डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधना परिवार  विठ्ठलराव गाडगीळ, भक्ती बर्वे इनामदार आणि दत्तात्रय जगताप यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या सर्वांच्या स्मृतीस ‘साधना’चे विनम्र अभिवादन.
 

बॅ. विठ्ठलराव गाडगीळ : ज्येष्ठ काँग्रेस नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे वयाच्या 71व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. केंद्र शासनात ते मंत्री होते आणि अनेक वर्षे खासदार म्हणून त्यांनी कार्य केले. विठ्ठलराव हे उत्तम संसदपटू होते आणि काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षे प्रवक्ते होते. विठ्ठलराव गाडगीळ हे सव्यसाची लेखक आणि प्रभावी वत्ते होते. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक निःस्पृह नेता हरपला आहे.

भक्ती बर्वे-इनामदार : मराठी रंगभूमीवरील अष्टपैलू नामवंत अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार यांचे अपघाताने अकाली निधन झाले. आपल्या कर्तृत्वाने मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचा असा खास ठसा उमटवला होता.

दत्तात्रय जगताप : 1930 साली विद्यार्थिदशेत स्वातंत्र्यलढ्यात सामील झालेले आणि 1932 व 1942 सालच्या स्वातंत्र्यचळवळीतही कार्य केलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय महादेव जगताप उर्फ ‘दत्तू काँग्रेस’ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुलगे, एक कन्या आणि नातवंडे- असा परिवार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा विमोचन चळवळ, यांत त्यांनी भाग घेतला. बेकरी व्यावसायिकांच्या संघटनेत त्यांनी अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून काम केले. ते साधनाचे वाचक आणि हितचिंतक होते.

साधना परिवार  विठ्ठलराव गाडगीळ, भक्ती बर्वे इनामदार आणि दत्तात्रय जगताप यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या सर्वांच्या स्मृतीस ‘साधना’चे विनम्र अभिवादन.
 

Tags: दत्तात्रय जगताप Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके