डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

...

मी पाहिला एक रथारूढ भीष्म शरपंजरस्थ 
एकजात अर्जुनांच्या बृहन्नडा झाल्याने अस्वस्थ 
आसेतु हिमाचल भारत त्याचे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र 
अशान्तिपर्वाकडे करुणेने पाहणारे अंगारनेत्र 
नवखंड पृथ्वी अखंड करीन म्हणणारा कठोर निश्चय दैन्य 
दारिद्रयाशी यांचे वैर, एरवी निर्वेर अकृतीमय 
तो जिंकेल की हरेल याची फक्त शकुनींना चिंता 
सूर्याकडून याने घेतलेली अखंड जळण्याची संथा 
याचे व्यूह गतिमान याच्या अनिर्बंध दाही दिशा 
हा प्रकाशाचा यांत्रिक, नाहीत दिवस नाहीत निशा 
जाळलेल्या खांडववनात हा पुन्हा लावील रोपटी 
पुन्हा बांधून देईन म्हणतो सर्व एकलव्यांना खोपटी 
ज्याने घेतलेली आहे आमरण समरदीक्षा 
तो कशाला करील उत्तरायणाची प्रतीक्षा 
अठरा अक्षौहिणींसह कौरवपांडव सख्य करतील 
तेव्हा याचे कृतार्थ डोळे आनंदाश्रूंनी भरतील.

Tags: संजय अभियान Sanjay Abhiyan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके