डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मी 'साधना 'चा वाचक, वर्गणीदार. हितचिंतक वगैरे सर्वकाही आहे. 10 डिसेंबरच्या अंकातील स्वागत नाही, शुभेच्छाही या संपादकीयात आपल्या अतिथी संपादकांनी मांडलेले विचार मला पटतेले नाहीत, त्यामुळे ही प्रतिक्रिया.

मग सगळीकडे अंधारच दिसणार!

मी 'साधना 'चा वाचक, वर्गणीदार. हितचिंतक वगैरे सर्वकाही आहे. 10 डिसेंबरच्या अंकातील स्वागत नाही, शुभेच्छाही या संपादकीयात आपल्या अतिथी संपादकांनी मांडलेले विचार मला पटतेले नाहीत, त्यामुळे ही प्रतिक्रिया.

100 कोटींच्यावर आबादी असलेला आपला देश. सर्वच क्रीडाक्षेत्रात आपण अगदीच नगण्य. हॉकीत असलेला आपला दबदबा आपण केव्हाच पुसून टाकला. क्रिकेटवर असलेला लेखकाचा राग मला कळूच शकत नाही. क्रिकेटमध्ये "मॅच फिक्सिंग' होतंय, भयंकर खर्च होतो, करोडोंची उलाढाल होते म्हणून याचा बाऊ करून या खेळाचा तिरस्कार करणं योग्य आहे असं मला वाटत नाही.

सर्वच कला, क्रीडा, अभिनय समाजसेवा अशा अनेक सांस्कृतिक क्षेत्रात. उपक्रमांत, त्यांतून देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक उपक्रमांत कोठे पारदर्शकता आहे ?

1983 साली इंग्डंडमध्ये झालेल्या तिसऱ्या विश्वचयक स्पर्धेत आपला संघ कमकुवत असताना आपण बलाढ्य अशा वेस्ट इंडीज संघाचा पराभव करून विश्वचषक मिळवला ह्याचे वास्तविक कौतुक करायला पाहिजे. उलट हेटाळणी करण्यात धन्यता मानण्यात आली. या देशात क्रिकेटचे असंख्य शौकीन आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅचेस चालल्या असताना भर-रस्त्यावर उभे राहून क्रिकेट पहात बसणारे असंख्य चाहते लेखक महाशयांनी पाहिले नसावेत. 

क्रिकेट जगतात 'शतकवीर' म्हणून विश्वात मानाचे स्थान मिळविणारे श्री.सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल सर्वच भारतीयांना अभिमान वाटायला हवा. पण एकदा आपण विरोधाची झापडं डोळ्यांना लावली. मग सगळीकडे अंधारच दिसणार.

क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल. तसेच 'वाडेकरांचा पराभव करून शरद पवार निवडून आले.' हा विवादसुद्धा अप्रस्तुत आहे. आपण लोकशाही मानणारी माणसं आहोत. लोकशाही प्रक्रियेतून झालेल्या निवडीबद्दल लेखकाने केलेली टिपणीसुद्धा अप्रस्तुत वाटते.

शरद पवारांच्या निवडीमुळे श्री. जगमोहन दालमियांची ह्या क्रिकेट क्षेत्रातील दादागिरी संपुष्टात आली. मा.शरद पवार क्रिकेटच्या प्रगतीसाठी काय करतील, हे काळ ठरवेल; त्याला आत्ताच नाक मुरडण्याचे कारण नाही.

गजानन ना. प्रधान हिंगणे खु.. पुणे 51.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके