पालघर महाविद्यालयात ‘समान नागरी कायदा’ ह्या विषयावर भाषण आयोजित करण्यात आले होते. समान नागरी कायद्याच्या आधाराशिवाय समान नागरिकत्वाची प्रतिष्ठापना करता येणार नाही; आणि समान नागरिकत्व हा तर भारतीय संविधानाचा पायाच आहे. हा पाया मजबूत करण्यासा दृष्टीने प्रबोधनाचे कार्य अत्यावश्यक आहे हे विद्यार्थांपुढे प्रतिपादन करण्यात आले.
आन्तर भारतीतर्फे मुंबईत भारत-दर्शन
मुंबईतील रवीन्द्र नाटयगृहात मराठीतर भाषी निवडक मंडळींपुढे ता. 25 डिसेंबर 1973 रोजी भारतीच्या वतीने राष्ट्र सेवा दल कलापथकाने भारतदर्शन हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध-भाषी रसिक मंडळीचे एक स्नेहसंमेलनच रवीन्द्र नाटयमंदिरात भरले होते म्हटले तरी चालेल. निमंत्रितांत विविध भाषिकांच्या मुंबईतील संस्था व संघटनांचे प्रतिनिधी होते, त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी मंडळीही होती. याशिवाय कला आणि सेवा या क्षेत्रातील मंडळीही अगत्याने आली होती. आन्तर भारती व राष्ट्र सेवा दल या संस्थांचे काही हितचिंतक होते, तसे काही परदेशी पाहुणेदेखील उत्सुकतेने आले होते.
आन्तर भरतीचे अध्यक्ष श्री. एम्. एम्. जोशी यांनी सर्वांचे प्रारंभी स्वागत केले, आणि आन्तरभारतीची कल्पना आणि कार्य यांची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर भारत दर्शनाचा कार्यक्रम सर्वांसमोर नृत्य संगीताच्या रूपाने उलगडू लागला आणि जवळपास प्रत्येक प्रकार टाळ्यांच्या गजरात संपताना दिसू लागला. इतकी तरुण मंडळी इतक्या उत्साहाने, शिस्तीने आणि समरसतेने भारताचे उत्कट, भव्य दर्शन घडवताता पाहून सर्वांना कलापथक चमूचे कौतुक वाटले, आणि कार्यक्रम संपल्यावर ते व्यक्तही केले. प्रा. वसंत बापट, लीलाधर हेगडे, सुधा वर्दे यांच्या नेतृत्वाखाली लहान-मोठ्या साठ कलाकारांनी भारतदर्शन प्रस्तुत केले होते.
भारत-दर्शनाचा हा सत्याऐंशीचा कार्यक्रम. हे कार्यक्रम गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र, कर्नाटक, ओरिसा, काश्मीर, दिल्ली, पंजाब इत्यादी प्रांतात प्रस्तुत झाले असून येत्या कलापथक रौप्यमहोत्सवी वर्षात भारतदर्शनाचे शंभर कार्यक्रम पूर्ण करण्याचा कलापथकाचा संकल्प आहे. हौशी कलाकारांनी सुनियोजित पद्धतीने सादर केलेला हा कार्यक्रम स्वाभाविकच सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला आहे.
नाथ पै प्रबोधिकेची स्थापना
खासदार पुरुषोत्तम मावळंकर पुण्यात येणार
नाथ पै यांनी आमरण समाज प्रबोधनाचे कार्य केले. असो, पक्ष कार्य असो, जाहीर सभा असो की लोकसभा असो, प्रबोधनाचे अवधान त्यांनी कधीच सुटू दिले नाही. निवडणुकीचाही उपयोग त्यांनी प्रबोधनाची एक महान संधी या दृष्टीनेच केला. जीवन हे अनेकांगी आहे, आणि त्या सर्व अंगानी मानवी जीवनाचा विकास झाला पाहिजे, अशी त्यांची सतत धडपड असे. एकांगी जीवनामुळे असमतोल व्यक्तिमत्त्व निर्माण होते. आणि त्याचा परिणाम समाजातील तोल ढळण्यात होतो. समाज जीवन त्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या खालावते. जीवनाचा हा दृष्टीकोन घेऊन नाथ पै प्रबोधिनीचे कार्य सुरु करण्याचे त्यांच्या काही निकटवर्ती मित्रांनी ठरवले आहे.
संसदपटू म्हणून नाथ पै यांचे कार्य प्रख्यात आहे. लोकशाहीवर त्यांची नितांत श्रद्धा होती; आणि तिचे जतन, संवर्धन आणि शुद्धीकरण व्हावे यासाठी त्यांनी निरलसपणे अखंड प्रयत्न केले. नाथ पैंच्या स्मृतिदिनी प्रबोधिनीचे उद्घाटन होणार आहे. खासदार पुरुषोत्तम मावळंकर यांनी उद्घाटनानिमित्त पुण्यात दोन व्याख्याने देण्याचे मान्य केले असून त्यांच्या व्याख्यानांचा विषय ‘भारतीय संसदीय लोकशाहीचे भवितव्य’ हा आहे. ही व्याख्याने 19 व 20 जानेवारी 1974 रोजी होणार आहेत. अहमदाबाद मधून इंदुलाल याज्ञिक यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पोटनिवडणूक लढवली आणि प्रचंड मते मिळवून ते विजयी झाले. नंतरच्या अल्पावधीत त्यांनी आपल्या अभ्यासू भाषणांनी तेथे छाप बसवली.त्यांच्यासारख्या तरुण संसदपटूच्या हस्ते नाथ पै प्रबोधिकेचे उद्घाटन होत आहे ही फार उचित अशी गोष्ट आहे.
गुजरात शिक्षण संस्था निरीक्षण यात्र
गुजरातमध्ये अनेक शैक्षणिक प्रयोग मोठया निष्ठेने आणि चिकाटीने केले जात आहेत. अशा शिक्षण संस्था महाराष्ट्रातील अध्यापकांनीही चर्चा जाणि विचारविनिमय करावा, यासाठी दरवर्षी निवडक अध्यापकांनी एक सहल गुजरातमध्ये आयोजित केली जाते. मर्यादित प्रमाणात शिक्षण संस्थांचे पालक व वसतिगृहांचे संचालक यांनाही प्रवेश दिला जातो. महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने माध्यमिक शिक्षक या यात्रेत सामील होतील. या यात्रेत सामील होतील.त्यांचा हा यात्राकाल सेवाकाल समजावा व त्यांचा प्रवासखर्च अनुदानपात्र मानावा अनुमती दिली आहे.
ज्या अध्यापकांना या संधीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी 100 रुपये अनामत भरून आपली नावे नोंदवायची आहेत. गुजरातमधील ही यात्रा मुख्यतः शैक्षणिक भाषा आहे, आणि गुजरातमधील शैक्षणिक प्रयोग पाहून आल्यानंतर तसेच काही प्रयोग करावे अशी अपेक्षा राहील तेव्हा शंभर रुपये पाठवताना या दृष्टीनेही आपली माहिती येऊ कळवावी. माध्यमिक शिक्षक व्यतिरिक्त येऊ इच्छीत असतील त्यांनी प्रवासी सर्व खर्च स्वतःच करायचा आहे.
यात्रेचा प्रारंभ ता. 19 जानेवारी 1974 रोजी मुंबईहून होईल, मुंबईपासून निघून मुंबईपर्यंत परत येईपर्यंतया सर्व 200 होईल. ता. 18 जानेवारीपर्यंत सर्वांनी दादर येथील छबिलदास मुलांच्या शाळेत पोचावयाचे आहे. तेथे पोचताच उरलेले 100 रु. भरावयाचे आहेत. नाव नोंदवून न येणारांना त्याचे अनामत म्हणून भरलेले शंभर रुपये परत मिळणार नाही. यात्रा 30 जानेवारीला संपेल.
अनामतचा पाठवण्याचा पत्ता- संयोजक, आंतर भारती गुजरात शिक्षण संस्था निरीक्षण यात्रा,430 शनिवार पेठ, पुणे 30. मनिऑर्डरची पावती मुंबईला पोचल्यावर संयोजक चंद्रकांत शहा यांना दाखवावी लागेल. ती सोबत आणावी.
विद्यार्थिनींसाठी वर्ग
विद्यार्थी साहाय्यक समिती व इन्व्हेस्टमेंट इन् मॅन ट्रस्ट ह्या संस्थांतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थिनींकरता योजलेला सुटीतील पाचवा दोन आठवड्यांचा वर्ग गेल्या दिवाळीच्या सुटीत समितीच्याच विद्यार्थिनीगृहात घेण्यात आला. विद्यार्थिनीच्या अभिव्यक्तीच्या विकासावर वर्गामध्ये भर देण्यात येतो. प्रस्तुत वर्गात 19 विद्यार्थिनीनी भाग घेतला होता. त्यांतील निम्म्या विद्यार्थिनी कॅथॉलिक ख्रिस्ती होत्या; त्यांत दोघी संन्यासिनी होत्या. एक मुसलमान व बाकी जैन, बौद्ध, हिंद वा अन्य धर्मीय होत्या.
वर्गात योगासने, सामाजिक व्यवहार, छंद, प्रात्यक्षिके व खेळ यांचे शिक्षण दिले गेले. छंद शिक्षणात बाटिक कला, कातरकाम, डबे, बाटल्या व पेटयांवरील रंगकाम इ. शिक्षण दिले गेले. सर्वच पाठांमध्ये बहुतेक विद्यार्थिनीची भूमिका श्रोत्यांची व निरीक्षकांची होती. गटचर्चेच्या वेळी पुण्यातील 8-10 महाविद्यालयीन पाहुण्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना बोलावले होते. ख्रिस्ती विद्यार्थिनी धार्मिक आचार-विचारांबद्दल जागरूक असल्याचे तर अन्यधर्मीय विद्यार्थिनींना धर्माचार म्हणजे रूढ विधी वाटत असल्याचे आढळले.समाजसेवेचे काम करणाऱ्या पुण्यातील नामवंत संस्थांचे अवलोकन करण्यास एक दिवस ठेवला होता. रुग्णपरिचर्या, ग्रामविकास, अनाथ, अपंग, परित्यक्तांना आसरा व शिक्षण- ही कामे विद्यार्थिनींना ऐकूनच माहीत होती. अशा संस्थांना माणसांची किती आवश्यकता असते ते दिसले.
कलांचा परिचय होण्यासाठी श्री. उस्मानखान यांच्या वादनाचा व ‘मी तुझे भूत’ या प्रायोगिक नाटकाचा कार्यक्रम आयोजित केला होता. निर्मला पुरंदरे ह्या कल्पकतेने वर्गाचे संचलन करतात. येत्या उन्हाळयातही असे वर्ग घेतले जातील.
संपर्क : विद्यार्थी साहाय्यक समिती, 1982-1, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे 5.
समान नागरी कायद्याच्या आघाडीवर
पालघर महाविद्यालयात ‘समान नागरी कायदा’ ह्या विषयावर भाषण आयोजित करण्यात आले होते. समान नागरी कायद्याच्या आधाराशिवाय समान नागरिकत्वाची प्रतिष्ठापना करता येणार नाही; आणि समान नागरिकत्व हा तर भारतीय संविधानाचा पायाच आहे. हा पाया मजबूत करण्यासा दृष्टीने प्रबोधनाचे कार्य अत्यावश्यक आहे हे विद्यार्थांपुढे प्रतिपादन करण्यात आले. त्या नंतर अध्यापकांशी मनमोकळी चर्चा झाली.सातारला ‘समाजवादी युवक दल’ नावाची एक संघटना तरुण मंडळी चालवतात.समाजवादी युवक दलाने एक दिवसाचा अभ्यासवर्ग आयोजित केला. अभ्यास वर्षाच्या अखेरीस पाठक सभागृहात ‘समान नागरी कायदा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमही रंगला. समान नागरी कायद्याबाबत किती ज्ञान आणि अपसमज समाजात आहेत ते या निमित्ताने दिसून आले. त्याच्याच जोडीला समाज बदलण्याची अनिच्छा आणि भीतीही असते. बदलाच्या विरोधामुळेही अनाठायी उदारता दाखवण्याचा प्रकार आपल्या समाजात घडत असतो. ही स्वार्थी उदारता हाच समाजाच्या प्रगतीच्या मार्गातील एक धोंडा बनला आहे.
द्रविड कळघमचे वयोवृद्ध नेते रामस्वामी नायकर यांनी प्रजासत्ताक दिनापूर्वी जातिवाद गाडा, सर्व धर्मीयांसाठी समान नागरी कायदा करा, अशी मागणी केली होती. जन्माधारित विषमता नष्ट करण्यात शासनाने कचखाऊपणा केला तर सामाजिक समता नसलेल्या देशात राहायचे की नाही, याचा विचारच आपल्याला करावा लागेल असेही बजावले होते. राष्ट्रीय एकात्मतेच्या बाता मारायच्या आणि सामाजिक समता निर्माण करण्याबाबत चालढकल करायची हा प्रकार बंद पडला पाहिजे, असे त्यांनी सांगितले होते.
26 जानेवारी 1975 रोजी भारतीय प्रजासत्ताकाचा रौप्य महोत्सव आहे; तोपर्यंत समान नागरी कायद्याबद्दल स्पष्ट असे अभिवचन मिळवण्याचा प्रयत्न युवकांनी केला पाहिजे.
Tags: Sudha Varde Prof. Vasant Bapat. Liladhar Hegade S.M. Joshi Rashtra Seva Dal Aantar Bharati Ravindra Natyamandir सुधा वर्दे लीलाधर हेगडे प्रा. वसंत बापट श्री. एम्. एम्. जोशी राष्ट्र सेवा दल आन्तर भारती रवीन्द्र नाटयमंदिर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या