यासोबत हिंडून संदेशने मदत केली होती. आता तो प्रूडंस नावाच्या खाजगी वाहिनीत काम करतो, पण वैचारिक गाभा कायम ठेवून. आज तो अस्वस्थ दिसतो. दत्ता नायक अस्वस्थ दिसतात. दत्ता नायकांनी ‘सांप्रदायिक सद्‌भावना आणि भारतीय धर्म  निरपेक्षता’ या विषयावरच माझं व्याख्यान ठेवलं होतं. आशेची गोष्ट ही आहे की दत्ता नायकांनी आपल्या विचारांच्याभोवती माणसं चांगली संघटित केली आहेत. त्यामुळे ते काही प्रश्न विकोपाला जायच्या आधीच हस्तक्षेप करतात.

गोव्याहून परतताना मनात अस्वस्थता होती, पण भारतीय राज्यघटना, धर्म  निरपेक्षता, सांप्रदायिक सद्‌भावना, गोव्याचा मूळस्वभाव या सर्वांवर विश्वास असलेले दत्ता नायक आणि संदेश प्रभूदेसाय तिथे आहेत आणि आपण एकमेकांना हाक घालू शकतोही आश्वस्तताही होती.

गोव्यात समता आंदोलनाच्या स्थापनेत दत्ता नायक अग्रेसर होते. न्यायमूर्ती म.गो.रानडे यांच्या सामाजिक परिषदेचे तिसरे अधिवेशन त्यांनी गोव्यात घेतले. धर्म  निरपेक्षता, समता, सामाजिक न्याय यासाठी त्यांनी केलेले काम फार मोठे आहे. महाराष्ट्रातील चळवळींशी त्यांचा निरंतर संबंध आहे. ते स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत, पण चळवळीसाठी त्यांनी जे योगदान दिले आहे ते वरवरचे नसून त्यासाठी बांदिलकीपूर्वक काम केले आहे. त्याबद्दल त्यांना सलामच करायला हवा.

Tags: संदेश प्रभुदेसाय दत्ता नायक समता आंदोलन गोवा रझिया पटेल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रझिया पटेल
raziap@gmail.com

मागील चाळीस वर्षे रझिया पटेल सामाजिक कार्यात असून, मुस्लिम समाजाचे प्रश्न, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समता या तीन क्षेत्रांत त्या विशेष सक्रिय आहेत.

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके