डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दुर्लक्षित वाणीदोषावर उपचार केंद्र

व्यक्तिमत्त्व विकासात प्रश्न निर्माण झाला. नैराश्य आले. तोतरेपणातून बाहेर पडण्यासाठी संतोष कासट यांनी मंत्र, तंत्र, अंगारे-धुपारे इत्यादी अंधश्रद्ध उपायांचा अवलंब केला. त्यातून काही साध्य झालं नाहीच, उलट मनस्ताप झाला.

तोतरेपणा हा समाजात कायम टिंगलीचा विषय झाला आहे. अडखळत बोलणाऱ्याची चेष्टा केली जाते. यातून अशा व्यक्तींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. परभणी जिल्ह्यातील सेलू येथील संतोष कासट यांना व्यक्तिगत आयुष्यात तोतरेपणामुळे अशीच अवहेलना सहन करावी लागत होती. शिक्षणात ते मागे पडले. व्यक्तिमत्त्व विकासात प्रश्न निर्माण झाला. नैराश्य आले. तोतरेपणातून बाहेर पडण्यासाठी संतोष कासट यांनी मंत्र, तंत्र, अंगारे-धुपारे इत्यादी अंधश्रद्ध उपायांचा अवलंब केला. त्यातून काही साध्य झालं नाहीच, उलट मनस्ताप झाला. शेवटी स्वतःच स्वतःच्या दोषाचा शोध घेतला. अडखळत का बोललं जातंय याची कारणं शोधली. तोतरेपणावर मात करण्याची स्वतंत्र पद्धती विकसित केली. स्पष्ट शब्दोच्चारांशी वयाच्या छत्तिसाव्या वर्षापर्यंत त्यांचा छत्तीसचा आकडा होता. तो दूर झाला. मनोवैज्ञानिक उपचार व सराव यांद्वारे हा दोष पूर्णतया दूर करता येतो हे अनुभवले.

केवळ स्वतःमध्ये सुधारणा करून संतोष कासट थांबले नाहीत, ‘कुशावर्त वाणी प्रशिक्षण केंद्र' कार्यान्वित करून इतर तोतरे बोलणाऱ्यांना त्यांनी आधार दिला. या केंद्रामध्ये वाणीतील दोष घालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. जोडीला त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत केला जातो. नैराश्याची, न्यूनगंडाची भावना दूर केली जाते. नेमक्या कारणाचा शोध घेऊन त्या दिशेनं उपचार केले जातात. वाणीदोषाचे स्वरूप आणि त्या व्यक्तीची मानसिकता यांनुसार प्रशिक्षणाचा कालावधी ठरवला जातो.

संपर्कासाठी पत्ता

कुशावर्त वाणी प्रशिक्षण केंद्र ग्रामीण रुग्णालयाजवळ, बालूरनाका, सेलू, जि. परभणी 431503

Tags: जरा हटके! awesome! weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके