डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

प्रतिसादात्मक लिखाण तात्कालिक व तात्पुरते असते या भूमिकेचे पूर्ण खंडन या पुस्तकाच्या आवाक्यातून व विचारप्रचुरतेतूनच होते. या देशाच्या चळवळींसमोरची मोठी अडचण बनलेले व सतत त्यांच्या मार्गक्रमणात अडसर उत्पन्न करणारे जात-वर्ग द्वंद्व हे कम्युनिस्टांच्या ब्राह्मणी प्रवृतीमुळे निर्माण झालेले आहे व त्याचे निराकरण केल्याखेरीज या देशातील परिवर्तनवादी चळवळ पुढील टप्पे गाठू शकणार नाही, हे त्यांचे या पुस्तकातील केंद्रीय विधान आहे. परिवर्तनातील कळीचा मुद्दा साम्राज्यवादविरोध आहे. साम्राज्यवादविरोध व जातिविनाश एकत्रच मार्गक्रमण करू शकतात हा कार्यक्रम ते या पुस्तकाद्वारे पुढे ठेवतात.

भारतातील जातिव्यवस्थेबद्दल गेली अनेक दशके भरपूर लिहिले गेले आहे. महात्मा फुले व डॉ. आंबेडकरांनी या प्रश्नाला गंभीर चर्चा व सामाजिक कृती या दोन्ही अंगांनी नवे स्वरूप दिले. त्यांनी प्रचलित जातिव्यवस्थेचे विश्लेषण करीत तिच्यावर कठोर टीका तर केलीच आणि त्याचबरोबर जातिविनाशाचा, जातींच्या समूळ उच्चाटनाचा नवा कार्यक्रम भारतीय समाजासमोर व मुख्यत: त्यातील श्रमिक-शोषित-दलित समुहांसाठी उभा केला. या महान परंपरेचे सामाजिक- राजकीय कृतिप्रवण स्वरूप व त्यावर आधारित व्यवहार या आद्य प्रवर्तकांच्यानंतर वेळोवेळी पालटले, कधी झाकोळले देखील. पण विविध पातळ्यांवर हा वैचारिक प्रवाह समर्थपणे उभाच राहिला. कधी त्याने वैचारिक विवादाचे रूप घेतले, तर कधी सांस्कृतिक-साहित्यिक आक्रोशाचे. काही वेळा अर्थातच त्याला संसदीय वा संसदबाह्य जनआंदोलनाचे वा संघर्षाचे रूपही प्राप्त झाले. जातिव्यवस्थेधील अमानूष अन्याय-अत्याचार-शोषण व दडपशाहीबद्दल विविध पद्धतीचे लिखाण झाले. जातिव्यवस्थेचे पदर अनेक अंगांनी तरलपणे, अभ्यासूपद्धतीने, विविध ज्ञानशाखांचा परामर्श घेत तपासले गेले.

राजकीय कार्यकर्ते व नेते, समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्राचे अभ्यासक, मानववंशशास्त्रज्ञ, संस्कृती- अभ्यासक, सर्जनशील कलावंत या सर्वांनीच या चर्चेत महत्त्वाची भागीदारी केली. तरीही अनेकांना एक गोष्ट सतत जाणवत राहिली. यातील बरीचशी चर्चा वर्णनात्मक होती, जातिसंस्थेच्या रूपाचे विविध पैलू तपासत होती. जातिसंस्थेचा ‘टिकाऊपणा’ व ‘लवचिकता’, विविध आर्थिक व राजकीय पद्धतींशी जुळवून घेत जिवंत राहण्याची तिची कुवत, मानसिकतेवर स्थूल व सूक्ष्म परिणाम करण्याची तिची क्षमता यावर बऱ्याच प्रमाणात लिहिले व बोलले गेले. परंतु सद्यस्थितीतील (म्हणजेच आजच्या गुंतागुंतीच्या भांडवलशाहीच्या, जागतिकीकरणाच्या, नव-साम्राज्यशाही वा नव-वसाहतवादाच्या काळातील) जातिव्यवस्थेचे समग्र आकलन करून देणारे सम्यक सिद्धान्त या लिखाणातून अभावानेच हाती लागत होते. आणि म्हणूनच सद्य परिस्थितीसाठी सुयोग्य असा जातिविनाशाचा म्हणजेच जातिसंस्थेच्या व जातिप्रथेच्या समूळ उच्चाटनाचा कार्यक्रम सहजपणे हाती येत नव्हता. (याखेरीज आणखी एका मुद्याचा उल्लेख अत्यावश्यक आहे. कृतिप्रवण विवेचन व सैद्धांतिक विश्लेषण यांच्यामध्ये एक दरीही उत्पन्न झालेली होती.

वैचारिक विश्लेषण कदाचित कृतिपासून तोंड फिरवीत होते तर राजकीय कृती तात्कालिकतेत अडकत होती.) डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे ‘साम्राज्यवादविरोध आणि जातिविनाश’ हे पुस्तक याच कमतरतांवर मात करण्यासाठीचे महत्त्वाचे योगदान देते. या पुस्तकाचे महत्त्व आहे ते याचसाठी. मूळ इंग्रजीत 2005 साली प्रसिद्ध झालेल्या ‘अँटि-इम्पिरिॲलिझम अँड ॲनायहिलेशन ऑफ कास्ट’ या पुस्तकाचे हे लेखकानेच केलेले भाषांतर आहे. पण या पुस्तकाची पार्श्वभूी लक्षात घेतल्याशिवाय त्याचे महत्त्व व अनेक पैलू लक्षात येणे कठीण जाईल. पुस्तकाची सुरुवात मूळ इंग्रजी आवृत्तीच्या ‘उपोद्‌घात’ या प्रकरणाने होते. त्याशिवाय ‘मराठी आवृत्ती’बाबत व ‘प्रास्ताविक’ ही प्रकरणे पूर्वपीठिका स्पष्ट करतात. याखेरीज याच अंकात आलेले लेखकाचे ‘मनोगत’सुद्धा ही भूमिका ठळकपणाने मांडते. हे उल्लेख करण्याची खास गरज आहे. कारण पुस्तकाचा सैद्धान्तिक आवाका प्रचंड आहे - काही प्रमाणात थक्क करणारा आहे. डॉ. तेलतुंबडे यांचा व्यासंग, अभ्यास व विद्वत्ता यांचा परिचय वाचकाला पुस्तकाच्या प्रत्येक पानातून होतो. कुठल्याही प्रकरणाच्या तळटीपा पाहिल्यास त्यांनी हे पुस्तक सिद्ध करण्यासाठी किती ग्रंथांचे परिशीलन केले आहे हे स्पष्ट होते. हे ग्रंथही अनेक प्रकारचे व अनेक लेखकांचे आहेत. त्यांच्यात मार्क्स-एंगल्स-लेनिन या साम्यवादी विचारसरणीच्या पायाभूत रचनाकारांचे ग्रंथ आहेतच पण शिवाय अनेक सद्यकालीन अभ्यासकांचे ग्रंथ आहेत. या

शिवाय या सर्व विश्लेषणाला ठोस परिस्थितीच्या ठोस अभ्यासाचा आधार आहे. ‘दलितांच्या अवस्थेवर (सांख्यिकी) आकडेवारी’ हे प्रकरण (की परिशिष्ट?) या परिस्थितीचे पुरावेच वाचकाच्या समोर सादर करते. डॉ. तेलतुंबडे जातिप्रथेच्या प्रश्नाला या भूमिकेतून भिडतात, कारण ते ‘साम्राज्यवादविरोध’ व ‘जातिविनाश’ या दोन्ही पायावर ठाम आहेत. या दोन्ही भूमिकांचा व कृतींचा एकमेकांशी अनन्यसाधारण संबंध आहे व त्या एकत्रपणेच परिपूर्ण होऊ शकतात हा त्यांचा ठाम विश्वास आहे. क्रांतिकारी समाजपरिवर्तन हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवूनच डॉ. तेलतुंबडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ती त्यांची जीवननिष्ठा आहे. ते कुठलेही लिखाण केवळ वैचारिक, बौद्धिक कसरती करण्यासाठी करीत नाहीत तर परिवर्तनासाठी आवश्यक अशी एक कृती म्हणून करतात. त्यामुळेच त्यांच्या लिखाणाला सखोल चिंतनाचा व प्रकांड अभ्यासाचा पाया तर असतोच पण त्याचबरोबर कृतिप्रवण कार्यकर्त्याची तळमळ, आग्रहीपणा व निग्रह देखील त्याचा अविभाज्य भाग असतात. डॉ. तेलतुंबडे स्वत:च स्वत:च्या लिखाणाचे वर्णन ‘प्रतिसादात्मक’ असे करतात. समूहांच्या चळवळींपुढे काही प्रश्न अत्याधिक महत्त्वाचे म्हणून उभे ठाकतात. त्यांची उकल केल्याशिवाय चळवळीची पुढील वाटचाल अशक्यप्राय किंवा निदान कठीण तरी होते. हे प्रश्न कधी परिस्थितीच्या (बदलत्या स्वरूपाच्या) वाचनासंबंधीचे असतात तर कधी सैद्धांतिक असतात.

शिवाय समाजातील काही प्रवाह व शक्ती चळवळींचा व समूहांचा बुद्धीभेद कळत-नकळत करत असतात. त्यांचीही योग्य ती दखल घेतल्याशिवाय व खंडन केल्याशिवाय पुढे जाणे शक्य नसते. अशा वेळी डॉ. तेलतुंबडे संशोधन, अभ्यास, लिखाण याकडे वळतात. कृती व विचार यांचे ऐक्य जपू शकणाऱ्या कृतिशील परिवर्तनवाद्याचे हे इतिहासदत्त कर्तव्य आहे या भूमिकेतून ते या कार्याकडे वळतात. त्यांच्या लिखाणाची शैली व आशय पाहिला तर सहज जाणवते की ते मतभेद व वाद यांना घाबरत नाहीत, स्वत:च्या मतांबाबत दुराग्रही नसले तरी ठाम आहेत. (प्रत्यक्षात ते मृदुभाषी, संयमी व इतरांना सतत मदत करणारे आहेत.) परंतु ते केवळ वादंग माजविण्यासाठी प्रक्षोभक असे काही लिहीत नाहीत. व्यक्तिगत आरोप वा टीका यांच्या पातळीवर उतरत नाहीत. प्रस्तुत पुस्तक या भूमिकांचे बोलके उदाहरणच आहे. प्रतिसादात्मक लिखाण तात्कालिक व तात्पुरते असते या भूमिकेचे पूर्ण खंडन या पुस्तकाच्या आवाक्यातून व विचारप्रचुरतेतूनच होते. या देशाच्या चळवळींसमोरची मोठी अडचण बनलेले व सतत त्यांच्या मार्गक्रमणात अडसर उत्पन्न करणारे जात-वर्ग द्वंद्व हे कम्युनिस्टांच्या ब्राह्मणी प्रवृतीमुळे निर्माण झालेले आहे व त्याचे निराकरण केल्याखेरीज या देशातील परिवर्तनवादी चळवळ पुढील टप्पे गाठू शकणार नाही, हे त्यांचे या पुस्तकातील केंद्रीय विधान आहे. परिवर्तनातील कळीचा मुद्दा साम्राज्यवादविरोध आहे.

साम्राज्यवादविरोध व जातिविनाश एकत्रच मार्गक्रमण करू शकतात हा कार्यक्रम ते या पुस्तकाद्वारे पुढे ठेवतात. पुस्तकाबद्दल इतकेच बोलून थांबणे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक (लेखकाला व चळवळींना) होईल. कारण या पुस्तकाचा आवाका व व्याप्ती खरेतर एका महाग्रंथाचे आहेत. अत्यंत अमूर्त सैद्धान्तिक प्रश्नांपासून मूर्त व प्रत्यक्ष वास्तव परिस्थितीच्या वाचनापर्यंत हे पुस्तक झेप घेते. मार्क्सवादी विश्लेषण पद्धतीसाठी महत्त्वाचा पाया व इमला या प्रश्नाला हे पुस्तक हात घालते. त्यांच्या परस्परसंबंधांची व विशेषत: पायावर पडणाऱ्या इमल्याच्या प्रभावांची चर्चा करते. जातिव्यवस्थेला इमल्याचा भाग ठरविल्यामुळे झालेल्या वैचारिक व व्यवहारात्मक भ्रांचा इथे उहापोह आहे. जातिव्यवस्थेला आधी सरंजामी अवशेष समजून भांडवली विकासात ती विरून जाईल असे समजणाऱ्या पारंपरिक कम्युनिस्ट भूमिकेवर तर इथे टीका आहेच परंतु पुढे 

प्रतिसादात्मक लिखाण तात्कालिक व तात्पुरते असते या भूमिकेचे पूर्ण खंडन या पुस्तकाच्या आवाक्यातून व विचारप्रचुरतेतूनच होते. या देशाच्या चळवळींसमोरची मोठी अडचण बनलेले व सतत त्यांच्या मार्गक्रमणात अडसर उत्पन्न करणारे जात-वर्ग द्वंद्व हे कम्युनिस्टांच्या ब्राह्मणी प्रवृतीमुळे निर्माण झालेले आहे व त्याचे निराकरण केल्याखेरीज या देशातील परिवर्तनवादी चळवळ पुढील टप्पे गाठू शकणार नाही, हे त्यांचे या पुस्तकातील केंद्रीय विधान आहे. परिवर्तनातील कळीचा मुद्दा साम्राज्यवादविरोध आहे. साम्राज्यवादविरोध व जातिविनाश एकत्रच मार्गक्रमण करू शकतात हा कार्यक्रम ते या पुस्तकाद्वारे पुढे ठेवतात.

जाऊन आजही जातिव्यवस्थेला अनेक प्रश्नातील एक मानणाऱ्या ‘नवीन’ भूमिकेतील त्रुटीही हे पुस्तक दाखवून देते. जातिव्यवस्थेच्या प्रश्नाला केंद्रीय स्थान दिल्याखेरीज व जात-वर्ग द्वंद्वावर मात केल्याखेरीज पुढची वाटचाल होणार नाही हे डॉ. तेलतुंबडे ठासून मांडतात. ही मांडणी वेगवेगळ्या स्वरूपात आधीही झालेली आहे. (कॉ. शरद पाटील यांचे या प्रश्नावरचे लिखाण पायाभूतच आहे.) तेलतुंबडे या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. जात आणि वर्ग दोन्ही कल्पनाव्यूहात्मक निर्मिती आहेत हा मुद्दा ते उपस्थित करतात. वास्तवात अस्तित्वात आहेत त्या अनेक पोटजाती व त्यांनी निर्माण केलेली जातिअंतर्गत उतरंड ही मांडणी ते करतात. यामुळेच त्यांना ‘बहुजन’ किंवा ‘इतर मागास जाती’ ही मांडणी राजकीय दृष्ट्या फारशी उपयुक्त वाटत नाही. या प्रकारची युती सामाजिक-राजकीय पर्याय उभा करू शकेल असे ते मानत नाहीत. परिवर्तनासाठी एक कळीचा मुद्दा आहे. साम्राज्यवादविरोधाचा आणि त्यासाठी सुधारणावादी कार्यक्रम उपयुक्त नाहीत तर जातिविनाशाचा कार्यक्रम व लढा हाती घ्यायला हवा ही त्यांची भूमिका आहे.

दलितांनीसुद्धा साम्राज्यवादविरोधाचा तीव्र लढा दिला नाही व अनेकदा स्वत:ला ‘सुधारणे’च्या कार्यक्रमात बांधून घेतले ही त्यांची टीका आहे. ते या भूमिका निव्वळ राजकीय अभिनिवेशाने मांडत नाहीत तर त्यांच्यासाठी संशोधन व सैद्धांतिक विश्लेषण यांचा आधार घेतात. दोनच उदाहरणे इथे पुरेशी आहेत - आणि ही दोन्ही लक्षणीय आहेत. युरोपातील अभिजात सरंजामशाही व भारतातील जातिव्यवस्थेवर आधारित सरंजामशाही यांच्यातील मूलभूत फरकांचे ते बारकाईने विश्लेषण करतात व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधतात. त्याचप्रमाणे ते साम्राज्यशाही व साम्राज्यवाद यांचा उर्जास्त्रोतांशी असलेला संबंधही दाखवून देतात. खनिज व कृत्रिम उर्जेुळेच उर्जेची साठवण व वहन शक्य झाले हे दाखवून देत ते त्याचा प्रत्यक्ष संबंध अनिर्बंध शोषण व नफा व त्यातून साम्राज्यशाही व साम्राज्यवादाशी जोडून दाखवतात.

कुठल्याही पुस्तकातील सगळीच मते सर्वच वाचकांना पटतील, मान्य होतील असे नाही. विचारप्रणालीतील फरकही अशी मतभिन्नता उत्पन्न करत असतो. अशा मांडणीवर जर तीव्र परंतु सयुक्तिक व निरोगी चर्चा होऊ शकली तरच सामाजिक विचार व पर्यायाने परिवर्तनवादी चळवळी पुढे जाऊ शकतात, अधिक प्रगल्भ व परिपक्व होऊ शकतात. डॉ. तेलतुंबडे यांच्या प्रस्तुत पुस्तकाच्या रूपाने अशा चर्चेसाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र फाउंडेशनने दिलेल्या पुरस्काराच्या निमित्ताने जास्त लोकांचे लक्ष या पुस्तकाकडे जाऊन चर्चा अधिक व्यापक झाली तर फारच चांगले होईल. या पुस्तकाच्या रूपाने डॉ. तेलतुंबडेंच्या व्यासंगाचे अनेक पैलू उघड होतात. त्यांचे शिक्षण इंजिनियरिंगमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्रात पदवी संपादन केली. नंतर त्यांनी सायबरनेटिक्स या विषयात डॉक्टरेट मिळवली. आजही ते अनेक तंत्रशिक्षण व व्यवस्थापनशास्त्र संस्थांशी संबंधित आहेत. अनेक देशी परदेशी शिक्षणसंस्था व प्रकाशने यांच्याशी त्यांचे संबंध आहेत. पण महाराष्ट्राला व भारताला त्यांची खरी ओळख आहे ती संशोधक, सिद्धहस्त लेखक, विचारवंत या स्वरूपात व त्यांच्या चळवळीतील सहभागामुळे. 
 

Tags: anand teltumbde साम्राज्यवादविरोध आणि जातिविनाश आनंद तेलतुंबडे वैचारिक ग्रंथ पुरस्कार महाराष्ट्रा फौंडेशन पुरस्कार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके