.
एकेक पान गळावया
समाजवादी महिला सभेच्या एक निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या शुभांगी जोशी यांचे दीर्घ आजारानंतर दि. 1 सप्टेंबर रोजी निधन झाले, अनेक वर्षे कर्करोगाशी झुंज देत जवळ जवळ अखेरपर्यंत त्या कार्यमग्न राहिल्या. समाजवादी महिला सभेच्या चिटणीस म्हणून दीर्घकाळपर्यंत त्यांनी काम केले. सुनंदा सहकारी गृहउद्योग संस्था, आदिवासी सहज-शिक्षण परिवार या समाजवादी महिला सभेमार्फत चालू असलेल्या उपक्रमांशी त्यांचा दृढ संबंध होता. त्यांच्या मेहनती आणि प्रांजळ स्वभावामुळे त्या संघटनेत आणि परिवारातही सर्वांना अतिशय प्रिय होत्या समाजवादी चळवळ, राष्ट्र सेवादल यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनाने महिलांच्या चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या आणि सहकार्यांच्या शोकात साधना सहभागी आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या