डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

..विस्ताराची आनंदवार्ता...

मराठी साहित्यात गेल्या काही वर्षांमध्ये जी 'कोंडी', 'घुसमट' झाली होती ती फुटून नवीन धुमारे अंकुरण्याची शक्यता वातावरणात सध्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

मे 1999 च्या पहिल्या अंकापासून 'साधना' साप्ताहिकाची 4 पानं वाढवण्यात येणार असल्याची बातमी तुम्हांला कळवताना आम्हांला आनंद होत आहे. ही पाने नियमितपणे साहित्यविशेष म्हणून देण्यात येतील. मराठी साहित्यात गेल्या काही वर्षांमध्ये जी 'कोंडी', 'घुसमट' झाली होती ती फुटून नवीन धुमारे अंकुरण्याची शक्यता वातावरणात सध्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे. समाजाच्या विविध स्तरांतील संवेदनशील मनं आपापल्या जीवनजाणिवांवर आधारित असलेले 'सर्जन’ घेऊन मराठी साहित्याच्या प्रांगणात हिरीरीने दाखल होऊ लागलेली दिसत आहेत.

अशा नव्या जाणियांसाठी छोटेखानी का होईना पण एक नियमित 'व्यासपीठ’ निर्माण करण्यासाठी 'साधना' ही चार पानं देऊ इच्छिते. बाकी तुम्हा साऱ्यांच्या रूपाने 'साधना’कडे एक चोखंदळ वाचकवर्ग आयता तयार आहेच. निवडक पुस्तकांची दर्जेदार समीक्षा, उत्तम इंग्लिश पुस्तकांचा परिचय, साहित्यविश्वातील वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी व उपक्रम, वाङ्मयीन वाद या सर्वांना या निमित्ताने हक्काचे स्थान लाभणार आहे. आपल्या सूचनांचे स्वागतच आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके