.
श्री. वि. स. पागे यांचे निधन
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेसचे वैचारिक भरणपोषण करणारे एक कार्यकर्ते श्री. वि. स. पागे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
ग्रामीण जनतेचे प्रश्न हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. ग्रामीण कारागीर आणि शेतमजूर यांच्या संबंधीच्या महाराष्ट्र सरकारच्या योजनांचे, विशेषतः रोजगार हमी योजनेचे ते प्रमुख शिल्पकार होते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचा शासकीय योजनांच्या आखणीत सतत सहभाग राहिला. सभापती म्हणूनही त्यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आणि स्पृहणीय होती. श्री. पागे यांचा संतसाहित्याचा गाढ व्यासंग होता. त्यांची वाणी प्रासादिक होती. श्री. पागे यांच्या स्मृतीस आमचे विनम्र अभिवादन.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या