डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या जगात

या जगात 

ओठांतून शब्द बाहेर येण्यासाठी 
पोटाची परवानगी घ्यावी लागते 
या लोकशाहीच्या युगात 
ठोकशाहीला शरण जावे लागते

घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी 
येथे महाभारत उभे राहते
आणि विवस्त्र पांचालीची धिंड 
भर रस्त्यातून काढली जाते

या जगात केवळ जगण्यासाठी 
समुद्राचे दुःख पचवावे लागते
एका भाकरीच्या तुकड्यासाठी 
"सारे आकाश वाहून न्यावे लागते

- सुरेंद्र भोसले.

Tags: पांचाली लोकशाही महाभारत Panachali Democracy #Mahabharat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके