डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

  • मोलाचं काय?
  • मला असे वाटते
  • नानासाहेबांची जन्मतारीख
  • हा झोत वृत्तीवर !
  • एसेमांनी खुलासा करावा
  • आदिवासीच-आदिवासींसाठी
  • वास्तवाचे वेदनाघर

मोलाचं काय ? 

बैलगाडीखालून
जाणाऱ्या कुत्र्याला
वाटतो केवढा अभिमान! 
'मीच चालवतो बरं ही गाडी!'

त्याची तेवढी अक्कल
फारच तोकडी आहे.
गाडीवान कोण?
समजून घेतले पाहिजे.

पेशवाईच्या स्वप्नात
दंग असो कुणी बापडे!
त्यांना कुठला ध्यास
समता स्वातंत्र्याचा?

रस्त्यातून चालताना
जाण यायला हवी
पेशवाई छत्रापेक्षा मोठे
आकाशीचे छत्र
फार मोलाचे आहे.

मोलाचा आहे
सूर्यप्रकाशही.
- दिनकर वळंजू

मला असे वाटते 

संपूर्ण क्रांतिवाद्यांनी (1) ना जनता-ना काँग्रेस (2) शांततामयच्या ऐवजी अहिंसक व (3) अहिंसक वर्गलाभांना अग्रस्थान हे बदल ताबडतोब स्वीकारले पाहिजेत, असा माझा निष्कर्ष आहे. तसेच कार्यकर्त्यांनी (1) सेवादल (2) जनता पक्ष (3) जनता पक्षातील डावा गट (4) सामाजिक संघर्ष (5) वर्ग झंडे (6) सरकारी योजनांमध्ये सहभाग या प्रवृत्तींचे प्रधान-गौण वेगवेगळे असल्यामुळे एकाच व्यक्तीने अनेक प्रवृत्ती हाती घेणे टाळले पाहिजे. असेही मला वाटते. ता. 22 जुलैच्या अंकातील श्री अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या विचारांचे दर्शन वेधक आहे. वास्तवाचे दर्शन करून देणारे आहे, पण त्यांच्या मनोविश्वात वर्गसंच्षाच्या वास्तवाची जाण दिसत नाही. संपूर्ण कांतीच्या विचारात अहिंसक वर्गसंघर्ष हा सर्वात महत्वाचा व निकडीचा कार्यक्रम मानला पाहिजे. लोकसमित्यांवरील लेख तपशिलाच्या मार्गदर्शनाच्या दृष्टीने उद्बोधक आहे, पण त्यातही सर्वांचे समाधान हा अव्यवहार्य आग्रह आहे. पिळणाऱ्यांचे समाधान मात्र क्लेशाच्या मार्गाने त्याचे हृदयपरिवर्तन होईपर्यंत शक्य नाही.

या लेखाच्या मानाने समतासंगरमधील विवेचन अधिक परवड व वास्तवाचे भान ठेवणारे आहे. रावसाहेब कसबे यांच्या अपेक्षा रास्त आहेत. अपेक्षाभंग झाला पवार सरकारविषयक लेखांनी. पवार मंत्रिमंडळ ही औपचारिक संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनेही एक विकृती आहे. पक्षीय निष्ठांचे अवमूल्यन करणारी विकृती. अशा विकृतीतून अपक्ष लोकशाही उक्रांत होणार नाही. पक्षांतरविरोधी कायदा, प्रतिनिधी परत बोलावण्याचा हुक्क, गरिबांना खर्च झेपेल अधी निवडणूक पद्धत, बिन सरकारी दक्षता समित्या व मुख्य म्हणजे जनसमुदायांच्या हालचाली यांच्याभधूनच अपक्ष लोकशाही उत्क्रास्त होऊ शकेल, काँग्रेस पक्षाने जे फोडाफोडीचे राजकारण केले त्याची पवार सरकार ही अधिक घृणास्पद आवृत्ती आहे. साधनेने त्याच्याबाबतीत काही दिवस तरी मौन पाळायला हवे होते. दिल्लीतील छायाळया व पुण्यातील मारा माया यांचा अनुभव ताजा असताना जनता पक्षातील 5 पटक व इतर 5 पक्ष या दहा पक्षांच्या काडबोळयाचे स्वागत करण्यापूर्वी स्याविषयींचा काही अनुभव येण्याकरता थांबायला हवे होते, असे मला वाटते.
- ल. के. देशपांडे, पुणे. 

नानासाहेबांची जन्मतारीख 

साधनेचा 24 जूनचा अंक मिळाला. मलपूष्ठाने अंतरंगाची ओळख पटकन जाणवली. अंकातील सारेच लेख विचारप्रवर्तक आहेत. 

नानासाहेब गोरे यांनी 74 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल आपण अभीष्टचिंतन केले आहे. ह्या अभिष्टचिंतनामुळे नानासाहेब गोरे यांची जन्मतारीख 15 जून 1905 ठरते. माझे माहितीप्रमाणे ती 15 जून 1907 असावी, नानासाहेबांना म्हातारे करण्याची घाई आपणाला लागली आहे का? 

12 नोव्हेंबर 1905 ही एस्. एम्. ची जन्मतारीख आहे. म्हणजे नानासाहेब वयाने एस्. एम्. पेक्षा मोठे का ? तसं असले तर मला माझी चूक सुधारावी लागेल. मी नानासाहेबांना एस्. एम्. पेक्षा दीडएक वर्षाने वयाने लहान समजत आलेला आहे. 

जनता पक्ष जर टिकवायचा असेल आणि इंदिरा-सत्तेचा धोका जर टाळायचा असेल वर निदान आणखी 5 वर्षे तरी जनता पक्षांतर्गत गटांनी आपले वैचारिक मतभेद बासनात आग्रहाने गुंडाळून ठेवले पाहिजेत. साऱ्या प्रणालीशी एकदम लढण्यात स्वतःचा नाश होतो. प्रथम हुकुमशाहीचा धोका आणि तोही इंदिरा हुकुमशाहीचा-दूर केला पाहिजे. अर्धी चड्डी का, पायघोळ पायजमा" याबाबत विचार करायला अवसर आहे. " सर्वनाशे समुत्पन्ने अर्षं त्यजति पण्डितः," हे आजही मान्य केले जावे.

(अशा आशयाची आणखीही पत्रे आली आहेत. नानासाहेबांचे जन्मसाल 1907 आहे - संपादक)
- दा. चिं. ठाकूर, राजस्थान. 

हा झोत वृत्तीवर! 

पुण्याला जनता पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी मंडपाच्याबाहेर, पुस्तकाच्या विश्रीवरून अनुचित प्रकार झाल्याचे वृत्त ऐकले. 'झोत', श्री एस. एम. जोशी यांना डॉ. मंडलिकांचे अनावृत पत्र', डॉ. बाबा आढावांचे संघाची ढोंगबाजी' इत्यादी पुस्तकांच्या विक्रीवरून काही स्वयंसेवकांनी- की जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात- त्यांनी मारामारी केल्याचे ऐकून अत्यंत वाईट वाटले. आणीबाणीत विचार व प्रकाशन स्वातंत्र्य नव्हते ते आम्ही पुन्हा प्रस्थापित केलेले आहे असे म्हणणारे दुसऱ्याच्या विचारस्वातंत्र्याला काय किंमत देतात? हे या प्रकारावरून जगजाहीर झालेले आहे.

झोत ' च्या प्रती जाळल्याने किंवा विक्रेत्यांना मारहाण केल्याने संघीयांचे खरे स्वरूप पुरोगामी की प्रतिगामी है जनता ठरवीलच. दंडेलीने कोणताही निर्णय लागू शकत नाही. कोणीही कोणाच्या विचारस्वातंत्र्याला गुलामीत टाकू शकत नाही.

प्रा. रावसाहेब कसबे, डॉ. मंडलिक, डॉ. बाबा आढाव यांनी दाखवलेल्पा जागरुकतेबद्दल यांचे अभिनंदन केले पाहिजे.
- मिलिंद वाघमारे, उस्मानाबाद.

एसेमांनी खुलासा करावा 

आपल्या 22 जुलै 1978 च्या अंकात मुंबई वार्ता ह्या सदरात 'सहा दिवस हादरे बसले पण अखेर गया अध्याय सुरू झाला! 'या मथळयाशाली आपल्या (?) प्रतिनिधींनी मुंबईतील राज्यारोहणाचा मनोरंजक वृत्तांत दिला आहे. एस्. एम्. जोशींचा हवाला देऊन हे प्रतिनिधी लिहितात :

हे जे सर्व लोकशाही शक्तींच्या एकजूटींचे प्रतीकरूप असे सरकार स्थापन झाले आहे त्याचे इतिहासक्रमामधील पुरोगामित्वही या सहा दिवसांच्या गडबडीत श्री एस्. एम्. जोशी यांनी जनता आमदारांना सांगून टाकले आहे....

आता संपूर्ण क्रांतीच्या पायरीवर आपण असताना आपल्याला सर्व परिवाराचा विचार करून सरकार बनवायचे आहे. त्यात प्रादेशिक दृष्टी असेल, भाषिक असेल, दलितांना (सर्व प्रकारच्या दलितांना) त्यात पाटा असेल आणि ब्राह्मणदेखील त्यांच्या बुद्धीचे योगदान देण्यासाठी आपल्या टक्केवारीने त्यात असतील. ही सामाजिक अभिसरणाच्या इतिहासक्रमातील प्रगती आहे. त्यामुळे हे मंत्रिमंडळ उर्वरित चारही वर्षे महाराष्ट्राचे भले करण्याची कोशीश राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून करतील असे एसेम म्हणाले.' (ठळक विधाने माझी)
1. ब्राह्मणदेखील त्यांच्या बुद्धीचे योगदान देण्यासाठी आपल्या टक्केवारीने त्यात बसतील' यातील ब्राह्मण्याचा बौद्धिक अहंभाव स्पष्ट आहे. मग दलित जातीय सेवा भावाची ऐतिहासिक जबाबदारी पार वाढतील, इ. इ. सूचित होते. ब्राह्मणी अहंभावातून आलेली ही जातीय जाणीव इतिहास क्रमातील प्रगती इ. नाही.   
2. एस्. एम्. जोशी अशा त-हेची विधाने करतील हे खरे वाटत नाही. 
3. आपल्या प्रतिनिधींनी स्वतःची मते एस्. एम. च्या नावावर घुसडली असण्याची शक्यता वाटते. 
4. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष काय बोलतात हे फार महत्त्वाचे आहे. जातीयतेबद्दलच्या भूमिका ह्या तर अधिक महत्वाच्या आहेत. शेषजी भटडीचा' पक्ष म्हणून जनता पक्षावर टीका होत असताना त्याला कारण नसताना आपण खतपाणी पुरवत नाहीना, याची साधनेने तरी अत्यंत काटेकोर काळजी घेतली पाहिजे. सामान्य वाचक साधनेमधे एस. एम.च्या नावाने देते ते खरेच आहे असे गृहीत धरतो.
5. तेव्हा एस्. एम्. प्रत्यक्ष काय बोलले याबद्दल आपण खुलासा करावा.
- आनंद करंदीकर, मुंबई.

आदिवासीच-आदिवासींसाठी 

15 जुलै 1978 च्या साधनेतील "शहाद्याच्या आदिवासी संघर्षाच्या निमित्ताने" हा मधु पानवलकरांचा लेख वाचला. 

मधू पानवलकरांनी ओळखताना फारच थोड्या व्यक्तींचा विचार केलेला दिसतो. आदिवासी शहरवासीयांवर जितका विश्वास ठेवतात तितका विश्वास स्वजातीयांवर सुद्धा ठेवीत नाही. पानवलकर म्हणतात; "आदिवासींपासून- पांढरपेशा मंडळींनी काही काळ दूर रहावे" - या अशी गावे आहेत, असा तालुका आहे, तेथील पांढरपेशा लोकांचे प्रमाण (आदिवासींच्या प्रमाणाशी) फार तर 10 टक्के असावे. अशा गावांचा व तालुक्याचा कारभार आदिवासींच्या हाती असताना इतर तालुक्यातील आदिवासींच्या तुलनेने त्यांची प्रगती किती ? आदिवासी उपयोजनेत शासनाच्या सहकार्यावर आदिवासीच आदिवासीवर अन्याय करीत आहेत. त्यामुळे पुढारलेले व मागासलेले यांतील अंतर तोडणे अशक्य आहे. एकतर संस्कार व वैचारिक गुणाचा अभाव, मागासलेले आदिवासी व पुढारलेले, बैद्धिक कमकुवत, यांची तुलना केली तर आतापावेतो आदिवासीवर झालेला आर्थिक सवलतींचा पाव हिस्सा जरी ह्या लोकांवर खर्च असता तर चित्र वेगळे दिसले असते. पानवलकरांनी सुचवलेली कल्पना स्वागतार्ह आहे. हे कार्य साक्षणी करावे. शासनाने त्यात हस्तक्षेप के असा'ॲप्रोच' स्वीकारला तर वर प्रमाणे याचा बट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही.
- वनवासी, नंदुरबार, जि. धुळे. 

वास्तवाचे वेदनाघर 

तारीख चोवीस जूनच्या साधनेतील 'युवा, मनाचे स्पंद' वास्तवाचे वेदनाघर आहे. नव निर्माणासाठी बंद तोडू पाहणाऱ्या तरुणाईच्या कोंडमाऱ्याचा प्रश्न केवळ भावनात्मक नसून विचारी मनाला आव्हान देणारा आणि चक्रावून टाकणारा प्रश्न आहे.
- दिनकर शिंत्रे, सातारा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके