डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपल्या अंकात श्री. अवधूत परळकर 'जनअरण्य' लिहितात. अत्यंत मार्मिक सदर असते. समाजातील, राजकारणातील, नाटक, सिनेमांमधील त्रुटीवर ते नेमके बोट ठेवतात. अशा लेखनाची जरूरी आहेच. परळकर माझे स्नेही आहेत. मला त्यांना अशी विनंती करावीशी वाटते- आपल्या या प्रचंड समाजात काही आशादायक, उल्हसित करणान्या गोष्टी पण असणारच. श्री. परळकर प्रतिभासंपन्न आहेत. त्यांनी या गोष्टींवर सुद्धा प्रकाश टाकावा. समाजाला चिमटे घेता घेता कधीतरी पाठ थोपटणे पण आवश्यक आहे. नाही का?

हेही नसे थोडके

श्री. ग. प्र. प्रधान व श्री. वसंत बापट यांच्याकडून आपण 'साधना'ची धुरा नव्या खांद्यावर घेतल्यानंतर मी प्रथमच पत्र लिहीत आहे. 'साधना'चा पूर्वीचा दर्जा कायम राखत त्याच्यामध्ये काळानुसार सुयोग्य असे बदल आपण केले आहेत. संपादकीयात उत्साह व कळकळ दिसून येते. 

आपल्या अंकात श्री. अवधूत परळकर 'जनअरण्य' लिहितात. अत्यंत मार्मिक सदर असते. समाजातील, राजकारणातील, नाटक, सिनेमांमधील त्रुटीवर ते नेमके बोट ठेवतात. अशा लेखनाची जरूरी आहेच. परळकर माझे स्नेही आहेत. मला त्यांना अशी विनंती करावीशी वाटते- आपल्या या प्रचंड समाजात काही आशादायक, उल्हसित करणान्या गोष्टी पण असणारच. श्री. परळकर प्रतिभासंपन्न आहेत. त्यांनी या गोष्टींवर सुद्धा प्रकाश टाकावा. समाजाला चिमटे घेता घेता कधीतरी पाठ थोपटणे पण आवश्यक आहे. नाही का?

रेणू गावस्कर यांनी करून दिलेला निरनिराळ्या परदेशी लेखकांचा परिचय व त्या लेखकांच्या कथा फारच रोचक आणि वाचनीय वाटल्या. श्रीराम लागूंचे आत्मनिवेदन प्रांजळ व त्यांचे अनुभवविश्व डोळ्यांसमोर उभे करणारे आहे. राजीव तांबे, महावीर जोंधळे बालगोपालांचे मनोरंजन, प्रबोधन फारच उत्तम त-हेने करतात. एकंदरीतच 'साधना'सारखी समाजसेवेचे, समाजप्रबोधनाचे व्रत घेतलेली नियतकालिके फारच कमी आहेत. पण ती अजूनही आहेत, हे काय कमी आहे?

चंद्रशेखर कारखानीस, मालाड, पूर्व.

----

कट्टर जातीयवादीच भाई-भाई

24 जुलैच्या 'साधना' अंकातील 'समकालीन इतिहासाचा आदर्श गृहपाठ' या श्री.पन्नालाल सुराणा यांच्या लेखाच्या संदर्भात थोडेसे... 

'कॉर्बेट कम्युनॅलिझम'चा जोडअंक पूर्ण माहितीने भरलेला आहेच; परंतु ही सर्व माहिती वाचल्यावर आणि विहिंप, बजरंग दलवाल्यांनी प्रसिद्ध केलेल्या या दंगलींसंदर्भातील गलिच्छ गुजराती कवितेचे या अंकातील भाषांतर वाचल्यावर हेच डॉ.तोगडिया, अशोक सिंघल वगैरे स्वतःला आम्हा हिंदूंचे नेते म्हणवून घेत असतील, तर माझ्यासारख्या सामान्य हिंदूला हिंदू म्हणवून घेण्यास लाजच वाटेल.

याच संदर्भात बडोद्यातील दोन घटनांचा उल्लेख करावासा वाटतो. या दंगलीत उस्ताद फैय्याजखाँ या सुप्रसिद्ध गायकाची बडोद्यामधील मजार उद्ध्वस्त करण्यात आली. याचा निषेध जाऊथाच, त्याबद्दल साचे दुःखही महाराष्ट्रातील गायक तसेच गायनाशी संबंधित संस्थांनी व्यक्त केल्याचे अद्याप तरी ऐकले नाही.

तसेच बडोदा येथील सयाजीराव विद्यापीठातील एक मान्यवर प्राध्यापक जे.एस.बंदुकवाला या पुरोगामी विचारांच्या आणि हिंदूंमध्येही आदरभाव असलेल्या शिक्षणक्षेत्रातील व्यक्तीला जीव वाचविण्याकरिता बडोद्यातून पळून जाये लागले. प्रा.बंदूकवाला संरक्षणमंत्री आणि माजी समाजवादी श्री.जॉर्ज फर्नाडिस यांचे मित्र आहेत. फेब्रुवारीमध्येच त्यांना सावरकर जयंतीच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर 1991 मध्ये सध्याचे एक मंत्री श्री.अरुण शौरी यांच्यासमवेत त्यांनी एका परिसंवादामध्ये भाग घेऊन जर बाबरी मशिदीच्या जागी रामजन्म झाला होता अशी हिंदूंची श्रद्धा असेल तर बाबरी मशिदीची जागा मुसलमानांनी आपण होऊन हिंदूंना द्यावी, असे मत मांडले होते. अशा माणसालाही केवळ तो मुस्लिम आहे, या एकाच कारणामुळे हिंदू दंगेखोरांच्या भीतीने पळ काढावा लागतो, हे बाबरी मशिदीची जागा हिंदू संघटनांच्या ताब्यात देऊन मुसलमान सुरक्षित राहू शकतील, असे मानणान्यांनी लक्षात घ्यावे. याचे कारण पुरोगामी मुसलमान व विहिंप हाच खरा जातीयवादी मुसलमान तसेच हिंदूंचा शत्रू असतो आणि दोन्ही धर्मामधील जातीयवादी हे एकमेकांचे मित्रच असतात. त्यामुळेच मुसलमानांमधील सुधारणावाद्यांबर जातीयवादी हिंदू प्रथम हल्ला करतात, हे मुस्लिम तसेच हिंदू सुधारणावाद्यांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि हिंदू तसेच मुस्लिम जातीयवादाविरुद्धच्या लढाईत त्याप्रमाणे धोरण आखून कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत. 

भालचंद्र राजे, कल्याण.

----

योग्य संस्कार कोणते?

पुण्यानजिकच्या निगडी येथील शाळेत प्रवेशपूर्व अटींच्या अंतर्गत पालकप्रबोधन वर्गाचे आयोजन केले, त्यावर श्रीयुत रमेश पानसे यांचे विचार व्यक्त करणारा 6 जुलै 'साधना'च्या अंकात 'संस्काराची संकल्पना तपासू या...' हा लेख वाचनात आला. मुलांवर संस्कार व्हावेत म्हणून गीता, रामरक्षा किंवा इतर श्लोक यांचे मुलांकडून पाठांतर करून घेतले जाते. परंतु यातून खरे संस्कार होतात, का याबद्दल लेखक प्रामाणिकपणे साशंक आहेत. परंतु त्यांच्या लेखातून संस्काराची त्यांची कल्पना (संकल्पना) स्पष्ट होत नाही. उलट त्यांनी 'कशातून संस्कार होतात, कसले संस्कार शाळांतील लहानग्यांवर करायची गरज आहे. संस्काराचे मार्ग कोणते हे आपण चोखाळायचे हे आपण ठरवायचे, असे सांगितले आहे. मला वाटते मुलांवर गीता, रामरक्षा इत्यादींच्या पाठांतरानेच संस्कार व्हावेत, हे ठरवूनच ती पालक मंडळी जमली असावीत. वास्तविक श्रीयुत पानसे यांना पालकप्रबोधनच्या समारोपास आमंत्रित केले होते. ती संधी वापरुन आपल्या भाषणात मुलांवर योग्य व अपेक्षित संस्कार, त्यांची संकल्पना स्पष्ट करून उपस्थित पालकांच्या विचारांना छेद देणे अपेक्षित होते! तसेच तेच विचार त्यांनी वरील लेखात परिणामकारक रितीने मांडले पाहिजे होते. तीन वर्षाच्या पाल्यांचे पालक सर्वसाधारण प्रौठ असून त्यांच्याकडून गीता अध्याय पाठांतर होणार नाही, हे विचार न पटणारे आहेत. याउलट साठी ओलांडलेली मंडळी स्वखुशीने श्लोक पाठांतर, आध्यात्मिक शिबिरे पार पाडताना आढळणे नित्याचे झाले आहे.

डॉ. श्रीकांत परळकर, मुंबई

Tags: अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार विधिमंडळ स्थायी समित्या Budget Sessions MLAs Legislative Standing Committees weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके