डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अगतिक

अगतिक  

मरण्यादेह ठरवूनही
जीव जाता जात नाही
निरर्थक जगताना
अन्वय लावणे संपत नाही

शेण पडल्यासारखे असल्या
फितुर जगात आलो
अस्तित्वाचा संदर्भच
लागता लागत नाही.

नाही बघवत अवसानघातक
जगाचे मुखवटे;
किळसवाणे त्यांचे हसणे
आता ऐकवत नाही.

उन्मत नाच नंगा पाहून
खुदाही डरून जाईल
कसे षंढ त्यांचे मन
उबत नाही.

जगताना बांधीव असे
तुष्ट इथे सगळे
कसा इथल्या राज्यावरचा
काळोख बुडत नाही!

सगळ्यांच्याच नाकावरचे
दोरे डुलत नसतात
घटिकापात्र माझे मात्र कसे
भरत नाही?

- शिरीष गोपाळ देशपांडे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके