डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘साधना’चे संस्थापक साने गुरुजी यांची जन्मशताब्दी 24 डिसेंबर 1999 ला आहे. त्यामुळे तर असा हा संकल्प स्वीकारण्यास सर्वांनी अधिक उभारी दाखवावयास हवी.

कालगणनेतील सहस्रकाच्या भाषेत ज्या वेळेस 2000 साल सुरू होईल, त्याचबरोबर साधना साप्ताहिकाचे आणखी दोन हजार वर्गणीदार वाढलेले असतील, असा संकल्प 'साधना'ने स्वीकारला आहे. तसे घडले तर केवळ वर्गणीदारांच्या संख्येवर 'साधना' स्वावलंबी बनेल. दीपावली अंकाच्या साहाय्याने विस्ताराच्या योजना आखता येतील. हे अशक्य आहे असे बिलकूल वाटत नाही. ‘साधना’चे संस्थापक साने गुरुजी यांची जन्मशताब्दी 24 डिसेंबर 1999 ला आहे. त्यामुळे तर असा हा संकल्प स्वीकारण्यास सर्वांनी अधिक उभारी दाखवावयास हवी. ती दाखवली जाईल असा विश्वास वाटतो. नियोजन चोख झाले तर काय घडू शकते याचा अगदी अलीकडेच आलेला अनुभव लिहीत आहे. तो सर्वांना प्रेरणादायी ठरावा. 'साधना' साप्ताहिकाचा प्रचार आणि त्यातील गाभ्याचा भाग म्हणजे समाजमानसात विवेकी विचार पोचविण्यासाठी विवेकजागर प्रबोधन मोहीम चालू केली आहे.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, ज्येष्ठ कृतिशील विचारवंत पुष्पाताई भावे यांनी यासाठी वेळ देण्याचे कबूल केले आहे. त्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात धुळे, नंदुरबार जिल्ह्यांचा दौरा झाला. धुळ्याचे प्रा. मु. ब. शहा यांनी सर्व कार्यक्रमांचे फारच नेटके नियोजन केले होते. शिरपूर (जि. धुळे) येथे पहिला कार्यक्रम झाला. किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एका शाळेचा रौप्य महोत्सव हे निमित्त होते. व्यंकटअण्णा रणधीर यांनी पूर्वीच शब्द दिला होता. शंभर वर्गणीदारांचा 25 हजार रुपयांचा चेक स्वाधीन करून त्यांनी तो पुरा केला. त्याच दिवशी सायंकाळी शहादा येथे सभा झाली. खूप गर्दी होती. चरणभाई मेहता हे तेथील अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते. सत्तरीकडे वाटचाल करणारे, पण उत्साह तरुणाला लाजवणारा. शिवाय अनेक तरुणांना स्वतःशी जोडून ठेवण्याचे कसब. यामुळे सभा सुरू होईपर्यंत वर्गणी, जाहिराती जमविण्याची त्यांची धावपळ चालू होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला 105 वर्गणीदारांचा धनादेश त्यांनी हातात दिला. दुसऱ्या दिवशी दोंडाईचा येथे कार्यक्रम झाला. संयोजनाचे निरोप उशिरा पोचल्याने वर्गणीदारांची वर्गणी जमा झाली नव्हती. पण डॉ. रवींद्र टोणगावकर आणि माजी आमदार डॉ. हेमंत देशमुख यांनी शंभर वर्गणीदारांचे पक्के आश्वासन दिले. तसेच ‘साधना’च्या अंकाये सामुदायिक वाचन करण्याचा अभिनव उपक्रमही जाहीर केला. सायंकाळी नंदूरबारला कार्यक्रम झाला. हॉल तुडुंब भरला होता. पितांबर सरोदे यांनी सर्व उच्चांक मोडण्याचा जणू चंगच बांधला होता. त्यांनी 120 वर्गणीदारांची यादी पैशासह हाती ठेवली. अवघ्या दोन दिवसांत 320 वर्गणीदार झाले. 80 हजार रुपये जमले. काही जाहिराती, देणग्या मिळाल्या.

'साधना’च्या सर्व सुहृदांची छाती भरून यावी अशी ही घटना. विवेक जागरचे कार्यक्रमही उत्तमच झाले. प्रा. मु. ब. शहा, पुष्पाताई भावे, डॉ. श्रीराम लागू यांची भाषणे श्रोत्यांना फार चांगल्या प्रकारे भिडली. चरणभाई शहा नंतर आपल्या मुलाकडे नागपूरला गेले तेथेही ‘साधना’प्रेमीना भेटून त्यांनी आपले ‘साधनाव्रत' चालूच ठेवल्याचे पत्र आले. तसेच त्यांनी स्वतःचे पंचवीस हजार रुपये एक वर्ष विनाव्याज ठेव म्हणून साधनेकडे ठेवले. अशी अखंड धडपड करणारी माणसे लाभली म्हणजे कितीतरी उमेद वाढते. डॉ. रवीद्र टोणगावकर व हेमंत देशमुख हेही उत्साहाने व चिकाटीने संकल्पसिद्धीमागे लागले आहेत. असे उंदड प्रतिसाद हवे आहेत. मग दोन सहस्रकांचा आकडा गाठण्यास कितीसा उशीर?

Tags: घडामोडी साने गुरुजी जन्मशताब्दी events sane guruji birth centenary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके