डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

छात्रयुवा संघर्षवाहिनीतील माझी वाटचाल

देशभरातून अभिनंदन आणि समर्थन करणारी जी पत्रे आली त्यात जास्तीत जास्त पत्रे मुस्लिम तरुण-तरुणींची होती. अगदी काश्मीरच्या युवकांची पत्रेही त्यात होती, मात्र सिनेमाबंदी आंदोलनानंतर दशहतही खूप वाढली. मी कोणाची मुलगी वगैरेंचा शोध पंचकमिटीच्या लोकांनी घ्यायचा प्रयत्न केला. शिवाय संघर्षवाहिनीच्या कार्यालयावर रात्रीच्या वेळी दगडफेक केली गेली. प्रचंड दहशत आणि धमक्या यांमुळे सर्वसामान्य मुस्लिम महिलांवरही दडपण आले. मला सरकारने पोलिस संरक्षण दिले. त्यातून मी लवकरच सुटका करून घेतली. मात्र मुस्लिम महिलांमध्ये काम करण्याबाबत माझ्या मनातील विचारचक्र त्यानंतर वेगाने फिरू लागले...

जेव्हा असं लक्षात आलं की ही एक अशी व्यवस्था आहे जी तुम्हाला संपूर्णपणे वाकवू पाहते, तेव्हा खूप असहाय्य वाटलं, अगदी अगतिक झाल्यासारखं. तरीही शेवटी हा प्रश्न मनात उसळून येतच होता की का म्हणून दडपणात जगायचं? का म्हणून अन्याय सहन करायचा? या विरोधात लढलं पाहिजे.

आणि त्यातून मला सर्वप्रथम मार्ग दिसला तो साधनाच्या व्यासपीठाचा ज्याचे संपादक यदुनाथजी होते. मी साधनात लिहिलं, त्यानंतर यदुनाथजींनी माझ्या वडिलांनाही लिहिलं…

मुलींच्याबद्दल एकूणच स्त्रियांच्या बद्दल, कुटुंबाच्या, समाजाच्या काही धारणा असतात, (मुलींनी कसं रहावं, वागावं, बोलावं, मर्यादेत असावं वगैरे) पण या परंपरा आणि धारणांना माझ्या 'काने आणि नंतर कृतीने धक्के दिले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आमच्याच समाजातील खलील देशमुख हा तरुण चळवळीशी संबंधित होता, राष्ट्र सेवादलाचं काम करीत होता. त्याने एक मराठी वृत्तपत्र काढलं, त्याचे अंक आमच्या समाजातील बहुतेकांकडे पोचले. तो पेपर आमच्याकडे आला तेव्हा मी 'मुस्लिम समाजात प्रबोधनासाठी हे आवश्यक आहे' असं काहीसं पत्र लिहून त्याचं अभिनंदन केलं आणि ते पत्र त्या वृत्तपत्रात छापून आलं. त्याबाबतही 'कोणी सांगितला होता हा शहाणपणा?' अशी प्रतिक्रिया घरातून आली. खालील देशमुख त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या काही प्रश्नांवर उपोषण केलं आणि त्याला पाठिंबा म्हणून येण्याचं पत्र मलाही पाठवले. पाचोरा जळगाव पासून पाऊण तासाच्या अंतरावरील त्या कार्यक्रमाला मी गेले. तिथे छात्रयुवा संघर्षवाहिनीचे शेखर सोनाळकर, शुभा शमीम आलेले होते. आदिवासी भागात काम करणाऱ्या संघर्ष वाहिनीच्या भीमराव म्हस्के यांचा लेख साधनातील 'समतासंगर या सदरात मी वाचला होता. त्यामुळे संघर्षवाहिनी हे नाव आणि त्यांचे काम हे ओळखीचं होतं. पण शेखर आणि शुभा शमीमसोबत मी संघर्षवाहिनीच्या कार्यालयात गेले (ते जळगाव इथे शेखर सोनाळकरांच्या घरात होतं). जळगाव ते पाचोरा ते संघर्ष वाहिनीचं कार्यालय हा अवघा अर्धा दिवसाचा 'माझा प्रवास भयंकर कठीण होता. कारण एक उलथापालथ घडवणारी गोष्ट मी करीत होते, ज्याची माझे कुटुंब कल्पना करू शकत नव्हते. मला स्वत:लाही हा टप्पा मानसिक संघर्षाचाच होता. पण संघर्षवाहिनीच्या साथींना भेटल्यावर वाटले, आपण अगदीच एकटे नाही आहोत. हे आपल्यासारखेच, आपल्याच वयाचे लोक आहेत आणि आपल्याला एकेकट्याने लढता नाही येणार. हे लढताहेत तेही कुठल्या ना कुठल्या अन्यायाच्या विरोधातच. मग मी त्या लढ्याचा भाग झाले पाहिजे, हा माझा निश्चय पक्का झाला. त्यानंतर सर्व प्रकारच्या दडपणातून मी निसटले आणि छात्रयुवा संघर्षवाहिनीची सैनिक बनले. आज सहजपणे मी हे लिहिते आहे, पण यासाठी मी आणि माझ्या संघर्षवाहिनीच्या साथींनी कितीतरी अधिक धोका बेधडकपणे पेलला होता. त्या काळात जळगाव जिल्हा संघर्षवाहिनीचे जे साथी होते त्यात रमेश बोरोले, राजेंद्र मानव, कुंजबिहारी, दिलीप सुरवाडे, नितीन तळेले, प्रकाश, नरेंद्र काबरा, नंतर जोडले गेलेले शैला सावंत, सुधाकर बडगुजर, हेमराज बारी अशी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांमधून आलेली तरुण मुलं तर होतीच, पण वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या मुलीदेखील होत्या. वासंती दिघे, रत्ना रोकडे, अरुणा तिवारी आणि त्यांच्या सोबत महाविद्यालयात शिकणाऱ्या कितीतरी मुली.

छात्रयुवा संघर्षवाहिनीच्या जळगाव येथील प्रांतीय कार्यालयात मी दाखल : झाले. नंतर मालेगाव येथील युवक शिबिरात गेले. त्यानंतर माझी रवानगी यदुनाथजी की पुण्याला झाली. तिथे मी वर्षभर राहिले. यदुनाथजींनी माझी जबाबदारी घ्यायचा निर्णय घेतला होता, पण खऱ्या अर्थाने घरात माई (जान्हवी थत्ते) यांनी माझी जबाबदारी घेतली. परक्या घरातल्या, शिवाय परधर्मीय तरुण मुलीची जबाबदारी घेणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. पण माझ्या कुटुंबात माझ्या वडिलांचा आणि यदुनाथजींच्या कुटुंबाचा परस्परांवरील विश्वास ही अतिशय मौलिक गोष्ट यात होती. सामाजिक परिवर्तन आणि

मानवी मूल्ये या विचारसरणीतून निर्माण झालेला हा विश्वास होता. यदुनाथजी सोबत मी साधनाच्या कार्यालयात जायचे. मी काही मालिकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये लिहायला लागले ती यदुनाथजींच्या मार्गदर्शनाखाली. साधना साप्ताहिकात तेव्हा जयदेव डोळे आणि सुनीती कुलकर्णी काम करीत होते. जयदेव तेव्हा कुठेतरी भाड्याच्या घरात राहात होता. पण सुनीती बऱ्याचदा मला जेवायला, रहायला तिच्या घरी न्यायची. साधनाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांतही (खेडेकर, आपटे, तरटे, पाटील, देवळेकर इत्यादी) साधनाची संस्कृती व विचार दिसायचा. त्यानंतरचं एक वर्ष मी सय्यदभाईंच्याकडे राहिले. तेव्हा ते मुंबई पुणे रस्त्यावर भारत पेन्सिल कारखान्याच्या आवारात रहात होते आणि त्या कारखान्यात व्यवस्थापक होते. त्यांच्या कुटुंबाचा मी एक भाग बनले. सय्यदभाई तर चळवळीत होते, पण मला विशेष उल्लेख करायचा आहे तो सय्यदभाईंच्या पत्नी अख्तर सय्यद यांचा. त्या माझ्या चाचीच. त्यांनी मला मुलीप्रमाणे सांभाळले. एक प्रकारे घरात राहूनही चाची चळवळीचे काम करीत होत्या. चाचींचा ठसा माझ्या मनावर कायमचा उमटला आहे तो यासाठी.

माझ्या आयुष्याचं विधायक वळण पुणे शहरातून सुरू झालं. इथेच एसेम, नानासाहेब, प्रधानसर, भाई वैद्य, बाबा आढाव, निळू फुले, ताहेरभाई पुनावाला, अनुताई लिमये, कमल पाध्ये, शोभनाताई इत्यादींना भेटले. आणखी एका नावाचा मला उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे सुलभाताई ब्रह्मे. शंकर ब्रह्मे यांचा आणि माझ्या वडिलांचा चांगला परिचय. त्यामुळे सुलभाताई नेहमी मला माझ्या वडिलांबद्दल सांगत. माझ्या वडिलांचे निधन होईपर्यंत विचारत असत. या सर्वांच्या सहवासातून माझ्या व्यक्तिमत्त्वाची घडण होत गेलेली आहे.

या काळात देशभरात जी युवक चळवळ उभी राहिली त्याची सुरुवात गुजरात आणि बिहारमध्ये झाली होती. या आंदोलनाची सुरवात काही तात्कालिक मुद्यांवरून झाली
असे दिसत असले तरी त्याला एक व्यापक पार्श्वभूमी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भूमिहीन, दलित, कामगारवर्ग यांच्यात होत असलेली जागृती, जमिनीच्या हक्कासाठी उभे राहणारे लढे हे एकीकडे दिसत होते, पण दुसरीकडे तेलंगणा सारख्या चळवळींना हिंसकतेमुळे पडणाऱ्या मर्यादाही उघड होत होत्या. तिसरीकडे सत्तेद्वारा परिवर्तनाचा प्रयत्न अयशस्वी होतो आहे हेही स्पष्ट दिसत होते. अशा परिस्थितीत युवकांमधला असंतोष उफाळून आला तो गुजरात आणि बिहारमध्ये महाविद्यालयाच्या उपहारगृहांशी संबंधित आणि शिक्षण व्यवस्थेतल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून. या युवकांनी जयप्रकाशजींना आपलं नेतृत्व स्वीकारायची विनंती केली.
सत्तेपासून दूर असलेले आणि अभ्रष्ट असलेले जे.पी. नेतृत्वासाठी युवकांना हवे होते. मात्र जयप्रकाशजींनी या युवकांना अट घातली ती अशी की, मी तुमच्या चार वा सहा महिन्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारणार नाही, एका दीर्घकालीन लढ्यासाठी तुम्ही तयारी दाखवली पाहिजे.
सर्वहारांची ही लढाई असेल. या पार्श्वभूमीवर छात्रयुवा संघर्षवाहिनीची स्थापना झाली होती.

'निर्दलीय शांतीमय संपूर्ण क्रांती के लिए छात्रयुवा संघर्षवाहिनी' हे संघर्षवाहिनीचं घोषवाक्य होतं. युवक हा परिवर्तनाचा वाहक असेल, पण कोणता युवक, जो निर्दलीय असेल. त्यांचं म्हणणं होतं, युवक राजकीय काम करतील, पण ते राजकीय पक्ष नसतील. 'संपूर्ण क्रांती सत्ता से नही हो सकती- कानून मदद करेगा, राजशक्ती मदद करेगी, लेकिन लोगोंको बदलना है, यह काम युवक करेंगे।' 

संपूर्ण क्रांतीचा विचार हा सम्यक पद्धतीने विकसित झाला होता. त्यातली निर्दलीयता सर्वोदयी विचारधारेतून, वर्गसंघर्षाचा विचार कम्युनिझममधून, जातीअंताचा विचार लोहियांच्या विचारधारेतून आणि सत्याग्रह गांधी विचारातून आला होता. सर्वाचा समन्वय संपूर्ण क्रांतीच्या विचारात होता.

संघर्षवाहिनीची पूर्णवेळ कार्यकर्ती झाल्यावर मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर बरीच राहिले. या संघटनेचं जे स्वरुप जे होतं त्यात सामूहिक नेतृत्व, संघर्षातून विचार आणि भूमिका विकसित करत नेणं असं होतं, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर भूमिका घेण्यासाठी संबंधित प्रश्नांवर झालेल्या चर्चा, संघटनेचं लोकतांत्रिक स्वरूप, घेतलेल्या भूमिका आणि कार्यक्रमांचं परखड मूल्यमापन आणि जयप्रकाशजींशीही वादविवादाची तयारी यातून कार्यकर्त्यांची घडण झाली. स्त्री-पुरुष समतेच्या मुद्यावर सखोल आणि वादळी चर्चा संघर्षवाहिनीच्या पुरुष साथींबरोबर झाल्या. संघर्षवाहिनीच्या वेगवेगळ्या आंदोलनात, संघर्ष करताना महिला साथी पुढे होत्या. अगदी महाराष्ट्रातील नामांतर आंदोलनापासून ते बिहारमधील बोधगया येथील मठाच्या महंताच्या विरोधात आणि आदिवासींच्या जमिनीच्या हक्कासाठीच्या लढ्यापर्यंत. बिहार, उत्तर प्रदेश मधील महिला या आंदोलनातून रस्त्यावर उतरणं ही किती महत्त्वाची गोष्ट होती, हे आजही त्या प्रांतांमधील स्त्रियांची स्थिती बघता
आपल्या लक्षात येईल. स्त्री-पुरुष समतेचा हा विचार लढ्यातून सिद्ध झाला.

आदिवासींना जमिनीचा हक्क मिळाला तेव्हा सातबाराच्या उताऱ्यावर, लढ्यात पुरुषांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरलेल्या आणि पोलिसांचा लाठीमार सोसलेल्या स्त्रियांचे नाव लागले पाहिजे हा वाहिनीच्या महिला साथींनी आग्रह धरला आणि बिहार उच्च न्यायालयाने त्याला मान्यता दिली. ही ऐतिहासिक घटना होती. शिवाय आडनाव टाकून जातीव्यवस्था मोडायची व आईचं नाव लावून पितृसत्ताक व्यवस्था तोडायची हेदेखील वाहिनीत घडले. याशिवाय खुली अर्थव्यवस्था, हिंदु-मुस्लिम संबंधाचे स्वरूप, जातीव्यवस्थागत विषमतेचा प्रश्न अशासारख्या मुद्यांवर चर्चा व्हायच्या. जयप्रकाशजींनी मांडलेला विचार यात केंद्रस्थानी असायचा. उदा. 'संपूर्ण क्रांती भारत में किस रूपमे आएगी? भूमी स्वामित्व, सत्तासंबंध इनमे परिवर्तन के रूप में. सामाजिक क्रांति में जाति व्यवस्था बदलेगी- पिछडी जातीयों का संघटित

होना जरूरी है, भारत जैसे पिछडे देशके पिछडे अर्थक्षेत्रमें बहुत कुछ बदलने की जरूरत है. साथही व्यक्ती, समाज, शिक्षा, उद्योग, राजनीतिक व्यवस्था में भी परिवर्तन की जरूरत है.' या मूलभूत मुद्यांवरील चर्चा आणि भूमिका. हिंदु-मुस्लिम संबंधाच्या बाबतीत बोलायचं तर जयप्रकाशजींची आवडती कविता होती मुहंमद इक्बाल यांची...

सच कह दु ऐ बरहमन, गर तू बुरा न माने तेरे सनम कदों के बूत हो गए पुराने 

आजही विदर्भात मोहन हिराबाई हिरालाल, सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख, मेटिखेडा येथे पूर्णपणे महिला पंचायत निवडून आणण्याचा प्रयोग (महिला आरक्षणाच्या आधी) घडवून आणणारी माया वानखेडे, समुचित तंत्रज्ञानाचा ग्रामीण विकासासाठी प्रयोग करणारा रमेश बोरोले, सुधाकर बडगुजर, कुंजबिहारी, आरोग्याच्या प्रश्नावर काम करणारे मनीषा, रमेश, हिंदु-मुस्लिम एकात्मतेच्या मुद्यावर मुंबईत कार्यरत असणारा जयंत दिवाण, मराठवाड्यात शेवटपर्यंत कामात असलेला संजय पतंगे, मराठवाड्यातच रचनात्मक संघर्ष समितीचं काम करणारा श्रीनिवास कुलकर्णी, माण तालुक्यात महिला बँक स्थापन करणारे चेतना आणि विजय सिन्हा ही वैचारिक, राजकीय, सामाजिक बांधिलकी पक्की झालेली पिढी आजतागायत सक्रिय दिसते.

छात्रयुवा संघर्षवाहिनीत काम करत असताना आणखी एका गोष्टीचा प्रभाव माझ्यावर पडला, तो म्हणजे बिहारमधील कवी दुष्यंतकुमार यांनी चळवळीसाठी लिहिलेल्या गीतांचा. या गीतांची इतकी धास्ती त्यावेळच्या दमनयंत्रणेने घेतली होती की, बस्स! केवळ कवितांमधूनदेखील क्रांतिकारी विचार मांडता येऊ शकतो, गीत देखील चळवळीची प्रेरणा ठरू शकतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दुष्यंतकुमार यांच्या गझला आणि गीतं. त्या काळात या गीतांचंही प्रचंड आकर्षण युवकांमध्ये होतं. 

त्यांनी दमनकारी राज्यसत्तेवर, दाभिकपणावर तर ताशेरे ओढलेच आहेत, पण भारतातील सर्वसामान्य, शोषित माणसाबद्दलही त्यांची कविता बोलते.

संघर्षवाहिनीची एकही बैठक दुष्यंत कुमार यांच्या गीता शिवाय संपली नाही. बैठकांमधून गायली जाणारी काही गीत अशी होती...

हो गई है पीर परबत सी पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए

किंवा

ये सारा जिस्म झुककर बोझ से दुहरा हुवा होगा मै सजदेमें नही था आपको धोखा हुवा होगा यहांतक आते आते सूख जाती है कई नदियां मुझे मालूम है पानी कहां ठहरा हुवा होगा।

किंवा

शोषितांसाठी लोकशाहीचं महत्त्व सांगतानाची त्यांची गझल...

वो आदमी नही है मुकम्मल बयान है माथे पे उसके चोट का गहरा निशान है सामान कुछ नहीं है फटेहाल है मगर झोलेमे उसके पास कोई संविधान है। अशासारख्या कवितांनीसुद्धा एक चेतना निर्माण केली होती.

या प्रकारची चेतना जागृती आणि कार्यकर्त्यांची घडण या आंदोलनातून होत असताना जळगाव येथील मुस्लिम समाजाच्या पंचकमिटीने, मुस्लिम महिलांना सिनेमाबंदीचा फतवा काढला. हे सिनेमाबंदी प्रकरण काय होते?

सिनेमाबंदी विरोधी लढा

२ ऑगस्ट १९८१, रमझान ईदचा दिवस. जळगाव शहरातील शनिपेठ भागातील एका मुस्लिम मोहल्ल्यात मुस्लिम पंचायत कमिटीची एक बैठक झाली. या बैठकीत मुस्लिम पंचकमिटीने असा फतवा काढला की, सध्या 'सिनेमामुळे समाजात वाढत असलेली गुंडागर्दी आणि सिनेमापासून होणारे कुसंस्कार टाळण्यासाठी आणि सिनेमातील गुंडागर्दीमुळे आपापसात होणारी भांडणे व जातीय दंगे उद्भवू नयेत यासाठी आमच्या
समाजातील महिलांना आम्ही सिनेमागृहात जाण्यासच बंदी घालत आहोत.

याच पत्रकात नमूद करण्यात आले होते की, मुस्लिम पंचकमिटीच्या या निर्णयानंतर जर एखादी महिला सिनेमा पहाण्यास गेलेली आढळली तर तिला ५१ रुपयांपासून १५१ रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. तसेच तिच्या कुटुंबावर मुस्लिम समाजाकडून बहिष्कार टाकण्यात येईल.

मुस्लिम महिला या निर्णयानंतर सिनेमाला गेल्याचे शोधून काढायचे कसे, तर त्या त्या मोहल्ल्यातील तरुण मुलांनी सिनेमागृहांवर नजर ठेवायची आणि आपल्या मोहल्ल्यातील महिला सिनेमाला येताना दिसल्या तर त्यांना रोखायचे, पंचकमिटीला त्यांची नावे सांगायची.

अर्थातच ही मुले काहीही कामधंदा नसलेली मुले होती. स्वत:चा काही रोजगार नसल्यामुळे दिवसभर टवाळक्या करणारी, मुस्लिम मुले यात उत्साहाने पुढे सरसावली आणि पानटपऱ्याऐवजी सिनेमागृहांसमोर घोळक्याने उभी राहू लागली. हळूहळू या सिनेमाबंदीचे लोण पूर्ण जिल्हाभर पसरले. जळगाव शहरात तर लागोपाठ सर्व मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये तिथल्या प्रतिष्ठित मुस्लिम रहिवाशांनी बैठका घेऊन हा निर्णय घेतलाच, पण जिल्ह्यातल्या सर्व तालुक्याच्या आणि छोट्या शहरांमध्येही मुस्लिम समाजातील नेतृत्वाने सिनेमाबंदीचा फतवा काढला. अशा तर्हेने चोपडा, यावल, भुसावळ, रावेर, जामनेर, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इत्यादी शहरांमध्ये मुस्लिम महिलांसाठी सिनेमाबंदी लागू केल्याच्या बातम्या आल्या.

शिवाय महाराष्ट्र बाहेर कर्नाटकात विजापूर येथेही मुस्लिम महिलांना सिनेमा बंदी केल्याची बातमी वर्तमानपत्रात आली. मुस्लिम पंच कमिट्यांनी मुस्लिम महिलांना सिनेमाबंदी केल्याच्या निर्णयाची पत्रिका वर्तमानपत्र यांनी दिली. तसेच
समाजातही वाटली, जेणेकरून या निर्णयाची माहिती सर्व समाजाला व्हावी. 

ज्या मुस्लिम पंचकमिट्यांनी ठिकठिकाणी सिनेमाबंदीचा फतवा जाहीर केला, त्या पंचकमिट्यांचे सदस्य मुल्ला मौलवी तर होतेच, शिवाय त्या-त्या
 

छात्रयुवा संघर्षवाहिनीत काम करत असताना आणखी एका गोष्टीचा प्रभाव माझ्यावर पडला, तो म्हणजे बिहारमधील कवी दुष्यंतकुमार यांनी चळवळीसाठी लिहिलेल्या गीतांना. या गीतांची इतकी धास्ती त्यावेळच्या दमान यंत्रणेने घेतला होता की, बस्स, केवळ कवितांमधूनदेखील क्रांतिकारी विचार मांडता येऊ शकतो, गीतंदेखील चळवळीची प्रेरणा ठरू शकतात याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दुष्यंतकुमार यांच्या गझला आणि गीतं. त्या काळात या गीतांचंही प्रचंड आकर्षण युवकांमध्ये होतं. त्यांनी दमनकारी राज्यसत्तेवर, दांभिकपणावर तर ताशेरे ओढलेच आहेत, पण भारतातील सर्वसामान्य, शोषित माणसाबह्दलही त्यांची कविता बोलते. संघर्षवाहिनीची एकही बैठक दुष्यंतकुमार यांच्या गीताशिवाय संपली नाही.

भागातील तथाकथित समाजसेवक आणि राजकीय पक्षांचे सदस्य, नगरसेवक जास्त संख्येने होते. मशिदीच्या इमामांपासून, राजकीय पक्षांच्या स्थानिक पुढाऱ्यांपर्यंत या पंचकमिट्यांमध्ये सदस्य होते. पण त्यातील असे किती चारित्र्यवान होते? शिवाय एकही मुस्लिम स्त्री या कमिट्यांमध्ये नव्हती.

मुस्लिम महिलांना सिनेमाबंदी करण्यात आल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या आणि त्यानंतर उलट-सुलट प्रतिक्रिया
यायला सुरुवात झाली. त्यात सुशिक्षित मुस्लिम तरुणांच्या प्रतिक्रिया तसेच मुस्लिमेतर समाजातून आलेल्या प्रतिक्रिया
यांचा समावेश होता.

मुस्लिम पंचकमिटीने महिलांना सिनेमाबंदी केल्याच्या निर्णयानंतरही काही मुस्लिम महिला सिनेमाला गेल्या तेव्हा
पंचकमिट्यांनी नेमलेल्या तरुण मुस्लिम मुलांनी त्यांना
चित्रपटगृहाबाहेर ओढून काढले आणि त्यांची धिंड काढली. अशी आठ-दहा प्रकरणे घडली.

जळगाव शहरात तरुणांमध्ये कार्यशील असलेल्या छात्रयुवा संघर्ष वाहिनीच्या जळगाव येथील शाखेची सिनेमा बंदीच्या निर्णयासंबंधी बैठक झाली. या बैठकीत पंचकमिटीच्या फतव्यासंबंधी तसेच वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या प्रतिक्रियांसंबंधी चर्चा करण्यात आली. मी तेव्हा संघर्ष वाहिनीची सदस्य आणि पूर्णवेळ कार्यकर्ती होते. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, मी आणि संघर्ष वाहिनीची आणखी एक महिला सदस्य अरुणा तिवारी यांनी मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये जाऊन मुस्लिम महिलांच्या या संबंधीच्या प्रतिक्रिया समजून घ्याव्यात. 

आम्ही दोघी मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये गेलो आणि मुस्लिम महिलांशी यासंबंधी बोललो. ज्या महिलांना चित्रपटगृहाबाहेर
ओढून काढून त्यांची धिंड काढण्यात आली होती अशा महिलांनाही भेटलो. एकूण मुस्लिम महिलांमध्ये सिनेमाबंदीच्या फतव्याविषयी तीव्र नाराजी नव्हती, पण पंचकमिट्यांना हा अधिकार आहे का आणि पंचकमिट्या ज्या पद्धतीने हा निर्णय राबवीत होत्या, त्याबद्दल त्या संतापाने बोलत होत्या.

महिलांचे म्हणणे काय आहे हे समजावून घेण्यासाठी आणि मांडण्यासाठी समाजाने व्यासपीठ अर्थातच दिले नव्हते. त्यामुळे आम्ही या सर्व प्रतिक्रिया वर्तमानपत्रांतून मांडायचे ठरवले.

१.सर्व समाजाला त्यातही महिलांना विश्वासात न घेता मुस्लिम पंचकमिटीने सिनेमाबंदीचा निर्णय कसा घेतला? 

२.पंचकमिटीत एकही महिला सदस्य नसताना मुस्लिम महिलांसाठी सिनेमाबंदीचा निर्णय कसा घेण्यात आला?

३. सिनेमाबंदीसाठी जर पंचकमिटी इस्लामचा आधार घेत असेल आणि वाईट गोष्टी बघू नका असे धर्म सांगतो अशी भूमिका घेत असेल तर मग पुरुषांनाही सिनेमाबंदी का नको? 

४. धर्माच्या नावाने पंचकमिटी समाजसुधारणेची भूमिका घेते तेव्हा समाजात चाललेल्या सर्वच वाईट गोष्टींना विरोध करण्याची जबाबदारी पंचकमिटी का घेत नाही? उदा. पंचकमिटीचे सदस्य असलेल्या लोकांचे वा त्यांच्या परिवारातील सदस्यांचे जुगाराचे अड्डे, दारुच्या भट्ट्या आहेत, काही सदस्यांवर चोरीचे, भ्रष्टाचाराचे, छेडछाडीचे आरोप आहेत. त्यांना सुधारण्यासाठी फतवा काढण्याची पंचकमिटीला गरज का वाटत नाही?

५. सिनेमा बघण्याने वाईट संस्कार होत असतील तर ते केवळ स्त्रियांवर नाही तर पुरुषांवरही होत असणार. मग पंचकमिटी पुरुषांनाही सिनेमाबंदीचा फतवा का काढत नाही? 

६. भारताच्या संविधानाने भारतीय नागरिकांना मनोरंजनाचा अधिकार दिला आहे. तेव्हा पंचकमिटी असे फतवे काढून हा अधिकार हिरावून घेऊ शकते काय?

७. मुस्लिम महिलांना चित्रपटगृहाबाहेर ओढून काढून, अपमानास्पद वागणूक देऊन बहिष्कृत करण्याचा अधिकार पंचकमिटीला आहे का?

८. त्याच काळात दारू प्यायल्याने बंगलोर पावले. त्या दारू दुकानाचा मालक सय्यद अमीर सुलतान हा मुस्लिम आहे. पंचकमिटीने त्याचा निषेध का केला नाही? 

९. पंचकमिटी म्हणते इथे इस्लामी येथे ३२५ लोक मृत्यू सत्ता नसल्याने आजही मुस्लिम महिला व्यासपीठाने सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणू शकत नाही, तेव्हा पंचकमिटी कायदा हातात घेऊन मुस्लिम महिलांना सिनेमा बघितला म्हणून दंड करणे, धिंड काढणे, बहिष्कृत करणे हे तरी कसे करू शकते?

वर्तमानपत्रातून मुस्लिम महिला व्यासपीठाकडून जे मुद्दे मांडले गेले त्यामुळे सुशिक्षित मुस्लिम तरुण, समंजस मुस्लिम नागरिक यांचा पाठिंबा आम्हाला मिळायला लागला आणि बेकायदा सिनेमाबंदीसंबंधी रोज वर्तमानपत्रात पत्र येऊ लागली. अशा रीतीने मुस्लिम महिलांना सिनेमाबंदी विरोधात समर्थन मिळू लागले.


१४ फेब्रुवारी १९८२ रोजी रेहाना शेख नावाच्या मुस्लिम महिलेवर हल्ला करण्यात आला. ती तिच्या पतीसोबत सिनेमा बघायला गेली होती. सिनेमा बघून परतत असताना तिच्या मोहल्ल्यातील सय्यद अकीलने, ज्याला पंचकमिटीचा आश्रय होता- विचारले की, 'सिनेमाबंदी असताना तू सिनेमा बघायला का गेली' ? रेहाना म्हणाली, "मी माझ्या पतीसोबत गेले होते आणि इस्लाम म्हणतो पतीची आज्ञा पाळा. ,,

तिच्या या उत्तरामुळे सय्यद अकील रागावला आणि त्याने रेहाना तिच्या पतीवर हल्ला केला. त्यात रेहानाचा पती सलीम याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आणि रेहानाचा ओठ कापला गेला.

या घटनेचा निषेध मुस्लिम महिला व्यासपीठाने तर केलाच, पण मुस्लिम महिलांच्या बैठकाही वाढवल्या. जास्त मुस्लिम मोहल्ल्यामध्ये संपर्क केला. सुरू भुसावळ शहरातील मुस्लिम महिलांच्या सभेलाही उपस्थित राहून एकजूट जाहीर केली. एक मुस्लिम भगिणी म्हणाली, 'ये लोग सिर्फ मुर्गीयोंको मार सकते है, उन बिल्लोंको नही मार सकते, जिनके मुंहमे खून
लगा है।' इतकी राजकीय सामाजिक समज त्यांची होती. त्या आपली अभिव्यक्ती स्वत:च्या भाषेत करीत होत्या. 

मुस्लिम महिला समितीच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, १९४२ च्या ८ मार्च जागतिक महिला दिनी सिनेमाबंदी विरुद्ध आंदोलन करायचे. त्यानुसार कार्यक्रमाची आखणी करायला सुरुवात केली. त्यात असे ठरले की, 'सिनेमाबंदी विरोधात हा 'सत्याग्रह' असेल. आम्ही शांतपणाने, कोणालाही आक्रमकपणाने विरोध न करता सिनेमाबंदी झुगारून देऊ. हा सत्याग्रह आम्ही करू, कारण आमचीच एक भगिनी रेहाना हिच्यावर हल्ला झाला आहे. ज्या सिनेमामुळे तिच्यावर हल्ला झाला तोच सिनेमा आम्ही प्रतिकात्मक स्वरूपात पाहू. आम्ही सिनेमागृहापर्यंत जाऊ. सिनेमाबंदी आम्ही झुगारून लावतो आहोत हे जाहीर करू आणि परत येऊ. 

रेहानाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला नेले. पोलिसांनी फारसे सहकार्य दिले नाही. कारण पंचकमिटीमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक होते.

मग सिनेमाबंदीच्या सत्याग्रहासाठी पोलिसांना दिली. त्यानंतर सूचना वातावरण तापत गेले. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या दिवशी म्हणजे ८ मार्च १९८२ रोजी पोलिसांना बंदोबस्त ठेवावाच लागला, कारण वातावरणात तणाव होता. आम्हाला धमक्या, दगडफेक इत्यादी प्रकार सुरू झाले होते.

त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला बोलावून घेतले आणि सांगितले की, तुम्ही सामाजिक शांतता भंग करीत आहात, त्यामुळे तुम्हाला मी 'वॉर्निंग' देत आहे.' मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नाच्या आंदोलनात अनेक वेळा हा अनुभव आलेला आहे की, मुस्लिम सुधारकांना तंबी देऊन, मुस्लिम गुंडांना प्रशासन पाठीशी घालते.

या सर्व विरोधानंतरही वेगवेगळ्या मुस्लिम मोहल्ल्यात बैठकांना प्रतिसाद चांगला मिळाला. मात्र सिनेमागृहवाले तिकिटे द्यायला तयार होईनात. त्यांना भीती वाटत होती. त्यावेळी आम्हाला अंमळनेर येथील जनता पक्षाचे माजी आमदार श्री.गुलाबराव पाटील यांनी मदत केली आणि तिकिटांची रक्कम स्वतः भरून आम्हाला तिकिटे काढून दिली.

८ मार्चला मोहल्ल्या-मोहल्ल्यातून मुस्लिम स्त्रिया आल्या. जवळपास दोनशे स्त्रिया बाहेर निघाल्या. मात्र रस्त्यात झालेली दगडफेक आणि दहशतीमुळे ८० स्त्रिया चित्रपटगृह पर्यंत पोचल्या. त्या सर्वांनी सिनेमा प्रतिकात्मक रूपात पाहिला आणि सिनेमा बंदी झुगारून दिल्याचे घोषित केले.

या सत्याग्रहाची बातमी सर्व वर्तमानपत्र यांनी दिली. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने अग्रलेख लिहिला. मात्र सत्याग्रहात सहभागी झालेल्या महिलांना धमक्या, छळ, दहशतवाद इत्यादींना तोंड द्यावे लागले. त्यासंबंधी आम्ही पुन्हा जाहीर वाच्यता केली. आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रा.ग.प्र.प्रधान यांनी प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्री.रा.सु.गवई यांनी ही सिनेमाबंदी अवैधानिक असल्याचे सांगितले. सत्याग्रही महिलांना संरक्षण मिळावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. त्यामुळे त्यावेळचे गृहराज्यमंत्री डॉ.श्रीकांत जिचकर यांना तसे आश्वासन द्यावे लागले. 

त्यानंतर पंचकमिट्या आपोआपच निष्क्रिय झाल्या. रेहानावर हल्ला करणाऱ्या सय्यद अकोला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली.

महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये लागू सिनेमाबंदीच्या विरोधात निदर्शने झाली. कर्नाटकात प्रा.नजमा बांगी यांनी निषेध नोंदवला.

अन्य शहरांतील मुस्लिम महिलांवरील सिनेमाबंदी उठवली गेली.

देशभरातून अभिनंदन आणि समर्थन करणारी जी पत्रे आली त्यात जास्त पत्रे मुस्लिम तरुण-तरुणींची होती. अगदी काश्मीरच्या युवकांची पत्रेही त्यात होती, मात्र सिनेमाबंदी आंदोलनानंतर दशहतही खूप वाढली. मी कोणाची मुलगी वगैरेंचा शोध पंचकमिटीच्या लोकांनी घ्यायचा प्रयत्न केला. शिवाय संघर्ष वाहिनीच्या कार्यालयावर रात्रीच्या वेळी दगडफेक केली गेली. प्रचंड दहशत आणि धमक्या यांमुळे सर्वसामान्य मुस्लिम महिलांवरही दडपण आले. मला सरकारने पोलिस संरक्षण दिले. त्यातून मी लवकरच सुटका करून घेतली. मात्र मुस्लिम महिलांमध्ये काम करण्याबाबत माझ्या मनातील विचारचक्र त्यानंतर वेगाने फिरू लागले…

मुस्लिम महिलांमध्ये आत्मविश्वास आला.

दहशतीमुळे पुढे काम वाढायला अडचणी खूप आल्या तरी पुन्हा सिनेमाबंदीसारखे फतवे काढता येणार नाहीत हे पंचकमिट्या आणि तथाकथित नेते यांना पुरेपूर उमगले.

(क्रमश:)

Tags: मुस्लिम महिला संघर्षवाहिनी रजिया पटेल weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रझिया पटेल
raziap@gmail.com

मागील चाळीस वर्षे रझिया पटेल सामाजिक कार्यात असून, मुस्लिम समाजाचे प्रश्न, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समता या तीन क्षेत्रांत त्या विशेष सक्रिय आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके