डिजिटल अर्काईव्ह

चमत्काराला नमस्कार की विवेकाचा स्वीकार?

शिर्डीचे श्री साईबाबा अथवा शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या नावावर ढीगभर चमत्कार जमा आहेत. त्याचा तपास करणे आज शक्यही नाही आणि त्यांच्या श्रद्धाळू भक्तांना याबाबत 'ब्र' उच्चारलेला चालत नाही. येशूच्या प्रार्थनेने रोग बरे किंवा मकदूम बाबा अथवा अशाच दग्यांच्या, पीरांच्या कृपाप्रसादाने घडणारे चमत्कार सांगणारे जागोजाग भेटत असतात. बुद्धाच्या एका शिष्याने चमत्कार करून भिक्षापात्र तयार केले, ते बुद्धाने फोड़ून टाकले आणि शिष्यांना निक्षून सांगितले की त्यांनी कधीही चमत्कार करता कामा नयेत.' पण आजही चमत्कार हे बुवाबाजीचे, तथाकथित दैवीशक्तीच्या सामर्थ्याचे आणि त्यातून मानसिक गुलामगिरी निर्माण करू इच्छिणाऱ्यांचे मोठे हत्यार आहे. चमत्कारापुढे, त्याची सत्यता तपासण्यास कधीच उत्सुक नसलेला भक्तगण सदैव माथा टेकून उभा असतो. या विश्वाच्या निर्मिकाची लीला अगाथ आहे आणि त्याच्या अथांग सामर्थ्यांपुढे विज्ञानाचे सारे नियम ‘कीस झाड की पत्ती' ठरतात. अशी त्या बहसंख्यांची खात्रीच असते.

माहीमचा समुद्र अचानक गोड झाल्याने आलेला उन्माद आता ओसरला आहे. या घटनेची शास्त्रीय मीमांसा समजते आहे; परंतु याकडे दैवी चमत्काराच्या श्रद्धेने बघणाऱ्यांना (तेच बहुसंख्य आहेत) त्यामुळे फरक पडत नाही. घटनेत नागरिकांचे कर्तव्य सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला यामुळे आपण जाहीर सोडचिठ्ठी देतो, याचे त्यांना सोयरसुतक नसते. कथित चमत्काराने निर्माण झालेला 'मास हिस्टेरिया' हा माहिती व तंत्रज्ञानाच्या स्फोटाचे 21 वे शतक, जगातील चौथ्या क्रमांकाचे विज्ञान तंत्रज्ञान बळ असलेला भारत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वारसा, क्षणोक्षणी प्रगत विज्ञानाच्या तालावर जगणारे मुंबई महानगर या सर्वांना कमीपणा आणतो, हे समाजमानसाला जाणवतच नाही. शासन व समाजधुरीणही याकडे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, रोगराई न पसरणे याच मर्यादेत पाहतात. व्यापक दृष्टिकोन काय सांगतो? विश्वकोषाने चमत्काराची व्याख्या अशी केली आहे निसर्गाचा कार्यकारण भाव ज्या घटनांना लागू पडत नाही. अशा घटनांना अद्भुत म्हणतात. वैज्ञानिक दृष्टिकोनांच्याद्वारे ज्या घटनांची उपपत्ती लागत नाही. त्यांना चमत्कार म्हणतात. चमत्काराचा पसारा खूप मोठा व प्राचीन आहे. जगातील सर्वच धर्मग्रंथात किंवा धर्माच्या इतिहासात त्याची असंख्य उदाहरणे खद्यून भरलेली आहेत. व्रतवैकल्ये हे खरे तर उपासनेचे मार्ग, परंतु त्यांनाही प्रभावीपणे चमत्कार चिकटवलेले आहेत. 

शिर्डीचे श्री साईबाबा अथवा शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या नावावर ढीगभर चमत्कार जमा आहेत. त्याचा तपास करणे आज शक्यही नाही आणि त्यांच्या श्रद्धाळू भक्तांना याबाबत 'ब्र' उच्चारलेला चालत नाही. येशूच्या प्रार्थनेने रोग बरे किंवा मकदूम बाबा अथवा अशाच दग्यांच्या, पीरांच्या कृपाप्रसादाने घडणारे चमत्कार सांगणारे जागोजाग भेटत असतात. बुद्धाच्या एका शिष्याने चमत्कार करून भिक्षापात्र तयार केले, ते बुद्धाने फोड़ून टाकले आणि शिष्यांना निक्षून सांगितले की त्यांनी कधीही चमत्कार करता कामा नयेत.' पण आजही चमत्कार हे बुवाबाजीचे, तथाकथित दैवीशक्तीच्या सामर्थ्याचे आणि त्यातून मानसिक गुलामगिरी निर्माण करू इच्छिणाऱ्यांचे मोठे हत्यार आहे. चमत्कारापुढे, त्याची सत्यता तपासण्यास कधीच उत्सुक नसलेला भक्तगण सदैव माथा टेकून उभा असतो. या विश्वाच्या निर्मिकाची लीला अगाथ आहे आणि त्याच्या अथांग सामर्थ्यांपुढे विज्ञानाचे सारे नियम ‘कीस झाड की पत्ती' ठरतात. अशी त्या बहसंख्यांची खात्रीच असते. माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्यांना सरळ सरळ भिडण्याची ताकद फारच थोड्यांकडे असते. या प्रश्नांची उत्तरे चमत्कार घडून मिळावीत अशी त्यांची मनोमन इच्छा असते. या फॅन्टरसीच्या आधारे जगणे ही माणसाच्या जगण्याची एक पद्धत आहे. ज्ञात कार्यकारणाच्या पलीकडे जाणाऱ्या निसर्गाच्या आणि मनाच्या शक्तीवर बहुतेकांची श्रद्धा असते. 

विज्ञानाचे काही नियम त्यांना माहीत असतात; परंतु त्याचे उपनियम, सूक्ष्मता, आवाका आणि वैविध्य यांची माहिती नसते, नियमांचे अपवाद तर ठाऊकच नसतात. अज्ञात असणाऱ्या या गोष्टी चमत्काराला जन्म घालतात. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव; चमत्कार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव. हे नाते प्रकाश-अंधारासारखे आहे. एकाचे असणे म्हणजेच अपरिहार्यपणे दुसऱ्याचे नसणे, विज्ञानात चमत्कार नसतातच. चमत्कार म्हणजे रासायनिक भौतिक यांत्रिक करामत असते. अथवा हात चलाखी असते. बदमाशीही असू शकते आणि प्रसंगी निसर्गाचे अजून न उलगडलेले कोडेही चमत्कारात जमा होते. वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनात स्वीकारणे, याचा अर्थ हे अज्ञात कार्यकारण भाव आज ना उद्या वैज्ञानिक विचार पद्धतीनेच समजतील यावरचा विश्वास. आपण विज्ञानाची करणी घेतली विचारसरणी दूर ठेवली; त्यामुळेच विसंगती जन्माला येतात. चमत्कारांना आव्हान देणे, खोटे ठरवणे यावाव भूमिका नीटपणे समजून ध्यावयास हवी. प्रत्येक व्यक्तीला घटनेने उपासना, पारलौकिक जीवन आध्यात्मिक कल्याण यांचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचा आदर करावयास हवा; परंतु चमत्कारावर विश्वास ठेवणे, त्याई तपासास नकार देणे आणि अशा चमत्कारांचा प्रसार करत राहाणे, हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. 

घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोन या कर्तव्याशी तो विसंगत ठरतोच; परंतु व्यक्ती व समाज यांचा बुद्धी-श्रम वेळ-पैसा वाया धालथतो. चमत्कारातून गुढतेचे वातावरण निर्माण होते; प्रश्नाची खरी सोडवणूक करण्याचे माणसाचे भान हरपते. परंतु असाच एक धक्का गणेशमूर्तीच्या दुग्धप्राशनाने 1995 साली बसलेला होता. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांची व्यक्तिगत पत्रे मिळवून ती महाराष्ट्र अंनिसने पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना पाठवली होती मजकूर थोडक्यात असा होता- “ता. 21 सप्टेंबर रोजी भारतभर देवादिकांच्या मूर्तीचा दुग्धप्राशनाचा कथित चमत्कार घडला. अत्यंत थोड्या वेळात सर्व देशात गोंधळाचे वातावरण तयार झाले. हा सर्व योजनाबद्ध बनाव होता असे मला वाटते. लोकांचा वेळ-श्रम-पैसा आणि विवेक यांचा त्यात बळी गेला, ही गंभीर बाब आहे. यासाठी सी.बी.आय. मार्फत या सर्व प्रकाराची चौकशी करावी,” पत्रे लिहिणाऱ्या जयंत नारळीकर, वसंत गोवारीकर, पु.ल. देशपांडे, श्रीराम लागू, निळू फुले, जयवंतराव टिळक, मोहन धारिया, ग.प्र. प्रधान, बाबा आढाव आदींचा समावेश होता. पंतप्रधान कार्यालयाकडून एक ओळीचेही उत्तर आले नाही. ही घटना घडली त्यावेळी ओरिसाचे मुख्यमंत्री असलेल्या जे.बी. पटनाईक यांनी मंदिरे बंद करण्याचा आदेश पोलिसांना दिला व प्रसंगी पुजार्यांना अटक करण्यास सांगितले. 

कर्नाटकच्या विधानसभेतच मुख्यमंत्री देवेगौडा यांनी या गोष्टीचा इन्कार करून मंदिरातील गर्दी हटविण्याचे आदेश दिले. अशा स्वरूपाची कोणतीही तत्परता व तडफ पाणी गोड होण्याच्या प्रकाराबाबत महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वाकडून दाखविली गेल्याचे दिसले नाही. भारतीय समाज सहज भीतीग्रस्त बनतो. दैववादी मनोवृत्तीमुळे आलेली संकटे ही नशिवाचेच भोग आहेत असे मानतो, समस्यांचा खंबीर व निर्भयपणे मुकाबला करण्याऐवजी, दैवी शक्ती लाभलेला एखादा युवा अथवा एखादे धार्मिक स्थळ, अडचणींतून आपल्याला अलगद बाहेर काढेल, असे बहुसंख्यांना वाटते. ही विचारसरणी बाळगणारा समाज नेहमीच स्वाभिमानशून्य, पळपुटा, भ्याडवृत्तीचा आणि बुद्धी गहाण टाकणारा असतो. स्वाभिमानी, प्रयत्नवादी व निर्भय समाज बनवण्यासाठी चमत्काराला विरोध आवश्यक असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन असे मानतो की, हे विश्व स्वायत्तपणे अस्तित्वात आहे. कोणत्याही चांगल्या वा वाईट शक्तीच्या उपासनेने आपोआप काहीही चांगले-वाईट घडत नाही. घटना या कार्यकारणभावाप्रमाणेच घडतात आणि आज तरी यथार्थ ज्ञानप्राप्तीचा हाच सर्वात खात्रीचा व प्रभावी मार्ग आहे. माणसाचे सर्वांत प्रभावी हत्यार म्हणजे त्याची बुद्धी; मानवी संस्कृतीचा सारा विकास हा मानवी प्रज्ञेच्या विकासाशी निगडीत आहे. "बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन' ही शास्त्रीय हृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती प्रतिज्ञा विसरून गेल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. कोणतीही शंका उपस्थित न करता, चमत्काराला सत्य मानून शरण जाणे, ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते. 

माणसं सहजासहजी सैरभैर का होतात, याचे एक व्यापक स्पष्टीकरण दिले जाते. ते असे की, समाज जीवनातील अनेक अंगी शोषण, अगतिकता, चंगळवाद यामुळे मोडकळीस आलेले मन अशा मूर्खपणावर सहज विश्वास ठेवते. याचा अर्थ सर्वकष समतावादी समाज परिवर्तन होईपर्यंत हे असेच चालणार. या प्रतिपादनामध्ये तथ्यांश आहे. परंतु संपूर्ण समाजपरिवर्तनाचा दिवस येईपर्यंत फसवणुकीचा ताबडतोब प्रतिकार हे सूत्र दूर ठेवण्याची गरज नाही. दूरवरच्या उद्दिष्टाचे भान हवेच, पण शोषणाशी सत्वर संघर्षही हवा. चमत्कारांना शरण गेलेले मन या संघर्षासाठी उठू शकत नाही. माणसाच्या हातापायांत बेड्या असल्या आणि त्याला त्याबद्दल राग येत असला तर त्याला सांगता येते. 'उठ वेड्या, तोड बेड्या.' पण या वेडयांनाच माणसे फुल-गजरे समजू लागली तर निर्माण होणारी मानसिक गुलामगिरी विरुद्धची झुंज अवघड बनते. मानसिक गुलामगिरीची सर्वांत भयानकरता ही की त्या अवस्थेत माणसाच्या बुद्धीला प्रश्न विचारलेला चालत नाही, मग पटणे तर दूरच राहिले. चमत्कार हे माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करतात व मानसिक गुलामगिरीचे हत्यार बनतात. माणसाचा पुरुषार्थच मग नाहीसा होतो व चमत्कार करणाऱ्या त्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या हाती स्वतःला सोपवून तो मोकळा होतो. व्यक्तीचे बुद्धीवैभव, निर्णयशक्ती, सारासार विचार करण्याची क्षमता या सर्व बाबी चमत्काराच्या पुढे, गहाण पडतात. 

व्यक्ती परतंत्र बनते. चमत्काराला सत्य मानणे ही त्याची सुरुवात असते. चमत्कार खोटे असतातच, परंतु परिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या मानसिकतेच्या मुळावरच ते येतात, हे अधिक धोकादायक असते. परिवर्तनाची लढाई मग स्वाभाविकच अधिक अवघड बनते. म्हणूनच जनमानस शोधक, निर्भय व कृतिशील बनवून ते व्यापक परिवर्तनाच्या चळवळीसाठी तयार करावयास हवे. यासाठी असा संकल्प करावयास हवा की, 'मी स्वतःवरचा विश्वास गमावणार नाही आणि चमत्कारावर विश्वास ठेवण्यासारख्या पळपुटेपणाच्या मार्गाचा आधार घेणार नाही. स्वतःच्या मर्यादित माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व वैर्याने जगणे, यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वतःचे प्रश्न काय आहेत व ते कसे सोडवायचे, ते कुठपर्यंत सुटू शकतात. याचे भान आपल्याला बैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवाद यांचा वापर करून येते. खरी गरज असते जीवनाच्या रणधुमाळीत लढण्याची हिंमत ब ताकद कमविण्याची. त्याला चमत्कार उपयोगी नाहीतच; उलट चमत्कारावरील श्रद्धा व्यक्तीच्या कर्तृत्वाला पांगळेपण देणारी ठरते. स्वतःला सजग, समर्थ, डोळस बनवणे यासाठी स्वतःच्या विवेकबुद्धीच्या रूपाने एक गुरू प्रत्येकाजवळ असतोच असतो. त्याच्यापासून पाथेय घेऊन वाटचाल करणे, यातच व्यक्तीच्या जीवनाची सार्थकता आणि निकोप समाजघारणेची शक्यता आहे.

Tags: बाबा आढाव ग.प्र. प्रधान मोहन धारिया जयवंतराव टिळक निळू फुले श्रीराम लागू पु.ल. देशपांडे वसंत गोवारीकर जयंत नारळीकर Baba Adhav G.P. Pradhan Mohan Dharia Jayawantrao Tilak Nilu Phule Shriram Lagoo P.L. Deshpande Vasant Gowarikar Jayant Narlikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके