डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दि.6 फेब्रुवारीच्या साधना अंकातील ‘शेतकरी आंदोलन : युद्धात जिंकले, तहात हरले?’ हे संपादकीय वाचत असताना मनात एकच प्रश्न निर्माण झाला की, आम्ही गेल्या 74 वर्षांपासून आपल्या बांधवांना  ‘भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे सांगत, त्यांच्यात नैतिक सामाजिक आदर्श जोपासण्याचा प्रयत्न करीत आहोत;  पण ती शिकवण  कुचकामी आहे असे  वाटून गेले. कारण गेल्या 26 नोव्हेंबरपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालत होते,  पण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत घडलेल्या घटनेमुळे जनमानसातील त्या आंदोलनांची प्रतिमा पुसट झाली आहे. सुरक्षारक्षक बांधवावर, पोलीस कर्मचाऱ्यांवर किंवा आपल्याच माणसांवर आपण हल्ला करत आहोत, दगडफेक करीत आहोत, हे दृश्य लाजीरवाणे वाटले. यापुढे तरी आंदोलक कार्यकर्त्यांनी आणि राज्यकर्ते/केंद्र सरकारने जबाबदारीची जाणीव ठेवून राष्ट्रहित पाहावे.

भाषेसाठी सामाजिक मोहीम चालवावी...

दि. 13 फेब्रुवारीचा अंक वाचला. त्यातील ‘पंचायतराज सक्षम नसण्याचे पाचवे कारण... ’ हे संपादकीय तसेच ‘त्रिभाषा सूत्र : महाराष्ट्रात काय झाले? हा हर्षवर्धन कडेपूरकर यांचा लेख याबद्दल...

संपादकीयात  महाराष्ट्रातील चौदा हजारांहून अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका नववर्षारंभी पार पडल्या. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निम्म्याहून अधिक निवडून आलेले सदस्य महिला आहेत. 2012 मध्ये महिला सबलीकरणासाठी सरकारने विधेयक मंजूर करून महिलांना 50 टक्के राजकीय आरक्षण लागू केले. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्यांची संख्या  निम्म्याहून अधिक झाली आहे. पण हा आशावाद निर्माण होण्याबरोबरच ‘कामातील, निर्णयप्रक्रियेतील स्वातंत्र्य’ यांचा विचार करता शंकेची पाल मनात चुकचुकली. महिलांच्या राजकीय निर्णयप्रक्रियेत नबरोबा ढवळाढवळ करतात, पुरुष सदस्यांकडून निर्णय परस्पर घेतले जातात, असा पूर्वेतिहास आहे. राजकीय पटलावर महिला आरक्षणाचा आग्रह धरताना महिलांच्या निर्णय क्षमतेवर शंका उपस्थित करून पुरुषच निर्णय घेत असतात, हे एक उघड गुपित आहे. पण जागतिक नेतृत्वाचा विचार करता महिलांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले असल्याचे दिसून येईल. आपल्याकडे पुरुषसत्ताक व्यवस्था आजही महिलांकडे ‘अबला’ म्हणूनच पाहात असते. निर्णयप्रक्रियेत पूर्ण स्वातंत्र्य बहाल केले तरच अबला म्हणून गणल्या जात असलेल्या महिला सबला होतील आणि अपेक्षित महिलाराज अवतरेल.

दुसरा लेख भाषा धोरणाबद्दलचा. युनेस्कोच्या अहवालानुसार मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिले गेले तर मुलांची आकलनशक्ती वाढून क्लिष्ट विषयही सहज समजण्यास मदत होते. या अहवालाकडे कानाडोळा करत शासनकर्ते भाषातज्ज्ञांचा सल्ला न घेता व दूरगामी परिणामांचा विचार न करता मातृभाषेच्या विरोधात जाणारी शैक्षणिक धोरणे राबवताना दिसतात.

खरे तर कोणतीही भाषा वाचवणे, टिकवणे, वाढवणे ही एक व्यापक सामाजिक मोहीम असते किंवा असावी तरी. भाषेचा प्राण म्हणजे ती ज्या समाजातून अवतरते त्या समाजाच्या उन्नत्तीपासूनच्या संस्कृतीची ती एकप्रकारे ओळखच असते. म्हणजेच भाषा ही केवळ एक संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची आणि भावभावनांची सुवाहक असते. तसेच ती ज्ञानभाषादेखील असते. म्हणूनच भारतातील संतांनी ज्ञानाची रचना नि मांडणी करताना ते ज्या मातृभाषेच्या छत्रछायेखाली वाढले, जगले त्याच भाषेचा स्वीकार केला व साहित्याची निर्मिती केली. या जनभाषाच खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा आहेत. व्यवहार, संवाद यासाठी एक भाषा आणि शैक्षणिक माध्यम म्हणून इंग्रजी भाषा या सावळ्या गोंधळातच समाजातील जवळपास एक पिढी लहानाची मोठा झाली. तरीही हा वैचारिक गुंता सोडवण्यात आपल्याला यश आलेले नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रांना उपयुक्ततावादाने गिळंकृत केले असून शिक्षणक्षेत्रही यातून सुटू शकलेले नाही. भाषा ही अर्थशास्त्राला शरण जाते,  या तत्त्वाला आता मराठी भाषादेखील अपवाद राहिलेली नाही.

आपल्या जगण्यातून आज आपली भाषाच बाद झाली असल्यासारखी परिस्थिती आहे. ‘संवादविरहित समाज’च्या कडेलोटावर आपण उभे आहोत. मध्यमवर्गीय- उच्चमध्यमवर्गीय मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण देण्याला अग्रक्रम देत आहे. तर दुसरीकडे जे गरीब लोक आर्थिक दृष्ट्या मागास आहेत ते मराठी भाषेत शिक्षण घेत आहेत. याचा परिपाक असा झालेला आहे की, आज समाज भाषिक दृष्ट्या मागास होत चालला आहे. भाषेची, साहित्याची जोपासना ही नेहमी मध्यमवर्ग समुदयाकडूनच होत आली आहे आणि आता याच वर्गाने भाषेचे बोट सोडून तिच्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शब्दसौष्ठव, भाषालंकार, चिकित्सक संवादाभिमुख विचारांत असलेली श्रीमंती आपण हातची घालवून बसलो आहोत. आज वयाची पन्नाशी पार केलेली पिढी आणि विशी- तिशीतील तरुणांची पिढी यांची तुलना केली तर भाषेच्या, शब्दांच्या बाबतीत जुन्या पिढीतील लोक जास्त समृद्ध व काटेकोर दिसतात. बोलण्यातील काळानुरूप- समयसूचकता दर्शविणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार आजच्या पिढीतून लुप्त होत चालल्याच्या परिस्थितीत  भाषेचे संस्कार मग घडणार  तरी कसे? म्हणूनच भाषा समृद्धतेचा गत सुवर्णकाळ परत आणायचा असेल तर शिक्षण हे मातृभाषा द्यायला हवे. इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध आहे अशी समजूत करून फक्त इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायचे हा एक चूकीचा आणि घातक पायंडा पडत चालला आहे. मुलांच्या घरी मराठी संवादाचे वातावरण असते. घरात संवादाची भाषा वेगळी आणि शाळेत इंग्रजी माध्यम यामुळे मुले गोंधळत असून त्याचा परिणाम विषयाचे आकलन न होण्यात होत आहे. यातून ज्ञानोपासनेत- भाषा समृद्धीत असंख्य अडथळे येत आहेत. विषयांचे आकलन न होण्यामुळे  मुलांची ओढाताण होत असून, त्यांच्यावर मानसिक दडपण येत असल्याने, भाव-भावनांचे विश्वच बाधीत झाले आहे. बहुतेक पालक मराठी  मातृभाषेतून  शिकलेले असतात आणि त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्याने भाषा आणि शिक्षण या दोन्ही परिघात विसंवादाचे चित्र उभे राहिले आहे. हे टाळायचे असेल तर शिक्षण हे मातृभाषा मराठीतूनच मिळायला हवे.

बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी, पुणे

----

आंदोलनाची प्रतिमा पुसट झाली

दि.6 फेब्रुवारीच्या साधना अंकातील ‘शेतकरी आंदोलन : युद्धात जिंकले, तहात हरले?’ हे संपादकीय वाचत असताना मनात एकच प्रश्न निर्माण झाला की, आम्ही गेल्या 74 वर्षांपासून आपल्या बांधवांना  ‘भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असे सांगत, त्यांच्यात नैतिक सामाजिक आदर्श जोपासण्याचा प्रयत्न करीत आहोत;  पण ती शिकवण  कुचकामी आहे असे  वाटून गेले. कारण गेल्या 26 नोव्हेंबरपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालत होते,  पण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत घडलेल्या घटनेमुळे जनमानसातील त्या आंदोलनांची प्रतिमा पुसट झाली आहे. सुरक्षारक्षक बांधवावर, पोलीस कर्मचाऱ्यांवर किंवा आपल्याच माणसांवर आपण हल्ला करत आहोत, दगडफेक करीत आहोत, हे दृश्य लाजीरवाणे वाटले. यापुढे तरी आंदोलक कार्यकर्त्यांनी आणि राज्यकर्ते/केंद्र सरकारने जबाबदारीची जाणीव ठेवून राष्ट्रहित पाहावे.

डॉ.विश्वनाथ किशनराव भालेराव, उदगीर, लातूर

----

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्न

दि.26 जानेवारीला दुर्दैवी व निषेधार्ह हिंसक घटनांमुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंदी मोदी यांनी केले, त्या संदर्भात...

1. राष्ट्रध्वज बनलेल्या तिरंग्याच्या रक्षणासाठी जालियनवालाबागेत हजारांहून जास्त शिखांनी आणि पंजाबी स्त्री-पुरुषांनी प्राणार्पण केले नव्हते काय? 2. भाजपच्या किती मिरवणुकांमध्ये तिरंगा आणि भाजपचा हिरवा-भगवा झळकावण्यात येतो? बराक ओबामांना आपण स्वत:ची सही करून तिरंगा भेट दिला होता, तो काय तिरंग्याचा सन्मान होता काय? एका योगाच्या आसनाप्रसंगी आपण तिरंग्याने घाम पुसला नव्हता काय? 3. आज भाजपवाले ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्धाचा वारसा सांगत आहेत, आजच आपल्याला 1922 च्या चारौचुऱ्याच्या हुतात्म्यांची आठवण का झाली? 4. 15 ऑगस्ट 1947 रोजी सगळा भारत अभिमानाने तिरंगा फडकावत होता, तेव्हा रा.स्व.संघाचे मुखपत्र असलेले ‘ऑर्गनायझर’ काय लिहीत होते. संघाला त्रिमूर्ती चालतात, त्रिशूल चालतो, पण तिरंगा का चालत नाही. 5. स्वातंत्र्य चळवळीने तिरंगा झेंडा स्वीकारला, तेव्हा गोळवलकरांना का राग आला. तिरंगा आपला झेंडा नाही, असे त्यांनी म्हटले नव्हते काय? गेली 50 वर्षे नागपूरच्या संघाच्या कार्यालयावर तिरंगा झेंडा का फडकवला नाही? महात्मा गांधींच्या हत्त्येनंतर संघाने आनंदोत्सव का साजरा केला? संघाने आणि आपण राष्ट्रध्वजाचा अपमान केला असे म्हणणार का?

रमेशचंद्र पाटकर, मुंबई

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके